रावेत : ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले देश-विदेशातील पुरस्कार हे त्याची साक्ष देतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी या आणि इतर अनेक ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 6 July 2017
मराठी शाळांना कर माफी द्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील खासगीसह सर्वच मराठी शाळांवरील मिळकत कर माफ करण्यात यावा, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले की, महापालिका हद्दीतील विविध मराठी शाळा कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मराठी संस्थांमधून शिक्षण घेत असलेले शहरातील अनेक विद्यार्थी चांगली गुणवत्ता प्राप्त करीत आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी गुणवत्तेत शहराचे नाव उंचावत आहेत. या संस्थाच्या शैक्षणिक पध्दतीचा शहरातल्या विद्यार्थ्यांना लाभ होत असून, त्यांच्या करिअरमध्ये सुलभतेने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमांच्या संस्थांना त्या शैक्षणिक कार्य करित असल्याने त्यांचा कर माफ करावा व याबाबतचा प्रस्ताव सक्षम समितीपुढे सादर करण्याच्या सुचनाही काळजे यांनी केल्या आहेत
विजय खोराटेंकडे आरोग्यचा अतिरिक्त पदभार
– आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश
पिंपरी – कोल्हापूर महापालिकेतील उपायुक्त विजय खोराटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त या पदावर रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे भूमी व जिंदगी विभाग, सार्वजिनक वाचनालये, प्रेक्षागृहाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच, आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभारही दिला आहे.
मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपर्यंत करा
सिटीझन फोरमची मागणी : संस्था, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन
पिंपरी – वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र व राज्याने मंजुरी देवून पुणे महामेट्रोने काम सुरुवात केली आहे. परंतु, पहिल्या टप्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यास केंद्राची तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केली आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन फोरमच्या वतीने तुषार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सुविधा केंद्रात अधिक सेवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामार्फत आता महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. उत्पन्न आणि रहिवासी दाखल्यासह ६९ प्रकारच्या ...
Bhosari land deal: Inquiry panel submits report on Eknath Khadse
The controversy pertains to a three-acre plot in Bhosari near Pune. Even as the land was earmarked for MIDC's use in 1968 and the state government had even published a gazette declaring the intention to acquire this land on November 11, 1971, records ...
टक्केवारीवर हल्लाबोल?
पिंपरी - महापालिका निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने गुरुवारी (ता. ६) शहरात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टक्केवारीच्या मुद्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, अजित पवार त्याचाच खरपूस समाचार घेणार असल्याचे समजते.
पराभवानंतर शहरातील पहिला दौरा
पिंपरी - महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चार महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर गुरुवारी (ता. ६) प्रथमच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी आक्रमकपणे विरोधकाची भूमिका बजावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भुशी धरणाकडे वाहनांना शनिवार-रविवारी दुपारनंतर “नो एन्ट्री’
लोणावळा – पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहतूककोंडी व सुरक्षा लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी बुधवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
विद्यापीठ मतदार नोंदणीची मुदत एक महिन्याने वाढवा
आमदार, नगरसेवकांसह पन्नास जणांचे निवेदन
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर मतदान संघाच्या मतदार नोंदणीची मुदत एक महिन्याने वाढवावी असे निवेदन आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह नगरसेवक आणि अनेकांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांना दिले आहे.
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर मतदान संघाच्या मतदार नोंदणीची मुदत एक महिन्याने वाढवावी असे निवेदन आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह नगरसेवक आणि अनेकांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांना दिले आहे.
आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीला आयएसओ मानांकन
पिंपरी – निगडी येथील आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे, सचिव प्रदीप खंदारे, मुख्याध्यापक लतीफ मणेर, मुख्याध्यापिका चैताली फाठक, इंदिरा शेट्टी, मोहिनी होतचंदानी यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
Subscribe to:
Posts (Atom)