Tuesday, 22 January 2019

Pimpri: शहरातील ऐतिहासिक वास्तूंची संवर्धन यादी तयार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ब-याच ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे आहेत. या वास्तुंच्या संवर्धनासाठी पुरातत्व (हेरीटेज) समितीची स्थापना करून कार्यवाही करण्याची नगरसेवक आणि नागरिकांकडून मागणी होत आहे. हेरीटेज समिती स्थापन करण्यापूर्वी महापालिका हद्दीतील ऐतिहासिक वास्तुंची यादी करण्यात येणार आहे.

महापालिकेत वास्तुविशारदांना “अच्छे दिन’

पिंपरी – वाढीव दराच्या निविदांना मंजुरी, ठराविक ठेकेदारांनाच कामांचे कंत्राट दिले जात असल्याने महापालिकेच्या कारभाराभोवती संशयाचे ढग दाटले असताना आता त्याच वास्तू विशारदांच्या नेमणुकीची भर पडण्याची शक्‍यता आहे. प्राथमिक शाळा, सभागृह बांधण्याबरोबरच खेळाच्या मैदानात प्रेक्षक गॅलरी उभारण्यासाठी महापालिकेमार्फत एकाच वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे.

चिंचवडमधील कामगार कार्यालयाला अवकळा

पिंपरी – पुणे जिल्हा कामगार उपआयुक्तांच्या अखत्यारीत चिंचवड 1985 पासून कामगार कार्यालय कार्यरत आहे. या शासकीय कार्यालयाची अतिशय भयानक अवस्था झालेली आहे,
याच कार्यालयात दुकाने निरीक्षक कार्यालय व माथाडी बोर्डाचे शासकीय कार्यालय असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. चिंचवड येथे असणाऱ्या या कार्यालयाची इमारत ही खुप जुनी असून तुटलेल्या खिडक्‍या व पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील बऱ्याच वर्षांपासून तुटलेलेच आहेत. तसेच बाहेरील आवारात विद्युत दिवेही नाहीत. त्यामुळे ये जा करताना काळजी घ्यावी लागते, बऱ्याच दिवसांपासून भिंतींना रंगरंगोटी झालेली नाही. कार्यालयात जुनाट फर्निचर व मातीच्या ढिगाऱ्यात असणारी कागदपत्रांचे गठ्ठे यामुळे या कार्यालयाचे वातावरण नेहमीच उदासीन असते.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र ‘कामगार कार्यालय’ स्थापन करा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ही कामगार व औद्योगिकनगरी असल्याने शहरातील कामगारांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र “हायटेक व सुसज्ज कामगार कार्यालय” उभारण्यात यावे अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष तथा बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Chinchwad : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, हे कौतुकास्पद- डॉ. ई वायूनंदन

एमपीसी न्यूज -प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमधील शिशूवर्ग ते पदवीत्तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने विविध उपक्रमे राबवून त्याच्या कलागुणाचा विकास केला जात आहे. 

आता भोसरीत भरणार “इंद्रायणी थडी’

पिंपरी – शिवांजली सखी मंच व महेशदादा स्पोटर्स्‌ फाउंडेशनच्या वतीने 8 ते 11 दरम्यान इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेचे उद्‌घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संयोजिका पूजा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

…जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

आकुर्डीतील ५८ महिलांना संजय गांधी पेन्शनचे प्रमाणपत्र वाटप

पिंपरी (Pclive7.com):- शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आकुर्डी भागातील ५८ महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शनची प्रमाणपत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते महिलांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.

‘ग्रीन’ पिंपळे सौदागरच्या दिशेने सकारात्मक वाटचाल; नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये ‘वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प’ या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने नम्रता मॅजिक या सोसायटीत प्रथमच वेस्ट मॅनेजमेंट याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन मयुरी गोसावडे, रमेशशेठ काटे, सोसायटीचे सेक्रेटरी अभिजीत उल्हे व चेअरमन अशोककुमार शर्मा यांच्या वतीने करण्यात आले होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हा उपक्रम संपूर्ण पिंपळे सौदागर प्रभागात राबविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

व्यवसायात मराठी माणसाचा वाढणारा टक्का अभिनास्पद – महेश लांडगे

पिंपरी (Pclive7.com):- मोशी – आळंदीच्या आजूबाजूचा परिसर सध्या झपाट्याने बदलत आहे. या भागात व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत अाहे. या भागात वाढणारी नागरीवस्ती व्यवसाय करण्यासाठी सुवर्णसंधी घेवून आली आहे. त्यात मराठी माणसाचा या भागात व्यवसायात वाढणारा टक्का हा अभिनास्पद असल्याची भावना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

पिंपरीत ‘डेटा सायन्स आणि डेटा अनालिस्ट’ इन्स्टिट्यूटचे उद्घाटन : डेटा सायन्सचे प्रशिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिस्टचे विविध प्रशिक्षण देणारी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ही एकमेवर इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डेटा सायन्सचे अद्यावत प्रशिक्षण घेण्याची संधी शहरात उपलब्ध झाली आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.