Saturday, 27 October 2018

PCMC carries out 4-day anti-encroachment drive

NAVI MUMBAI: The Panvel City Municipal Corporation (PCMC) be .. 


PCMC to develop six spots along two rivers

PIMPRI CHINCHWAD: The civic body will develop six spots along the Pavana and the Indrayani as part of its river development project.
Mayor Rahul Jadhav on Thursday said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will develop boating facilities, cycle tracks, pathways and children’s play zone in these spots as the area along the river is a no-development zone.

मेट्रो डीपीआरचे पालिकेत सादरीकरण

पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या वाढीव मेट्रो मार्गिकेच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालाचे (डीपीआर) सादरीकरण महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर गुरुवारी (दि. 25) केले. या 4.9 किलोमीटर अंतराच्या वाढीव मार्गासाठी 1,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्यातच पूर्ण करण्यास महामेट्रो प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर डीपीआर मंजुरीसाठी पालिका राज्य शासन व केंद्राकडे पाठविणार आहे.

गुरुकुल मधील वंचित मुलांचा सत्कार व नेत्र तपासणी

पिंपरी (Pclive7.com):- आदित्य माने व विक्रम माने यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या सहकार्याने चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील वंचित ४०० मुलांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. अमेरिकेतून खास आयात केलेल्या अत्याधुनिक नेत्र तपासणी मशिनद्वारे येथील ३ ते १० वयोगटातील लहान मुलींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गुरुकुल मधील वर्गात प्रथम येणाऱ्या मुलांचा प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरातील दत्तक योजनेतील 45 खेळाडूंसाठी 1 कोटींचा खर्च

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 45 खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खेळाडूना दत्तक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांना 2 वर्षे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रूपये खर्चाला क्रीडा समितीने शुक्रवारी (दि.26) मंजुरी दिली.

‘लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुलविण्याचा भाजपचा निर्धार’

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुललेच पाहिजे. या इर्षेने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपचे खासदार निवडून आणून मित्र पक्ष शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्यात यावी, असा निर्धार भाजपच्या आढावा बैठकीत करण्यात आला. 

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छ पवनामाई अभियानात ज्युनिअर मकरंद अनासपुरे करणार श्रमदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वात पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकार, सिने अभिनेते, अभिनेत्री, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात उपस्थित राहून श्रमदान केले.

अनधिकृत नळजोडांवर होणार कारवाई

पुणे : सोमवारपासूनच पाणीकपातीची घोषणा केल्यानंतर आता महापालिका प्रशासन अनधिकृत नळजोडांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. दिवाळीनंतर कारवाईची ही धडक मोहीम सुरू होणार आहे. महापालिका हद्दीत 35 हजारांपेक्षा जास्त अनधिकृत नळजोड आहेत. मात्र यातून सर्रास पाणीवापर केला जातो. यातील अनेक नळजोडांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होतो. 

चिखली – स्पाईनरोड परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने चिखली परिसरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डींगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 37 बेकायदा फ्लेक्स आणि सुमारे 100 होर्डींग काढून टाकण्यात आले. महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जुना आरटीओ चौक, चेरी चौक, स्पाईनरोड भाजी मंडई परिसर वक्रतुंड हॉटेल, साने चौक भाजी मंडई, शिवम मार्केट, साने चौक, मथुरा स्विट होम, कस्तुरी मार्केट या ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते.

रोजगारनिर्मीतीसाठी 2 व 3 नोव्हेंबरला बुके सजावट कार्यशाळा

पिंपरी चिंचवड : संत तुकारामनगर येथील ओम फ्लॉवर इन्स्टिट्यूटच्यावतीने येत्या 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी फुले सजावट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा संत तुकारामनगर पिंपरी येथील ऍटलास कॉलनी हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे संस्थापक केशव त्रिभुवन यांनी दिली.

काँग्रेसची सीबीआय-एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने

पिंपरी चिंचवड : केंद्र सरकार ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करून दबाव वापरत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने आज शुक्रवारी आकुर्डीतील सीबीआय-एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

स्मार्ट सिटी’तील करमणूक फुकाची! यांची यत्ता कंची?

