Saturday, 6 January 2018

Smart City plan implementation to take off soon

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Smart City Limited (PCSCL) board of directors has asked to streamline development works in the city.
These include Wi-Fi, improvement of public transport, streetscape design, urban design, landscape design, environmental services, solid waste management, e-governance, security and surveillance.

Construction of 1st Metro station in Pimpri begins

PIMPRI CHINCHWAD: Maharashtra Metro Rail Corporation Limited has started constructing the first station at Sant Tukaramnagar on Pimpri-Swargate route.

PCMC panel chief opposes BRTS on Pune-Mum route

PIMPRI CHINCHWAD: In a major embarrassment to the ruling Bharatiya Janata Party and the civic administration, the chairperson of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) standing committee, Seema Savale, said the civic body should not launch the BRTS service on Pune-Mumbai highway without implementing adequate safety measures.

Civic body to carry out fire safety audit in restaurants

PIMPRI CHINCHWAD: Following the recent fire incident in Mumbai, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to carry out survey of hotels and restaurants under its jurisdiction. The civic body plans to check misuse of spaces on terraces and parking lots, also encroachment on footpaths.

PCMC goals to higher cleanliness rating

Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has urged civic officials to help Pimpri Chinchwad improve its ranking under the Swachh Bharat Abhiyan cleanliness survey. 

फ्लेक्‍स हटवण्यासाठी ठेकेदाराला एक कोटी

पिंपरी – शहरातील अवैध जाहिरात फलक हटविण्यासाठी तसेच त्याचे लोखंडी साहित्य नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन वर्षे कालावधीच्या कामकाजासाठी या ठेकेदाराला एक कोटी रूपये देण्यात येणार आहेत.

ठेकेदाराला “जीएसटी’पोटी आठ लाख देणार

पिंपरी – महापालिकेच्या मुख्य इमारतीची यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यबळाद्वारे दैनंदिन साफसफाई करण्यासाठी जुलै 2016 मध्ये दोन वर्षे कालावधीसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली. मात्र, 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे ठेकेदाराला एक वर्षे कालावधीसाठी 18 टक्के जीएसटीपोटी 8 लाख रूपये वाढवून देण्यात येणार आहेत.

नागपूरच्या धर्तीवर रस्तेखोदाई

भूमिगत सेवा वाहिनी टाकणे किंवा दुरुस्तीसाठी रस्ते खोदाईसंदर्भात महावितरण आणि महापालिका यांच्यातील सामंजस्य करारासाठी नागपूरच्या धर्तीवर धोरण तयार करण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. हा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

रस्ते डांबरीकरणांचे विषय तहकूब

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते डांबरीकरणाचे विषय तहकूब केले आहेत. स्थापत्य विभागाने यापुर्वी मंजुरी दिलेल्या रस्त्यांची कामे अगोदर सुरु करावेत, त्यानंतरच नवीन रस्ते डांबरीकरणांच्या विषयांना मंजुरी दिली जाईल, अशी भूमिका स्थायी समितीने घेतली.

सांगवीत “पाडापाडी’ कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सांगवीच्या प्रभाग क्रमांक 32 येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

पवनाथडी जत्रेत फलकबाजीवरून ‘राडा’; राष्ट्रवादीसह भाजपचे अनधिकृत फलक हटविले

यंदाच्या वर्षी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पवनाथडी जत्रेत आज फलकबाजीवरून ‘राडा’ झाला. जत्रेत येणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांवरून सांगवीतील राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामध्ये ‘शाब्दिक’ चकमक उडाली. हा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

‘राष्ट्रध्वजा’साठी १०७ मीटरचा उंच खांब

निगडीत उभारणीचे काम पूर्ण; १२ जानेवारीला रंगीत तालीम

पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे १०७ मीटर उंचीचा खांब उभारण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १२ जानेवारीला रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) प्रत्यक्षात ध्वजउभारणीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे, असा दावा पिंपरी पालिकेकडून करण्यात येत आहे.

काळेवाडी-रहाटणीत आशीर्वाद कुणाचा?

पिंपरी - काळेवाडी, रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा बांधकामांना आशीर्वाद असल्याचे नागरिकांकडूनच बोलले जात आहे. 

सुविधांचा ‘डोस’ हवा

पिंपरी - महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी प्रमुख आजारांशी संबंधित औषधे बऱ्याचदा बाहेरून विकत घ्यावी लागतात. पार्किंगसाठी असलेली अपुरी व्यवस्था, रुग्णाच्या नातेवाइकांना बसण्यासाठी कमी प्रमाणात असलेल्या खुर्च्या तर, उपलब्ध डॉक्‍टरांचे अल्प प्रमाण अशा कोंडीत हे रुग्णालय सापडले आहे. 

15 more Shivshahi buses at Vallabhnagar depot

PIMPRI CHINCHWAD: Encouraged by the response, the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) will add 15 Shivshahi AC buses to the existing fleet of eight at the Vallabhnagar depot.

बेशिस्त वाहनचालकांवर 1298 सीसीटीव्हीची “नजर’

गुन्हे दाखल वाहन चालकांची संख्या
एकूण गुन्हे – 4,50,475
दंड भरलेल्या वाहनचालकांची संख्या – 47,336
दंड न भरलेल्या वाहनचालकांची संख्या – 403139
एकूण महसूल – 1082060
एकूण सीसीटीव्ही – 1298

 जरी पोलीस रस्त्यावर नसले तरीही वाहनचालकांकडून सिंग्नल पाळले गेले पाहिजे. आपण सीसीटीव्हीच्या निदर्शन कक्षेत आहोत, हे वाहनचालकांनी लक्षात घ्यायला हवे.
अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आकुर्डी – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये एईजीआयएस ग्लोबल लिमिटेड (इसार ग्रुप) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

समरसता गुरुकुलमला ब्लॅंकेट भेट

चिंचवड – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या वतीने वैद्यकीय सामाजिक अधीक्षक एम. बी. शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते चिंचवड मधील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला 50 ब्लॅंकेट भेट देण्यात आले.