Sunday, 8 July 2018

#PrideOfPimpriChinchwad डॉ प्रेरणा कालेकर मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत; फेसबुक लाईकद्वारे मतदान

#PrideOfPimpriChinchwad Dr Prerna Kalekar from #NigdiPradhikaran entered into finalist from Maharashtra. Your support will help her to win prestigious Mrs India award. Please LIKE below link and do spread this post to max proud PCMCkar 🙏

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1565573956884562&id=1055227461252550

पाऊस चोख बजावतोय पालिकेची जबाबदारी

वाकड – मुळशी आणि मावळच्या ग्रामीण भागात तीन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे थेरगाव मधील केजुदेवी बंधारा तुडूंब भरून वाहत आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाह गेल्या कित्येक महिन्यांपासून नदीचा पिच्छा पुरवणाऱ्या जलपर्णीला धुवून नेत आहे. जलपर्णी काढण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी पाऊस सध्या चोख बजावताना दिसत आहे.

गॅलरीमध्ये अडकलेल्या बालकाची सुखरूप सुटका

पिंपरी : लॅच लॉकचा दरवाजा बंद झाल्याने तीन वर्षीय मुलगा गॅलरीत अडकला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या 15 मिनिटांमध्ये त्यांची सुटका केली. ही घटना वाकड येथे शुक्रवारी रात्री घडली. 

ऐन पावसाळ्यात गांधीनगरवासियांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी – तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह याविषयी कोणाला बोलायचे, किती निवेदन द्यायची अन्‌ किती आंदोलन करायची?, महापालिका प्रशासनावर याचा काही एक परिणाम पडत नाही. जगताय जगा मरताय तर मरा, अशी आमची अवस्था झाली आहे. याच्यावर कोणीच तोडगा काढायला तयार नाहीत. निवडणुकीनंतर नगरसेवक फिरकत नाहीत, अशा व्यथा गांधीनगरवासियांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना मांडल्या.

चेंबरमध्ये युवकांनी केले वृक्षारोपण

पिंपरी – प्रभाग 10 आणि 11 मधील अंतर्गत रस्त्यांच्या मध्यभागी असणाऱ्या चेंबरची दूरवस्था झाल्याने धोकादायक झालेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा सेनेतर्फे चेंबरमध्ये वृक्षारोपण करुन अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भोसरीत बैठक

भोसरी – पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्यातर्फे शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी या ठिकाणी नियोजन सभा संपन्न झाली.

विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाची नियमावलीच नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध प्रभागात विकास कामे होत असतात. मात्र, या कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन  करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. महापौरांच्या पत्रान्वये पुढील कार्यवाही केली जाते, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

New software for Aadhaar enrolment machines

PUNE: UIDAI will introduce a new software for Aadhaar machin .. 

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा; प्रकाश जावडेकर यांची घोषणा

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

६ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान नोंदणी करण्याचे आवाहन

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी सुभाष जयसिंघानी

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ निगडीचा 30 वा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि. 6) पार पडला. कार्यक्रमात रो. सुभाष जयसिंघानी यांची रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिवपदाची सूत्रे म्हणून जगमोहन सिंग भुर्जी यांच्याकडे देण्यात आली.

[Video] पिंपरी चिंचवडकरांचा पालख्यांना निरोप व इतर महत्वाच्या बातम्या


'साथ चल' दिंडीमध्ये संस्था, सोसायट्यांचा सहभाग

पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आई-वडिलांना सांभाळण्याची शपथ घेतली. 

आमदार जगतापांनी केले तुकोबारायांच्या पालखीचे सारथ्य

श्रीक्षेत्र देहू येथून आज कासारवाडी मध्ये आलेल्या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालखीरथाचे सारथ्य केले. त्यामुळे ते सोहळ्याचे एक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला.

माऊलींच्या पालखीत आमदार महेश लांडगे यांचा पर्यावरणपूरक ‘संदेश’ देणारा पेहराव!

पिंपरी (Pclive7.com):- राज्य शासनाने २३ जून रोजी प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय न घेता, निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरु झाली. हजारो किलो प्लास्टिक आणि लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजकाल सर्वच वस्तू प्लास्टिकच्या मिळत आहेत. त्यामुळे प्लास्टिकला नागरिकांनी जगण्याचा मूलाधार मानला आहे. प्लास्टिक मानवी जीवनासाठी आणि पृथ्वीसाठी अतिशय घातक आहे. प्लास्टिकचे हे अतिक्रमण रोखण्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे सज्ज झाले आहेत. त्यांनी आज माऊलींच्या पालखीचे स्वागत करताना पर्यावरण पूरक संदेश देणारा पेहराव केला होता.