Wednesday, 27 June 2018

डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया आणखी सोपी

पुणे - सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांची क्‍लिष्टता दूर करण्यासोबतच चार टप्पे निश्‍चित केले आहेत. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे १५ हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

महामेट्रोचे जुलैमध्ये दुसरे गर्डर लाँचर

पिंपरी - मेट्रोचे दुसरे गर्डर लाँचर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दापोडी येथे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे व्हायाडक्‍ट उभारणीच्या कामाला वेग येईल. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरद्वारे व्हायाडक्‍टचे बारा स्पॅन पूर्ण झाले असून, तेराव्या स्पॅनचे सेगमेट बसविण्यास मंगळवारी प्रारंभ झाला.

पवनेतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात

पिंपरी - पवना नदीपात्रात शहरातील काही झोपडपट्ट्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्याद्वारे मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी तसेच बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीही मिसळते. त्यामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हातभट्ट्यांमुळे बालाजीनगरची वाताहत

भोसरी - येथील बालाजीनगरमधील तरुणांना हातभट्टीची दारू घराजवळच मिळत असल्याने व्यसनाधीन तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूमुळे विवाहित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे बालाजीनगरमध्ये वैधव्य आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. हातभट्टी दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतरही गुत्ते सुरूच असल्याने पोलिसांची लुटुपुटूची कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झोपडपट्टीमधील तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी सर्वच हातभट्टीचे गुत्ते बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमणांच्या विळख्यात बाजारपेठ

पिंपरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर साहित्य मांडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार पेठेतून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

Fire stations on cards in three fringe villages

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has appointed three agencies to construct fire stations at Moshi, Charholi, and Chowiswadi. There are several godowns in these areas.

दहा लाख रहिवाशांचे छप्पर बेकायदा

पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक

पिंपरी पालिकेत सभा तहकुबींचा ‘नाद खुळा’

महापौर, पक्षनेत्यांची नामुष्की; सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही

निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2018-19च्या अर्थसंकल्पातील सुमारे 264 कोटी रुपयांचा अखर्चित निधी वर्गीकरणाच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. सदर वर्गीकरणाचे विषय मागे घेण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.27) होणारी तहकूब सभा केवळ निमित्तमात्र ठरण्याची शक्यता आहे. 

लांडे-सावळे युतीची महापालिकेत जोरदार चर्चा

लांडे-सावळे युतीची महापालिकेत जोरदार चर्चा

[Video] पाणी तुंबल्याने 2 अभियंत्यांचं निलंबन

Pimpri Chinchwad | Commissioner Suspended Two Engineers After Water Logging In First Heavy Rainfall

गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद

निगडी, सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची कामे, विद्युत विभागातील रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची आवश्‍यक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (दि.28) करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात गुरुवारी एकवेळेस सकाळी पाणी पुरवठा करण्यात येणार असून संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.29) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा

चौफेर न्यूज –  एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान राबविणारे अधिका-यांच्या उदासीन धोरणाने स्वच्छ शहरात अस्वच्छता दिसू लागली आहे. यामूळेच महापालिका हद्दीतील नवी सांगवी परिसरात कचराकुंडी ओसडूंन वाहू लागल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करुन कचरा उचलला जात नसल्याचे नागरिकांने आरोग्य धोक्यात आले आहे.

निगडीला डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि   एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 1300 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

पिंपळे सौदागरमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने हिंदू साम्राज्य दिवस साजरा

हिंदू साम्राज्य दिवस उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला.

पिंपळेसौदागरमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने हिंदू साम्राज्य दिवस साजरा

शिक्षण, रोजगारासाठी ‘सारथी’ची स्थापना

पुणे - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ अर्थात ‘सारथी’ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

#MissionAdmission अकरावीसाठी ७६ हजार अर्ज

पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांसाठी असलेल्या एकूण ९६ हजार ३२० जागांसाठी सुमारे ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेच्या ३९ हजार ९० जागा असून त्यासाठी ३२ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सीएनजी पंपावर पीएमपी बसच्या रांगा

सीएनजी पंपावर पीएमपी बसच्या रांगा
पिंपरी – नेहरूनगर पीएमपी आगारात सीनजी पंपावर गॅस भरायला बसच्या रांगा लागत आहेत. गॅस भरण्यासाठी बसमधील प्रवाशांना खाली उतरुन भर पावसात उभे रहावे लागत आहे. नेहरुनगर पीएमपी आगारात एकमेव सीएनजी गॅस पंप असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच आगारातील बस सीएनजी भरण्यासाठी नेहरूनगर आगारात येतात. त्यामुळे आगारातील पंपावर मोठी गर्दी होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी व भोसरी या आगारात सीएनजी पंप नसल्याने येथील बस सुद्धा पिंपरीच्या नेहरूनगर आगारात येत असतात. आपण लवकरच आपल्या ठिकाणी पोहचू या विश्‍वासाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच वेळ आगारात बसमध्ये गॅस भरेपर्यंत वाट पाहत उभे रहावे लागते आहे.

आता व्हॉट्सअॅपवरील फोटो, व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत !

मुंबई : व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये दिसतात. तसे थेट गॅलरीत कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिसू नये म्हणून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले आहे. अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल.

आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे काढता येणार पासपोर्ट

चौफेर न्यूज – पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. यासाठी पासपोर्ट सेवा अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली.