पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात सुरू असलेल्या सब-वे कामाची भाजपच्या स्थानिक नगरसेविका निर्मला कुटे यांनी शुक्रवारी (दि. ८) पाहणी केली. स्वराज चौक ते कोकणे चौक, पी. के. चौकाकडे जाणारा मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 10 February 2019
शास्तीकर माफीच्या प्रश्नासाठी पालिका मुख्यालयास विरोधक मानवी साखळीव्दारे घेराव घालणार
पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सत्ताधारी भाजपा विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थाच्यावतीने मानवी साखळीव्दारे पिंपरी चिंचवड मुख्यालयास सोमवारी (दि.११) रोजी दुपारी ३ वाजता घेराव घालणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
More stations soon to refill CNG vehicles
PUNE: The city is set to have more CNG dispensing pumps in the next one year.
Maharashtra Natural Gas Limited (MNGL) officials on Friday said 12 more pumps in Pune and Pimpri Chinchwadwere expected to soon start dispensing the compressed natural gas (CNG).
Maharashtra Natural Gas Limited (MNGL) officials on Friday said 12 more pumps in Pune and Pimpri Chinchwadwere expected to soon start dispensing the compressed natural gas (CNG).
CM’s Devendra Fadnavis's town tops Smart Cities survey
MUMBAI: Seven of the ten Maharashtra cities selected for the Narendra Modi government's Smart Cities Mission have got their infrastructure projects of.
‘इंद्रायणी थडी’तील महिलांच्या नोकरी महोत्सवात ३५४ महिलांना मिळाले ‘ऑफर लेटर’
पिंपरी (Pclive7.com):- महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत खास महिलांसाठी नोकरी महोत्सव भरविण्यात असून आज शनिवारी १२३० मुलाखती झाल्या. हा महोत्सव शनिवार (दि.९) आणि रविवार (दि.१०) रोजी भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदान येथे असून केवळ महिलांसाठी असलेल्या या मेळाव्यात १२३० मुलाखती झाल्या. त्यापैकी ३५४ जणींना ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.
पिंपरीत लाइट रेल्वे धावणार
पिंपरी-चिंचवडमधील उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) मेट्रोपेक्षा कमी खर्चात धावणारी 'लाइट मेट्रो'चे नियोजन केले जात असून, त्याचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केले. यामुळे पुण्यासह पिंपरीमधील वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले !
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. मतदानाला 10 दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
अशा होणार पिंपरी-चिंचवड प्रभागनिहाय अंतिम लढती
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये 128 जागांसाठी 758 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्या उमेदवारांची प्रभाग निहाय माहिती पुढील प्रमाणे…
स्मार्ट पिंपरी-चिंचवड शहरासाठी भाजप उमेदवारांची शपथ
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शक, सुशासनयुक्त, विकासाभिमुख, गतीमान, आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आज निगडीतील…
चिंचवडमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे फोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करणा-या ‘इंद्रायणी थडी’ला सुरुवात; मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन
एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी गावजत्रा मैदानावर हा महोत्सव भरला आहे.
रिंग’ करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका – भापकर
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील प्रत्येक विकासकामाच्या निविदेत ‘रिंग’ होत आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकारी, प्रशासन आणि ठेकेदार संगनमताने ‘रिंग’ करुन करदात्या जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्थापत्य विषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे. स्थापत्यविषयक कामांना मोजकेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करुन त्यांच्यापैकी एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. त्यामुळे रिंग करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!
पिंपरी-चिंचवड : भाजपच्या बालेकिल्यात निर्धार परिवर्तनाच्या सभेला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद, सभेच्या निमित्ताने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली एकजूट, सभेच्या नियोजनात अनुभवी नेत्यांसह युवा कार्यकर्त्यांचा पुढाकर आणि नेत्यांची उत्साह निर्माण करणारी भाषणे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा ब्रिगेड मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याच्या इर्षेने कामाला लागली असून पक्षाकडून आगामी निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अनुभवी पदाधिकारी आणि युवकांचा समतोल साधून आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.
