Saturday, 6 October 2018

वाढत्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विशाल वाकडकर

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश येत असून लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले आहे. यावर अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही, अशा संवेदनाहिन मुख्यमंत्र्यांनी शहरातील व राज्यातील महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात फलकांना परवानगी बंधनकारक

पिंपरी – पुणे येथे शुक्रवारी (दि. 5) एक जाहिरात होर्डींग खाली कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जाहिरात फलकांना परवानगी घेणे बंधनकारक करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केल्या.

रहाटणीतील महिलेचा “स्वाईन फ्लू’ने बळी

पिंपरी – शहरात कहर केलेल्या स्वाईन फ्लू आजाराने मृत्यूंचा व बाधितांचा आकडा दिवसें-दिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजाराने शुक्रवारी (दि. 5) रहाटणी येथील एका 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी; जानेवारीपासून सातवा वेतन आयोग

यंदाच्या वर्षी राज्यातील लाखो शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी जोरात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जानेवारी २०१९ पासून या सर्वांना सातवा वेतन आयोग लागू होण्याच्या दृष्टीने शासनाने शुक्रवारी रात्री उशीरा महत्त्‍वाचे पाऊल उचलले आहे. याचबरोबर महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळणार असल्यामुळे सर्व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. 

कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात तिसरी

पिंपरी : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील सर्व क्षेत्रातील असंघटीत कामगारांना किमान वेतन मिळावे म्हणून देशभर पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने असंघटीत कामगार कॉंग्रेस सेल, राज्य सरकारशी संबंधित सर्व आस्थापना, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, सर्व महामंडळे आणि सर्व महानगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी लढा देत आहे. 

शाळा पाहणीसाठी पालिका पदाधिकार्‍यांचा दिल्ली दौरा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, सर्व गटनेते, शिक्षण समितीचे सदस्य आणि काही अधिकारी दिल्लीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या रविवारी (दि.7) ते मंगळवारी (दि. 9) अशा 3 दिवसांच्या दौर्‍यात तेथील शाळा व मोहल्ला क्‍लिनिकची पाहणी केली जाणार आहे. 

निगडी बस स्थानकाला सिमाभिंत बांधण्याची दिपक खैरनार यांची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- निगडी जकात नाका येथे असणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बी.आर.टी बस स्थानक येथे सिमाभिंत नसल्या कारणाने तेथे अपघातांची मालिका वाढत आहे.त्यामुळे त्या बसस्थानकाच्या येथे सिमाभिंत बांधण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निंबध स्पर्धा

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व व निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्याचे महापौरांचे आदेश

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्यात यावे, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या ‘एजन्सी’वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

‘राजमुद्रा स्टिकर’चा वापर करुन ‘तोतया आमदारांचा’ पिंपरी चिंचवडमध्ये सुळसुळाट

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात असंख्य फोर व्हीलर वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य’ अशा आशय असलेल्या चिन्हांचे राजमुद्रा स्टिकर लावून भूरट्या कार्यकर्त्यांना आमदार झाल्या सारखं वाटू लागलंय तसा तोरा मिरवला जात आहे. तसेच शहरात काही कार्यकत्यांच्या गाडीवरती ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ अशा आशयाचे चिन्हे सर्रास वापरली जावू लागली आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून आमदारांनीही कार्यकर्त्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.

मतदार व्हायचंय, नाव नोंदणी करा!

पुणे - जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढविण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाने या महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव-पत्यांमधील दुरुस्ती अथवा दुबार नावे वगळता येणार आहे. ही मोहीम रविवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेमुळे अधिकाधिक नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यास मदत होणार आहे. 

पिंपरी विधानसभेवर ‘भाजप’चा डोळा, उमेदवारीसाठी अनेकांची रांग

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड  शहरातील पिंपरी विधानसभा मतदार संघ सध्या भाजप आणि आरपीआय (आठवले गट) यांच्या युतीत आहे. मागीलवेळी चंद्रकांता सोनकांबळे या शिवसेनेकडून दोन हजार मतांनी पराभूत झाल्या होत्या. ही जागा आरपीआयकडे असली तरी सध्या भाजपाकडून पिंपरी विधानसभा लढण्यासाठी अनेक बलाढ्य उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या या जागेवर भाजपाचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच येत्या निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे घेऊन मुंबईतील एक जागा आरपीआयला देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.