युवकांनो, अपमान, अपयश पचवायला शिका !
पिंपरी, 20 ऑक्टोबर
काहीतरी करून दाखवण्याच्या वयात तरुणांच्या हाती तलवारी, चाकू, पिस्तुल यांसारखी हत्यारे येत आहेत. जिथे या तरुणांनी काहीतरी रचनात्मक कार्य करायचे तिथे सूड भावनेने एकमेकांचा गळा घोटण्याची, आत्महत्या करण्याची दुष्कृत्ये केली जात आहेत.
मागील आठवडयात मित्राला हल्ला करणा-या युवकांना रोखणा-या बावीस वर्षीय युवकाला आपले प्राण गमविण्याची दुर्दैवी वेळ आली. तर दुसरीकडे एका 22 वर्षीय युवतीने आत्महत्या करून तडकाफडकी आपली जीवनयात्रा संपविली.या दोन्ही घटनांच्या विचार केला, तर तरूणाच्या खुनाचे कारण क्षुल्लक होते. तर युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तरुणांनी अशा मानसिकतेला बळी जाण्यापूर्वी अपयश, अपमान पचवायला शिकले पाहिजे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in