पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी पुणे मेट्रोचे स्टेशन उभारले जाणार आहे. पालिका भवन इमारत, मोरवाडी चौक, फिनोलेक्स कंपनी आणि कमला क्रॉस बिल्डिंग असे चार ठिकाणाच्या इन व आऊट गेटमधून प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. शहरात मेट्रोची मार्गिका उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 163 फाउंडेशन पूर्ण झाले आहेत. तर 117 पिलर उभे राहिले आहेत. सेगमेंटची जुळणी 14 स्पॅनमध्ये पूर्ण झाली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पालिका भवन येथील मेट्रोचे स्थानक कसे असेल, याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 14 July 2018
मेट्रोचा प्रवेश मार्ग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते रेंजहिल्स मार्गावरील भोसरी (नाशिक फाटा) आणि खडकी येथील मेट्रो स्टेशनमध्ये ये-जा करण्यासाठीचा (एन्ट्री-एक्झिट) एक मार्ग अनुक्रमे कासारवाडी आणि खडकी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरूनच जोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने त्याला तत्त्वत: मान्यता दिली असून, यामुळे रेल्वे-मेट्रोच्या प्रवाशांचा फायदा होणार असल्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) केला आहे.
बोर्ड बरखास्तीचा लाभ नागरिकांना होणार
केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंट बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यास, पुण्यातील तीन कॅन्टोन्मेंटचा कारभार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे जाईल. असे झाल्यास याठिकाणी महापालिकेचा कायदा लागू होऊन, नागरिकांना सुविधा मिळतील. मात्र बांधकामाबाबचे कॅन्टोन्मेंटचे कडक नियम हटल्याने सिमेंटचे जंगल विस्तारेल. असे झाल्यास हा परिसर बकाल होण्याचा धोका आहे. तसेच या मोकळ्या जागांच्या आसपास लष्कराची महत्त्वाची कार्यालये आहेत, त्यांनासुध्दा धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
Aadhaar for newborns at 500 hospitals from August
PUNE: Aadhaar enrolment for newborns is set to become a chil ..
तज्ञांद्वारे पक्षी, किटक आणि जैवसंपत्तीचा अभ्यास
पिंपरी-पिंपरी चिंचवड शहरातील वृक्षसंपदा संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्राधिकरणातील नागरी सुरक्षा कृती समितीचा एक पर्यावरण अभ्यास गट कार्यरत आहे. पक्षी, किटक आणि जैवसंपत्तीचा अभ्यास व निरक्षण सदरचे पर्यावरण तज्ञ करीत आहेत. “कदंब वृक्ष व मधमाशी अन्न साखळी” या विषयांन्वये निरीक्षणे आणि ठळक बाबी नोंदल्या गेल्या आहेत.
9-yr-old's death prompts PCMC to suspend junior engineer for negligence
Negligence by Pimpri Chinchwad municipal corporation(PCMC) electrical department has resulted in a suspension of a junior engineer of the department.
पवना धरणामध्ये ५० टक्के साठा
पवनानगर - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार
1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
राज्य सरकारची विधानपरिषदेत घोषणा
नागपूर – राज्यातील विविध मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांकडून खाद्यपदार्थांच्या नावाखाली अव्वाच्या सवा पैसे उकळून लूट करणाऱ्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले.
राज्य सरकारची विधानपरिषदेत घोषणा
नागपूर – राज्यातील विविध मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांकडून खाद्यपदार्थांच्या नावाखाली अव्वाच्या सवा पैसे उकळून लूट करणाऱ्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले.
पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
वेध स्मार्ट सिटीचे भाग १ : अप्पूघरकडे पर्यंटकांची पाठ
अपुऱ्या सुविधांमुळे पर्यंटकांची अप्पूघरकडे पाठ
सिंहासन न्युज – लहान मुलाच्या हातात एखादी तीच ती खेळणी दिली, तर ते कंटाळून ती फेकून देते. मग, अप्पू घरातील खेळणी त्याला अपवाद कशी असणार ? हल्ली अप्पूघर देखील पर्यटकांना कंटाळवाणे वाटू लागले आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांत अप्पूघरातील खेळण्यांच्या साहित्यांत कोणताही बदल, नाविंन्य दिसत नाही. त्यामुळे एकेकाळी पर्यटनाचे आकर्षण असलेल्या अप्पूघराची लोकप्रियता कमालीची घटत आहे.
समांतर पुलाची दुसरी बाजू डिसेंबरअखेर खुली होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या दापोडी येथील हॅरिस पुलाला समांतर पुलाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पुणे शहर व इतर भागातून पिंपरी शहरात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता हा पूल वाहन चालकांसाठी “जीवनवाहिनी’ ठरला आहे. या पुलामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी बहुतांशी प्रमाणात कमी झाली आहे. तसेच, पुण्याकडून पिंपरीकडे येणारी दुसरी बाजू डिसेंबर अखेर पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
वाहतूक विभागाचे कार्यालय की खुराडे?
