Tuesday, 8 July 2014

आयुक्तांच्या बंगल्यावर तब्बल २४ कर्मचारी

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी किती कर्मचारी असावेत, याबाबत महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमात स्पष्टता नाही. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या ‘आविष्कार’ या बंगल्यावर २४ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या वेतनावर दरमहा सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सीएनजी किटच्या मागणीसाठी मोर्चा

पिंपरी-चिंचवडमधील रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान द्यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने महापालिकेवर सोमवारी रिक्षा मोर्चा काढण्यात आला. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूहाला पुष्पहार अर्पण करून सकाळी ११ वाजता पंचायतीचे प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला.

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पात्रतेचा प्रस्ताव तहकूब

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका विनया तापकीर यांच्या चऱ्होलीतील अवैध बांधकामप्रकरणी त्यांच्या पात्रतेबाबत कोर्टाने मत मागविण्याचा प्रस्ताव शनिवारच्या महापालिकेच्या सभेमध्ये तहकूब करण्यात आला. त्यामुळे मिळाला आहे.

पिंपरीत महापालिकेचे जलतरण तलाव तूर्त बंद

शहरातील पाणीटंचाईमुळे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे दहा जलतरण तलाव रविवार (६ जुलै) पासून बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात पाऊस पडला नसल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे.

‘आबां’च्या गृहखात्याला अजितदादांच्या पालिकेचा आर्थिक मदत देण्यास नकार

खुद्द आर. आर. आबांच्या गृहखात्याला, अर्थात पोलिसांना आर्थिक मदत देण्यास अजितदादांच्या पिंपरीतील शिलेदारांनी ‘ठेंगा’ दाखवला आहे.

Cabinet nod to renaming UoP as Savitribai Phule Pune University

The state cabinet Monday gave its approval to renaming of the University of Pune as ‘Savitribai Phule Pune University’, a year after the university senate sent its proposal in this regard to the government.
The move is being seen as a bid to please Other Backward Class communities ahead of the Assembly elections. The OBCs in the state had long been demanding that the university be named after the prominent 19th century social reformer.

PMPML takes advt route to save buses from street violence

Buses, easy targets that bear the brunt of public anger during agitations, are now trying to spread the message of harmony. City transport service PMPML is displaying advertisements appealing to people to refrain from pelting stones on its buses.