AFTER YEARS of neglecting the Pavana and Indrayani rivers passing through its jurisdiction, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are now seriously considering improving the status of these two rivers.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 February 2019
एच. ए. कंपनीच्या जागा विकत घेण्यास महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए) कंपनी सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे अतोनात हाल होत असून, त्यांचे पगारसुद्धा रखडलेले आहेत. यातून मार्ग काढणे जरुरीचे आहे. अन्यथा अनेक कामगारांचे संसार उध्वस्त होतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने एच. ए. कंपनीच्या जागांची खरेदी करण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 32 अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत; पोलीस अधिका-यांच्या नावाची यादी व्हायरल
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिका-यांपैकी 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत आहेत. याबाबतची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही यादी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.
‘अण्णासाहेब मगर स्टेडीयमचा तीस दिवसात ताबा द्या’
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमचा महिन्याभरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ताबा हस्तांतरित करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी केली आहे. तसेच ताबा न दिल्यास होणा-या कायदा आणि सुव्यवस्थेला महापालिका जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा; चार लाख 77 हजार मतदार
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील 73 लाख 69 हजार 141 मतदार मतदान करतील. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत दोन लाख एक हजार 480 नवीन मतदारांची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठरला असून चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली
Pimpri: शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रासह संयुक्तपणे सुधारीत करण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा तयार करत आहेत.
स्मार्ट सिटीवर पुण्याऐवजी आता पिंपरीचे पोलीस आयुक्त
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे.
Sangvi: शहरात मटका, गुटखा जोरात, औद्योगिकनगरी झालीय ‘क्राइम सिटी’ – अजित पवार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात खून, मारामाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात 70 खून, 93 जणांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराच्या औद्योगिक, कामगारनगरी या लौकिकला तडा गेला आहे. शहरात मटका, गुटख्याच्या धंदे जोरात सुरू आहेत. औद्योगिकनगरीची ओळख ‘क्राइम सिटी’ झाली आहे अशी टीका करत याला जबाबदार कोण?
Soon, e-bikes will ease commute in IT parks, outskirts
Putting existing losses aside, vendor of cycle-sharing project to launch new wave of micro-mobility vehicles run on batteries by February-end.
71 slums to be developed in Pimpri Chinchwad under smart city project
Pimpri Chinchwad: A total of 71 slum rehabilitation projects will be carried out in the twin township under the smart city project.
पिंपरी “आरटीओ’ बनले पहिले “ड्रेस कोड’चे कार्यालय
पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचारी आता एकाच “ड्रेस कोड’मध्ये दिसत असून राज्यात ड्रेस कोड वापरणारे पहिले आरटीओ कार्यालय म्हणून पिंपरी-चिंचवडच्या कार्यालयाची ओळख निर्माण झाली आहे.
भोसरी “पीएमपी’चे कार्यालय नवीन इमारतीत
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या भोसरी आगाराचे रुपडे लवकरच पालटणार आहे. भोसरी पीएमपी आगाराच्या आगार प्रमुख व इतर कामगारासाठी नुकतेच नवीन कार्यालय उभारण्यात आले असून कार्यालयाचे उद्घाटन लवकरच पीएमपीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या हस्ते होणार आहे.
“सीएफसी’ची जबाबदारी “आयटी’ अधिकाऱ्याकडे
पिंपरी- शहरातील नागरी सुविधा केंद्रांची जबाबदारी माहिती व जनसंपर्क विभागाकडून काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी ती माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बदलाचा आदेश दिला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर पोलिसांची कडक उपाययोजना
चौफेर न्यूज: शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 6 महिन्यांत पिंपरी चिंचवड शहर
आणि चाकणमधील तब्बल 40 जणांना तडीपार केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार केलेल्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचाही
समावेश आहे.
बर्डव्हॅली ‘मजूर शिल्प’ उद्यान येथे रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन
चौफेर न्यूज : महाराष्ट्र सरकारने रिक्षा परवाना खुला केला असून पिंपरी चिंचवड शहरात 7000 पेक्षा अधिक नवीन रिक्षा आल्या आहेत. नवीन रिक्षासाठी नवीन रिक्षा स्ट
ॅन्ड उपलब्ध झाले पाहिजे. पोलीसांकडून मात्र रिक्षा चालकांना रिक्षा स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. याबाबत रिक्षा
चालकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मात्र वेळ नाही.
आमदार जगतापांच्या हस्ते संजय गांधी पेन्शन योजना पत्रांचे वाटप
चौफेर न्यूज – चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने 30 विधवा महिला, 20 ज्येष्ठ नागरिक, 10 अपंग, 3 मूकबधिर, 2 कर्णबधिर आणि घटस्स्पोटीत अशा एकूण 68 नागरिकांना योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार लक्ष्मन जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)