लोकसहभाग व लोकचळवळ यातून जन्माला आलेले #पवनाजलपर्णीमुक्त अभियानाची दखल घेत आता पालिका सुद्धा मदत करणार! हे अभियानाचे यश आहे. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ३० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अभियान आता ५ व्या आठवड्यात प्रवेश करत आहे. सामील व्हा सहकार्य द्या
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 14 December 2017
After allowing repeated digging of roads for years, PCMC decides 'it has to stop'
After allowing roads to be dug up for years, to lay various service lines, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided that it would no longer grant permission to do so, in order to curtail expenditure on repairing the damaged roads.
“कनेक्टिव्हिटी’च्या मर्यादांचे “सीमा’उल्लंघन!
– रस्ते विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मान्यता
– सत्ताधाऱ्यांकडून समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य
– सत्ताधाऱ्यांकडून समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य
पिंपरी – गेल्या 20 वर्षांपासून वंचित असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांना अखेर न्याय मिळाला. मुख्य शहर आणि समाविष्ट भाग यातील “कनेटिव्हटी’मध्ये सक्षम रस्त्यांअभावी मर्यादा येत होती. मात्र, सत्ताधारी स्थायी समितीने बुधवारी समाविष्ट गावातील रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. तसेच, शहरातील अन्य भागांत सुमारे 75 रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सभापती सीमा सावळे यांच्या कार्यकाळात समाविष्ट गावांच्या “कनेक्टिव्हिटी’तील मर्यादांचे “सीमा’उल्लंघन करण्यात सत्ताधारी भाजपा नेते यशस्वी झाले आहेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत!
पिंपरी – पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
नाशिक फाटा-चांडोली महामार्ग सहापदरी
पिंपरी - ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २९ किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या कामासाठी जवळपास एक हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत त्याची निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात पूर्ण केली जाईल,’’ अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
स्मारक की मध्यवर्ती ग्रंथालय?
पिंपरी - येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यामागे उभारलेली इमारत सावित्रीबाई फुले स्मारकासाठी प्रस्तावित असल्याची भूमिका सावित्रीबाई फुले स्मारक समितीची आहे. तर, या इमारतीत फक्त सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालय प्रस्तावित होते, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे या इमारतीत ग्रंथालयासाठी जागा ठेवून महापालिकेचे काही विभाग स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे.
First UDAN flight on Dec 22; early birds can get Rs 1 seats
Pune/Nashik: The first flights under the Union government's regional connectivity scheme, popularly known as UDAN, will take off on December 22. Incidentally, some early lucky passengers can book seats on these flights for just Re 1.
एक नगरसेवकाचा एकच फलक लागणार; महासभेच्या अजेंड्यावर प्रस्ताव
महापालिकेच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांच्या नावांच्या पाट्यांबाबत धोरण तयार करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार एका नगरसेवकाचा एकच फलक महापालिकेकडून लावण्यात येणार आहे. त्याचा रंग व आकारही सारखा असणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव २० डिसेंबर २०१७ रोजी होणा-या महापालिका सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील टळणार हेलपाटे
अचूक नोदींसाठी सरकार राबविणार ई प्रॉपर्टी कार्ड योजना
पुणे – बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी आता “ई फेरफार’ पाठोपाठ ‘ई प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकत पत्रिका) योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शहरांमध्ये एखादी मिळकत खरेदी केल्यानंतर प्रॉपर्टी कार्डावर नाव नोंदणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून प्रॉप्रटी कार्डवर खरेदीदारांच्या नावाची नोंद होणार आहे.
“ग्रीन थिएटर’ स्पर्धेत कन्या विद्यालयाचे यश
पिंपरी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, इकोफोक्स, जय नाटक कंपनी, उन्नती चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रीन थिएटर फेस्टीवल’ स्पर्धेत पिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयाने शहरीकरण शाप की वरदान या विषयावर आधारीत एक श्वास गुदमरलेला ही एकांकीका सादर केली.
डी. वाय. फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद
आकुर्डी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने बायोथेरपीटिक्स ऍण्ड बायोनॅटिकल टेक्निक्स या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्राध्यापकांनी घेतले कौशल्य विकासाचे धडे
पिंपरी – ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने रिसेंन्ट ट्रेंडस इन इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर प्राध्यापकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली. त्यात प्राध्यापकांनी बदलत्या शिक्षण पध्दतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयीचे धडे घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)