पिंपरी – दिवसभर तपास, बंदोबस्त, पोलीस ठाण्याचे काम, न्यायालयाचे काम सगळीकडेच फिरस्तीवर रहावे लागते. कुठे निवांत क्षण मिळणे कठीणच आणि तशी व्यवस्थाही वाहतूक पोलिसांना नाही. वाहतूक विभागाचे पिंपरी कार्यालयच छोट्याशा गाळ्यांमध्ये असल्याने जागेअभावी कर्मचाऱ्यांना उठ-बस देखील करता येत नाही. याठिकाणी कोणत्याच सुविधा नसल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे वाहतूक विभागाचे कार्यालय आहे की खुराडे? असा सवाल, पोलीस कर्मचाऱ्यांसह याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही पडतो.
धोकादायक चेंबर्समुळे रस्त्यांवर मृत्यूचे सापळे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील चेंबर रस्त्याला समांतर नसल्याने चेंबर आणि रस्ता यामध्ये अंतर पडून खड्डे तयार झालेले आहेत. या खड्डयात वाहने आदळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे, शहरातील अनेक रस्ते नव्याने बांधताना चेंबरची झाकणे रस्त्याच्या समान पातळीत असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापत्य विभागाला धोकादायक चेंबरचे गांभीर्य नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी
पुणे - महावितरणकडून वीज दरवाढीसंदर्भात सादर करण्यात आलेला प्रस्ताव पूर्णपणे अनाठायी, अवाजवी आणि सर्व ग्राहकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे.
देशातील कँटोन्मेंट बरखास्तीचा विचार?
लष्करातर्फे देशभरातील ६२ कँटोन्मेंट बरखास्त करण्याचा विचार केला जात असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. कँटोन्मेंटवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कँटोन्मेंटमधील लष्करी भागात 'विशेष लष्करी ठाणे' तयार केले जाणार असून, नागरी भाग लगतच्या महापालिकेकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. कँटोन्मेंट परिसरातील लोकप्रतिनिधींकडून या प्रस्तावाचे स्वागत केले जात असले, तरी माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून त्यावर चिंता व्यक्त होत आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा
सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांची संख्या शंभरपेक्षा कमी असल्यास, स्वतंत्र निवडणूक घेण्याच्या बंधनापासून त्यांची सुटका करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्येच व्यवस्थापन समितीची निवड करण्यास राज्य सरकारने अनुमती दिली असून, लहान-लहान गृहनिर्माण संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत जाणाऱ्या वेळेत त्यामुळे बचत होणार आहे.
आरटीओ सेवांसाठी केंद्र
लायसन्सच्या परीक्षेसाठी अर्ज भरायचा आहे किंवा वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया करायची आहे... प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) या आणि अशा विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी नागरी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रामुख्याने आरटीओची कामे केली जात असून, घरबसल्या ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नसलेल्यांना हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
अनधिकृतपणे रस्तेखोदाई केल्यास फौजदारी खटला?
शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदाईसाठी आणि खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी धोरण निश्चित करण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण सभेला करण्यात आली आहे. त्यामध्ये अनधिकृत रस्ते खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे.
‘भयमुक्त रेल्वे स्थानक’ मोहिमेद्वारे जनजागृती
पिंपरी-आकुर्डी प्राधिकरण रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस प्रवाश्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या लेकासंख्येमुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होत आहे. रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिसांची चौकी नसल्यामुळे गुन्हेगार दिवसाढवळ्या लुट करू लागले. त्यामुळे परिसरातील प्रवाशी नागरिक भयग्रस्त आणि असुरक्षित झाले.यावर तातडीचा तोडगा आवश्यक असल्यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांनी आरपीएफ,रेल्वे पोलीस व स्टेशन कर्मचारी अधिकारी यांचे सोबत “भयमुक्त रेल्वे स्थानक” ही मोहीम राबवली.
पिंपरीत पोलिसांचे स्पेशल अॉपरेशन; उशिरा चालणा-या हॉटेल, टप-यांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेहगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकांनी आज शुक्रवारी (दि.१३) रात्री अकरा वाजल्यानंतर हद्दीत स्पेशल अॉपरेशन केेेले. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारवाई करण्यात येत आहे. शहरात उशिरा चालणा-या हॉटेल, टप-यांसह इतर धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी व संशयितरित्या वावरणा-यांची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मोहननगर परिसरात वाहनांची तोडफोड
चिंचवड मधील मोहनगर परिसरात विविध ठिकाणी सात ते आठ वाहनांची टोळक्यांनी तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवार (दि.१२) रात्रीच्या सुमारास घडली.
पिंपरीमध्ये अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीमध्ये ‘अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
14 व 28 जुलै ला विशेष मतदान नोंदणी मोहीम
पिंपरी – लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदार संघात महापालिकेच्या वतीने मतदार यादी संदर्भात 14 व 28 जुलै या दोन दिवशी विशेष मतदान नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)