गेल्या दोन-तीन महिन्यांचा आढावा घेतला, तर पिंपरी-चिंचवडमधील या राजकारण्यांना तुमची ‘यत्ता कंची’ असे विचारण्याची वेळ आली आहे. कारण महापालिकेत डुकर, कुत्रे, घुबड घेवून नगरसेवक येवू लागले आहेत. हे कमी आहे म्हणून की काय आमदार आणि खासदारही बेताल झाले आहेत. ‘शहराचा विकास गेला चुलीत, आपल्या प्रसिध्दीचे ढोल वाजत राहिले पाहिजेत’ असा ‘स्वच्छ हेतू’ सर्वांचा आहे. त्याचमुळे ‘बदनाम ही सही, नाम तो पहचानासा हो गया ना…!’ अशी त्यांची भूमिका आहे. दुर्दैवाने या शहरात अशा वाचाळवीर, बोलभांडांना जाब विचारणारी माणसं किंवा संघटना नाहीत. याचमुळे सगळी वाट लागली आहे.

गुटखाबंदीची ‘ऐशी की तैशी’

पिंपरी - राज्यात गुटखाबंदी लागू झाली असली तरीही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा, सुगंधित मिक्‍स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. 

रावेतमध्ये साकारतेय अत्याधुनिक स्मशानभूमी

वाल्हेकरवाडी - रावेतकरांना बहुप्रतीक्षित असलेल्या स्मशानभूमीच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ३२ अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे.

महिनाभराच्या कालावधीसाठी हिंजवडीतील वाहतुकीत बदल

चौफेर न्यूज :–  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत सध्या सुरू असलेले बदल पुढे एक महिन्यापर्यंत कायम ठेवले आहेत.

पिंपरीत झाड तोडणाऱ्यांवर आता मालमत्ता चोरीचा गुन्हा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे. फांदा छाटणीच्या नावाखाली संपूर्ण वृक्षच कापून नेण्याचा धंदा शहरात तेजीत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालिका नियम कठोर नसल्याने त्यास आळा बसत नाही. त्यामुळे नियमात बदल करून वृक्ष तोडीप्रकरणी मालमत्ता चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सूचना वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. सदर नियम अंमलात आल्यानंतर वृक्षतोड करणाऱ्यांना तुरूंगाची हवा खावा लागणार आहे.

जगण्याच्या हक्कासाठी मनपासमोर फेरीवाला आंदोलन

पिंपरी – फेरीवाला कायदा अस्त्विात येऊनही फेरीवाल्यांना त्यानुसार लाभ मिळत नाही. लाभ तर दूर परंतु कित्येक ठिकाणी फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे जगण्याच्या हक्‍कासाठी लढा देण्याची वेळ आली आहे, असे सांगत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले.

तणावपूर्ण शांततेत 140 अतिक्रमणांवर हातोडा

पिंपरी – अख्ख्या शहराचे लक्ष लागलेल्या भोसरीतील बहुचर्चित अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने आज हातोडा टाकला. चोख पोलीस बंदोबस्तात सुमारे 140 छोटी-मोठी दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षानंतर राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाने मोकळा श्‍वास घेतला आहे. आजपर्यंतची भोसरीतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

हिंजवडी बनतेय “गुन्हेगारीचे हब’

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हिंजवडी आयटी पार्क आता “समस्यांचे हब’ म्हणून नावारुपाला येत आहे. तेथील वाहतूक कोंडी तर जगप्रसिद्ध आहेच पण याठिकाणी गुन्हेगारीनेही आता डोके वर काढले आहे. रसिला खून प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करुनही महिलांची असुरक्षितता कायम असल्याचे शुक्रवारी (दि. 26) उघड झालेल्या तरुणीच्या अपहरण प्रकरणावरुन समोर आले आहे.

वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

पुणे – वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्‍यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे. जर एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्‍चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका आयुक्‍त शिवसेनेच्या “रडार’वर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणजे सत्ताधारी भाजपचे दलाल आहेत. आतापर्यंतच्या आयुक्‍तांमध्ये सर्वात निष्क्रीय आयुक्‍त म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.