स्थायी समितीसाठी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी मागीलवर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे यावेळी देखील सर्वच सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
रंगांची उधळण करणार्या फुलझाडांची घट
पिंपरी चिंचवड : वसंताची चाहुल लागताच निसर्ग रंगाची उधळण करण्यासाठी सज्ज होतो. अशीच अनेक शोभेची फुलझाडे पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला, उद्यानात, टेकडी परिसरात बहरून दिसत होती. परंतु, वाढते शहरीकरण आणि पालिका उद्यान विभागाचे नेहमीचेच असणारे दुर्लक्ष अशा कारणांमुळे शहरातील शोभेच्या फुलझाडांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वेगाने घट होत आहे. याकडे उद्यानविभाग लक्ष देईल का? यावर मात्र प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस कारवाईत अब तक छप्पन
पिंपरी (पुणे) - शुक्रवारी पहाटे निगडीतील ओटा स्किम परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून शुक्रवारी पहाटे निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओटास्कीम परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
काळा खडक ते डांगेचौक पदपथ-रस्ते अतिक्रमण
काळा खडक ते डांगे चौक यामार्गावरील पदपथ व रस्त्यांवरील व्यापारी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरीक व आयटीचे कामगार त्रस्त झाले आहेत. जाधव कॉर्नर जवळील पदपथावर हॉटेल व्यावसायीकाने व गॅरेज चालकांनी अतिक्रमण केले आहे. काळा खडक जवळील पदपथ हिवाळी साहित्या विक्रेत्यांनी साहित्या मांडुन ठेवलेले आहे. मयुरेश्वर मंदीर चौकातील पदपथावर खाद्य पदाथांच्या हातगाड्या सर्रासपणे ठेवलेल्या आहेत.
इंद्रायणी थडीमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 88 लाखांची उलाढाल
भोसरी– भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या ग्रामीण महोत्सवाला शुक्रवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकाच दिवसात विक्रमी सुमारे तीस हजार लोकांनी भेट दिली. येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलना पसंतीची विशेष पावती मिळाली असून त्यामुळे ते चालवणाऱ्या महिला बचत गटांना मोठे पाठबळ मिळाले आहे. या एकाच दिवसात सुमारे 88 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा कोटींची टप्पा पार करेल असा विश्वास आयोजकांना व्यिक्त केला आहे.
त्या’ वास्तुविशारदाला दिरंगाई भोवली!
पिंपरी– संभाजीनगर येथील बस टर्मिनल आरक्षण विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वास्तुविशारद म्हणून नेमणूक केलेल्या मेसर्स पी. के. दास या ठेकेदाराची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे सुधारित नकाशे व अंदाजपत्रक वेळेत सादर न केल्याने ही कारवाई केली ाहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत महापालिका प्रशासनाने या ठेकेदाराला या प्रकल्पासाठी 25 लाख रुपये अदा केले आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या 15 जुलै 2015 च्या प्रस्तावानुसार ही रक्कम दिल्याची बाब उघड झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमातून खासदार अमर साबळेंचा वाढदिवस उत्साहात साजरा
चौफेर न्यूज – राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा ५६ व्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना उज्वल व आरोग्यदायी भवितव्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खासदार साबळेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनावश्यक व वायफळ खर्चाला बगल देत सामाजिक भान जपत कार्यकर्त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
पीएमपीएमएलमधून पीसीएमटी वेगळी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती – महापौर राहुल जाधव
चौफेर न्यूज – पीएमपीएमएल मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. तरी देखील आमच्या कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळते, त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये नेहमी जुन्या बस आढळून येतात तसेच बसेसची संख्या देखील अपुरी असते. पीएमपीएमएलचे अधिकारी आमच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करून पीएमपीएमएल मधून पीसीएमटी वेगळी करण्याची मागणी करणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)