Monday, 2 June 2014

रिक्षा मीटरसक्तीसाठी 'ऑनलाईन' स्वाक्षरी मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा व्यावसायिकांनी मीटरसक्ती धाब्यावर बसविली आहे. याविरोधात पिंपळे सौदागर येथील रोझ लँड रेसिडेन्सी आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने 'ऑनलाईन' स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त सतीश माथुर, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्याकडे यासंदर्भात दाद मागण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to charge for removal of garbage

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to charge Rs 100 per 1,000 sqft for removing garbage from privately owned land.

PCMC plans makeover to woo tourists

A children's park with adventure sports, a planetarium and an open-air auditorium are among the many 'tourist attractions' set to be developed in Pimpri Chinchwad.

.....अखेर ते पेज बंद

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेले फेसबुक पेज तसेच रियॅलिटी ऑफ इंडिया नावाचे फेसबुक पेज हॅक करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व संतापजनक पोस्ट टाकल्याच्या प्रकरणी सर्वत्र आयटी कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिवसाखेर हे आक्षेपार्ह पेज ब्लॉक करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र पडसाद

'सोशल मिडीया'वरून राष्ट्रपुरूषांच्या केलेल्या अवमान प्रकरणाचे पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) तीव्र पडसाद उमटले. दगडफेक, निषेध रॅली, सभा, निदर्शने करत चौकाचौकात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला. शहरातील अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र होते. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही अनेक नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंद केले.

स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पश्चिम महाराष्ट्र प्रातांचा पहिल्या वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाचा समोरोप समारंभ आज (शनिवारी) निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत मैदानावर पार पडला. त्यामध्ये 131 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले आहे. दंडयुध्द, नियुध्द, लेझीम आणि योगासनांनी ही समारंभ रंगला.

'वायसीएम'मध्ये पंधरा दिवसांपासून सीटी स्कॅन बंद

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयातील सीटी स्कॅन सेंटर मागील पंधरा दिवसांपासून बंद असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बंद पडलेले सिटी स्कॅन सेंटर त्वरीत चालु करण्याची मागणी इंडियन युथ काँग्रेसने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. चालु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेतून 31 अधिकारी व कर्मचा-यांची सेवानिवृत्ती

पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून आज (शनिवारी) 31 मे रोजी अधिकारी व कर्मचा-यांची सेवानिवृत्ती झाली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या समारंभात शाल, स्मृतिचिन्ह, भविष्यनिर्वाह निधी आणि सेवाउपदान धनादेश सुफुर्द करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

बसथांब्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आकुर्डीत 'छत्री' आंदोलन

पिंपरी शहरातील अनेक ठिकाणी पीएमपीएमएल बस थांब्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आज (शनिवारी) आकुर्डी चौकातील पीएमपीएलच्या बस थांब्यावर कष्टकरी महासंघाच्या वतीने आयोजित आंदोलनात प्रवाशांनी डोक्यावर छत्र्या धरून निषेध नोंदविला. चुकीचे थांबे करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी व उन्हाची, पावसाची झळ बसणा-या प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

‘इको अ‍ॅम्ब्युलन्स’साठी एमआरसीची आर्थिक मदत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इको अ‍ॅम्ब्युलन्स’ उपक्रमासाठी निगडीमधील एमआरसी लॉजिस्टीक्स्‌ कंपनीतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश कंपनीचे महाव्यवस्थापक राजपाल आर्या यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

अस्वच्छ भुखंडांच्या स्वच्छतेसाठी दंड आकारणीचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोकळ्या भुखंडांची स्वच्छता राखणे संबंधित जागेच्या मालकांना बंधनकारक आहे. मात्र, अशी स्वच्छता होत नसल्याने स्वतः कचरा उचलणा-या आयुक्त राजीव जाधव यांनी अस्वच्छ मोकळ्या भुखंडांच्या स्वच्छतेसाठी जागामालकांकडून प्रतीगुंठा शंभर रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

कचरा उघड्यावर टाकणा-या व्यावसायिकांवर होणार कारवाई

शहरातील कोणत्याही भागातील व्यवसायिकांनी कचरा उघड्यावर टाकल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल असा इशारा पिपंरी -चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना यांनी दिला आहे.
कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायिकांची दुकाने आहेत. येथील रफिक रईस शेख या व्यवसायिकाला वेगवेगळ्या ठिकाणचा आणलेला भंगार माल निवडून उरलेले बिनकामाचा भंगार माल स्वराज रेसिडेन्शियल सोसायटी मागील मैदानात ट्रकने आणून टाकताना फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरिक्षक विभागामार्फत पकडण्यात आले. याबरोबरच त्याच्याकडून  5 हजार रूपये दंड आकारण्यात आला.