Tuesday, 20 March 2018

‘वायसीएम’मध्येही आता दिव्यांगांना मिळणार प्रमाणपत्र

अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) द्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. दर गुरुवारी या प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. या दिवशी सुमारे आठ प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांसाठीच येथे सोय करण्यात आली आहे.

मुंबईतील जुन्या लोकल पुणेकरांच्या दावणीला!

खिळखिळीत झालेल्या लोकलबाबत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने टप्प्याटप्प्याने या लोकल बदलण्यात आल्या.

पार्किंगचा प्रश्‍न बनला जटिल

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न जटिल बनत चालला आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर पार्किंगसाठी वाहनतळाची अपुरी सुविधा आहे. पर्यायाने, रस्त्यावरच वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने लावली जातात. काही वाहने तर चक्क पदपथावर लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांचीदेखील गैरसोय होते. निगडी ते दापोडी या अंतरातील पार्किंग समस्येबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याचा हा सविस्तर वृत्तांत. 

पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणाची मागणी

खासदार शिरोळे यांचे केंद्रीय संरक्षणमंत्र्यांना पत्र

पुणे मेट्रो प्रकल्पासह प्रस्तावित जलद बस वाहतूक योजनेसाठी (बीआरटी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) आणि पुणे महापालिकेनेही रस्त्याचे रुंदीकरण आणि भूसंपादनाचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवला असून, येत्या काही दिवसांत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

Sparrow Day: Given shelter, sparrows can still chirp in cities

PUNE: A nearly year-long study by the city-based Ela Foundation and the state forest department found that while the visibility and numbers of the common house sparrow has been on the decline but appropriate shelters can still save them.

चिमण्यांचा अधिवास अबाधित राखणे आवश्यक

चिऊ ताई, चिऊताई दार उघड’, ‘एक घास चिऊचा..’ अशा चिऊताईच्या अनेक  गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. जणू ती आपल्या घरातील एक सदस्यच होती. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या चिमणीची संख्या कमी झाली आहे. भ्रमणध्वनीच्या मनोरर्‍यांमुळे ही संख्या कमी झाले असल्याचे काहींचे म्हणणे असले, तरी याला अद्याप शास्त्रीय आधार मिळालेला नाही. सिमेंटची जंगले, वृक्षतोड यामुळे  चिमण्यांच्या अधिवासावर गदा आली असून, त्यांची संख्या या कारणांमुळे नक्कीच कमी झाली आहे. चिमणीची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, आहे त्या चिमण्या व त्यांचा अधिवास कायम आबाधित ठेवल्यास त्यांची संख्या नक्की वाढेल आणि त्यांचे चिवचिवणे पुन्हा एकायला मिळेल, असे मत निसर्गअभ्यासकांनी जागतिक चिमणी दिवसानिमित्त व्यक्त केले.

कृत्रिम घरट्यांत चिमण्यांचा चिवचिवाट

पुणे - काँक्रिटच्या जंगलात चिमण्या कृत्रिम घरट्यांचा आधार घेऊ लागल्या आहेत. या घरट्यांत चिमण्यांच्या प्रजननाचे प्रमाण ७२.६ टक्के आहे. ब्राह्मण मैना, साळुंकी, दयाळ, खार, ग्रेट टीट यांसारख्या अन्य प्रजातींच्या पक्ष्यांपेक्षाही चिमण्या विशेषत्वाने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करू लागल्याचे वन विभाग आणि ईला फाउंडेशनने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

अनधिकृत बांधकामांसाठी पाणीपट्टी दीडपट

पिंपरी - शहरातील अनधिकृत मालमत्ताधारकांकडून नळजोडासाठी दीडपट पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे. एप्रिलपासून हा बदल करण्यात आला आहे. महापालिकेने अनधिकृत नळजोड कायम करण्यासाठी आखलेल्या नवीन धोरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. 

महापालिका नेमणार माध्यम समन्वयक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. ही संस्था सोशल मिडीया, जिंगल्स, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार आहे. सुमारे 25 लाखांचा खर्च त्यावर होणार आहे.

आवास योजनेसाठी पर्यावरण सल्लागार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठीही स्वतंत्र पर्यावरण सल्लगार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेकडून या प्रकल्पासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात पर्यावरण सल्लागारांचा समावेश केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

पिंपरीत साकारणार भिमसृष्टी; शिल्पसृष्टी तयार करण्याचे काम अंतिम टप्यात

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित शिल्पसृष्टी पिंपरी-चिंचवड शहरात उभारली जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही शिल्पसृष्टी साकरणार असून कलाकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.

एफएसआयची केवळ वल्गना

पुणे - शहरातील मेट्रोमार्गांभोवती प्रत्येकी ५०० मीटरच्या कॉरिडॉरची अधिसूचना राज्य सरकारने अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे पुनर्विकासाचे शेकडो प्रस्ताव रखडले आहेत. परिणामी राज्य सरकारने मेट्रोमार्गांभोवती मंजूर केलेल्या चार ‘एफएसआय’ची घोषणा ही केवळ वल्गना ठरली आहे. 

भटक्‍या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीती

पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, एप्रिल ते जानेवारीअखेरपर्यंत नऊ हजार ५६८ श्‍वानदंशांच्या घटनांची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

शहर भाजपचे २८ पासून घर चलो अभियान

पिंपरी - भाजपच्या कामांची माहिती घरोघरी पोचविण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. 

राजकीय दबावामुळे रखडला वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथे गृहप्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मात्र, राजकीय दबावामुळे तो रखडला आहे. 

चाकण-तळेगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

चाकण-ऑटो हब असलेल्या येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर महाळुंगे इंगळे व खालुंब्रे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे असून रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, कंटेनर व ट्रेलरसारखी अवजड वाहने खड्डे चुकविताना थेट समोरच्या वाहनांवर जाऊन अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. अवजड वाहनांना या रस्त्यावरून दिवसा वाहतूक करण्यास बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बाल वैज्ञानिक स्पर्धेत आर्यनला सुवर्ण पदक

निगडी – येथील सिटी प्राईड शाळेत सहावीत शिकणाऱ्या आर्यन दहिवालने राडारोड्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची वीट तयार होऊ शकतात व त्याचा वापर बांधकामासाठी करता येऊ शकतो, असे संशोधन केले आहे. या संशोधनाने राज्य पातळीवरील होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे.