Monday, 30 October 2017

Additional lane opened for traffic on road to IT Park

Pune: The traffic police has allowed vehicular movement on three lanes of the 1.8km-long road joining Shivaji chowk with Hinjewadi Phata on Katraj-Dehu Road bypass to reduce the traffic congestion at Hinjewadi IT Park.

पालिकेतील संगणक “अँटीव्हायरस’साठी 30 लाख खर्च

पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागातील संगणक यंत्रणेकरिता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी सहायक कर्मचारी वर्गही नियुक्त केला जाणार आहे. या दोन्ही कामासाठी 30 लाख रूपये खर्च होणार आहे.

“स्मार्ट सिटी’साठी 21 कोटींचा सल्लागार

पिंपरी – स्मार्ट सिटी योजनेच्या एरीया बेस डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत 1300 एकर जागेचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार संस्था नेमण्यात येणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अकरा नामांकित संस्थांनी स्वारस्थ दाखविले आहे. त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाणार असून त्यांना सुमारे 21 कोटी रुपये मेहनताना दिला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी वाढवली ‘धडधड’

पिंपरी - होणार... होणार... राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे गेली सहा महिने चर्चाच सुरू आहे. मात्र त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर विस्ताराचे वारे पुन्हा वाहू लागले. त्यामुळे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेक आमदारांना हायसे वाटले. पण याबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणाने शहरातील इच्छुक असणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची मात्र धडधड वाढविली आहे.

पिंपरी विधानसभेत भाजपाचा चेहरा कोण? इच्छुकांची ‘भाऊगर्दी’

पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता ‘काबिज’ करून शहरात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची त्यानुसार पक्षाने तयारी देखील सुरू केली आहे. मात्र पिंपरी विधानसभेत इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ झाल्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून पक्षश्रेष्ठींची चांगलीच ‘डोकेदुखी’ वाढणार आहे.

Commuters rail against PMPML fare hike; term it ‘steep and unfair’

“The hike is not only too steep, it is also unfair and illegal. Nationally and internationally, senior citizen and students are given concessions in almost every sector, but the PMPML has suddenly decided to increase the monthly fares, so much that everyone is up in arms against it.”

'सारथी'च्या तक्रारींवर पालिका करणार चिंतन

आयुक्त हर्डीकरांची सूचना: चार वर्षातील 48 हजार तक्रारींचा अभ्यास 

जगताप डेअरी रस्त्यावर जड वाहनांना बंदी

जगताप डेअरी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या कामामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडे सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी व कस्पटे वस्ती ते जगताप डेअरी या दोन मार्गावरून बस, खासगी बस, ट्रक व इतर जड वाहनांना सकाळी सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या कालावधीत प्रवेश बंद असणार आहे. ही बंदी जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये शासकीय बस, रुग्णवाहिका व अग्निशामकदल अशा अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.

दोन पर्यायी रस्ते

पिंपरी - हिंजवडी आणि वाकडमधील वाहतूक प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, तो लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. वाकड जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ते हिंजवडी असे दोन नवीन रस्ते तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. 

‘एफएसआय’बाबत लवकरच निर्णय - गिरीश बापट

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चटई क्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 
एसआरएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एफएसआय वाढविण्याच्या प्रस्तावावर विविध खात्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता नगरविकास खात्याकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात गेला आहे. मुख्यमंत्र्यांची त्यावर स्वाक्षरी झाल्यावर याबाबतची अधिसूचना निघेल आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळेल, असे बापट यांनी स्पष्ट केले. 

चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शो संपन्न

वाल्हेकरवाडी : चिंचवडमध्ये १०८ व १०९ वा आंतरराष्ट्रीय ‘ऑल ब्रीड चम्पिअन डॉग शो’ संपन्न झाला. या शो चे आयोजन पुना केंनेल कॉन्फेडेरेशन यांनी केले होते. या डॉग शो मुळे शहर वासियांना ३० ते ३५ प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी मिळाली व श्वान प्रेमींनी याचा आनंद लुटला. आज (ता.२९) सकाळी अकरा वाजल्यापासून वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मध्ये हा शो सुरु झाला.

प्राधिकरणाच्या नियमांमुळे लघु उद्योगजकांना भुर्दंड!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक 7 आणि 10 मध्ये उद्योगांना भूखंड दिले आहेत. त्यामध्ये लघु उद्योगांनी प्राधिकरण प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कमीतकमी 10 टक्के बांधकाम करून आपले उद्योग चालू केले आहेत. प्राधिकरणाने भूखंडाच्या कमीत-कमी 20 टक्के बांधकामाचा ठराव केला आहे. काही उद्योग अशा प्रकारचे आहेत की, त्यांना मोकळ्या जागेतच काम करावे लागते. त्यांना जादा बांधकामाची आवश्‍यकता नाही त्यांनाही 20 टक्के बांधकामाच्या नोटिसा काढल्या आहेत त्या रद्द कराव्यात. तसेच, काही उद्योगांनी पूर्वी 10 टक्के बांधकाम परवाना घेऊन रितसर बांधकाम पूर्ण केले आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही घेतला आहे. त्यांना वाढीव बांधकाम करायचे असल्यास त्यांना ज्यादा शुल्क (ए.पी.) भरायच्या नोटिसा आल्या आहेत, त्या रद्द कराव्यात. शुल्काच्या नावाखाली लघुउद्योजकांकडून वाढीव भुर्दंड आकारला जात आहे, असे गाऱ्हाणे लघुउद्योजक संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.

पार्किंगमुळे भोसरीतील रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी

भोसरी – टेल्को रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटता सुटत नाही. कित्येकदा निवेदन देऊन आणि तक्रार करूनही पोलीस व प्रशासन दोघांनीही या विषयाकडे डोळेझाक केली आहे. रस्त्यावरच होणाऱ्या पार्किंगमुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या शोरुम मालकांनी रस्त्यालाच पार्किंग झोन बनविले असल्याने भोसरी एमआयडीसीतील टेल्को रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते.

महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया भाजपानेही विरोधकांशी सलगी करण्यास सुरुवात ...

बीआरटी अभ्यासदौऱ्यावर उधळपट्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआयटीएस व अन्य प्रकल्पांच्या पाहणीसाठी दोन टप्प्यात एकूण ८५ नगरसेवक व १८ अधिकारी अहमदाबाद येथे अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर तब्बल ५० लाख रुपयांचा खर्च होणार असून, केवळ ...

विमानवारीची तिकिटे केली रद्द, महापालिकेला लाखोंचा भूर्दंड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि अधिका-यांची अहमदाबाद रॅली काढली आहे. ऐनवेळी सुमारे चाळीस जणांची तिकिटे रद्द केल्याने महापालिकेस लाखोंचा फटका बसला आहे. नियोजनाअभावी, हा फटका बसल्याने जागरूक ...

पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार

मुंबई : नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या शिफारशीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा आराखडा आता मुंबई महापालिकेचा विकास नियोजन विभाग तयार करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणापाठोपाठ आता पिंपरी ...

मेट्रोच्या कामात सेवा वाहिन्यांचा अडसर

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम नाशिक फाट्यापासून सुरू झाले. हे काम प्रगतीपथावर असतानाच, महामेट्रोने दुसऱ्या टप्प्यातील काम सीएमईपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या भागातील रस्त्यांवर ...

बांधकाम परवानगीतून मेट्रोची सुटका

पिंपरी – मेट्रो रेल्वेचे काम जलद गतीने करण्यासाठी परवानगीच्या जाचातून मेट्रो रेल्वेला मुक्त करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यापुढे मेट्रो रेल्वेला बांधकामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्याही परवानगीची आवश्‍यक लागणार नाही. तशी सुधारणाच कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेला किती बांधकाम आणि कशाप्रकारे बांधकाम करता येईल, यावर कुणाचे नियंत्रण असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.

बांधकामे नियमीतकरणासाठी मराठीतून माहिती पुस्तिका

पिंपरी – अवैध बांधकाम नियमीतकरण्याची प्रक्रिया पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरु केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तयार करण्यात आला असून अटी – शर्ती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. नियमावलीचे जाहीर प्रकटीकरण केले जाणार आहे. दोन दिवसात अर्जाचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अवैध बांधकाम नियमीतकरण प्रक्रियेबाबत नगरसेवकांनाही माहिती देण्यात येणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी मराठीतून माहितीपुस्तिका काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले