Monday, 1 October 2018

[Video] नागरिकांच्या मदतीला पोलिस पोचणार ५ मिनिटांत

पिंपरी चिंचवड : नागरिकांनी मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास किमान ४ पोलिस कर्मचारी ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील, यासाठी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी 'फोन अ फ्रेंड' व 'पोलिस आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात केली आहे. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक : 020-27450888, 27450666 किंवा 100 नंबर. #PCMC #PoliceHelps #PoliceResponse #PhoneAfriend #पोलिसआपल्यादारी

पिंपरीमध्ये ऍप बेस्ड सायकल शेअरिंग

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ये-जा करण्यासाठी बस, रिक्षाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी प्रथमच ऍप बेस्ड शेअरिंग सायकलचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत या उपक्रमाला सुरवात होणार आहे. 

शहरांमध्ये 'इनोव्हेशन सेंटर' उभारा; निती आयोगाचे सदस्य डॉ. सारस्वत

पुणे : ''देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या (इनोव्हेशन) अंमलबजावणीवर भर द्यायला हवा. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळेल अशा पद्धतीने अभ्यासक्रमात बदल होणे ही काळाची गरज आहे. तसेच स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक 'स्मार्ट सिटी'मध्ये इनोव्हेशन सेंटर उभारण्यात यावे,'' असा सल्ला निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी दिला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संतोष पाटील

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्त केली, अशी माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे.

स्वाइन फ्लू लसीची कमतरता

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस अपुरी पडते. अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसा साठा असून, गरोदर माता व उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांना दिली जात आहे. शनिवारी ‘सकाळ’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही बाब समोर आली. 

“पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल’ पुढील वर्षीपासून

पिंपरी – पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होईल, त्यात खंड पडणार नाही, असे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले.

Two-way traffic resumes on Bhumkar Chowk service rd

PIMPRI CHINCHWAD: Two-way traffic has been resumed on the se ..

‘चल रे जॅमर काढ, मी आमदार आहे’

वाहतूक नियम तोडूनही पिंपरीच्या आमदारांची पोलिसांशी हुज्जत 
नारायणगाव – पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाहनाने वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावी केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पुणे-नाशिक महामार्गावर घडली.

चारशे पोलिस झाले कमी

पिंपरी - शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून सर्व पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र, आयुक्तालय झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर देण्याबाबत पोलिस महासंचालक कार्यालय व सरकारची अनास्था आता दिसू लागली आहे. आयुक्तालय होऊन महिना उलटला तरी पहिल्या टप्प्यातील मान्यता मिळालेले पोलिस पिंपरी-चिंचवडसाठी वर्ग करण्यात आलेले नाहीत. किंबहूना आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील ४०० पोलिस कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतूक विभाग थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करणार

वाहतुकीचे नियम मोडले; सात दिवसात 207 जणांवर गुन्हे दाखल
दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ उपक्रम
पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलनद्वारे दंड आकारणे, दंड न भरल्यास गुन्हे दाखल करणे अशा प्रकारे ही कारवाई सुरु आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील एक आठवड्यात 207 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नो पार्किंग, राँग साईड, नो एंट्री, ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग असे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक विभागाकडून करण्यात येणार्‍या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करणार आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. 21) 43, शनिवारी 21, रविवारी 9,

महापालिकेतील चुकीच्या कामाबाबत आवाज उठविण्यात विरोधक ठरले अपयशी

निष्क्रिय विरोधक, भरकटलेले सत्ताधारी अन् गोंधळलेले प्रशासन!
विरोधकांनी अद्याप एकही आरोप केला नाही सिद्ध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील चुकीच्या कामाबाबत आवाज उठविण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले आहेत. दीड वर्ष होऊनही सत्ताधार्‍यांना पारदर्शक कारभाराची चुणूक दाखविता आली नसून ते भरकटलेले आहेत. तर, दुसरीकडे अधिकार्‍यांची कमतरता असल्यामुळे प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत असून ढिम्म झाले आहे. कामचलावू कामकाज केले जात आहे. परिणामी, शहराचा विकास संथगतीने सुरू आहे. यामुळे शहरातील जनता सत्ताधारी आणि विरोधकांच्या कामगिरीवर नाखूष आहे. पारदर्शक कारभारासाठी शहरवासियांनी पिंपरी महापालिकेत मोठ्या अपेक्षेने सत्तांतर करत भाजपकडे एकहाती सोपविली. त्यामुळे अनेक वर्ष विरोधात असलेले सत्ताधारी झाले अन् पक्षाच्या स्थापनेपासून सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसवाले विरोधात बसले. तथापि, दीड वर्ष होऊनही सत्ताधार्‍यांना कामाची चुणूक दाखविता आली नाही. अडखळतपणे कामकाज सुरु असून अद्यापही प्रशासनावर वचक निर्माण करता आला नाही. तर, विरोधकांनी केवळ आरोपांच्या फैरी झाडल्या असून एकही आरोप अद्याप सिद्ध करू शकले नाहीत.

कचरा संकलनाची उपसूचना न वाचताच केली मंजूर

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
पिंपरी : कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी येणार्‍या 570 कोटींच्या कामास उपसूचनेद्वारे न वाचताच सत्ताधार्‍यांनी त्यास प्रशासकीय मान्यता घेतली आहे. त्यामध्ये काळेबेरे असल्यानेच भाजपच्या मोजक्या नगरसेवकांनी घाईत अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देऊन मंजूर करुन घेतल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. तसेच अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देता येत नाही. सत्ताधारी नियमांचे उल्लंघन करत आहेत असा आरोप करत प्रशासकीय मान्यतेचा विषय रितसर विषयपत्रिकेवर आणण्याची मागणी त्यांनी केली. गुरुवारी झालेल्या महासभेत उपसूचनेद्वारे आयत्यावेळी प्रशासकीय मान्यता घेतली. दरम्यान, तब्बल 570 कोटी रुपयांच्या कामाला उपसूचेद्वारे आयत्यावेळी मान्यता देत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावर चर्चा केली नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेबाबत पालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

वाकडमधील गिरीराज ग्रॅण्डीओस गृहप्रकल्पाच्या बांधकामाला आयुक्तांची स्थगिती; जागेचा मालकी हक्क निश्चित नसताना सुरू होते बांधकाम

वाकडमधील एका जागेचा मालकी हक्क निश्चित नसताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना आणि बांधकाम परवाना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना “चिरीमिरी” देऊन या जागेत तब्बल १३ मजली गृहप्रकल्प उभारण्याचा बांधकाम परवाना घेतलेल्या मुंबईतील एका बिल्डरला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दणका दिला आहे. 

PCMC seeks 18 hectare land for roads

The civic body has requested the state government for 18 hec ..

भाजप नगरसेवकांमधील संघर्ष चव्हाट्यावर; पिंपळे निलखमधील एकाच कामाचे दोनवेळा उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपात गटबाजी काही नवीन नाही. शहराध्यक्ष लक्ष्मण जागताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील सत्तासंघर्ष तर जगजाहीर आहे. हा वाद सुरू असताना आता सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पिंपळे निलख-वाकड प्रभागातील येथील एकाच कामाचे उद्घाटन दोनवेळा करण्याचा प्रताप या मंडळींनी केला आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत जेष्ठ नागरिकांचे मोठे योगदान – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ नागरिकांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपत्ती आपल्या जवळच ठेवावी, असा सल्लाही दिला.

रुग्ण हक्कांना ‘अच्छे दिन’?

पुण्यासह देशभरातील खासगी सरकारी हॉस्पिटल, डॉक्टरांकडून पेशंटना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे. उपचारापासून ते खर्चाच्या अंदाजापर्यंतची माहिती विचारण्यास गेलेल्या पेशंटना सातत्याने नकारात्मक उत्तर देण्यात आले. त्यातून पेशंटच्या नातेवाइकांडून डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. परंतु, पेशंटच्या हक्कांचा विसर पडलेल्या सर्वच हॉस्पिटलसह डॉक्टरांना आता चपराक बसला आहे. 'पेशंट चार्टर' अर्थात रुग्ण हक्काचा मसुदा प्रस्तावित असल्याने अनेक वर्षांपासून हक्कासाठी सुरू असलेल्या लढाईला आता 'अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत.

पिंपरीतील पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन

पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर शनिवारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली.

अजित पवार घेणार बैठक

पिंपरी – राष्ट्रवादीचे माजी आमदार, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी (दि. 1) आयोजित करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.
आकुर्डीतील हॉटेल ग्रॅण्ड एक्‍झॉटिका येथे दुपारी दुपारी चार वाजता पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांना पवार मार्गदर्शन करणार आहेत.

...म्हणून ‘अँजिओप्लास्टी’चा घाट

शस्त्रक्रियेला घाबरून रुग्णांकडून अन्य उपचारांवर भर
पुणे : छातीचा पिंजरा फाडून हृदयाची 'बायपास' सर्जरी करण्याच्या भीतीने पेशंट घाबरून जातात. याच गोष्टीचा फायदा घेऊन हृदयरोग तज्ज्ञ अर्थकारण जपण्यासाठी दोनपेक्षा अधिक 'ब्लॉकेज' असल्यास 'अँजिओप्लास्टी'चा घाट घालतात. त्यामुळे अनेकदा 'स्टेंट फेल' जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे रुग्ण आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा नॅचरोपॅथीसारखे पर्याय स्वीकारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.