Monday, 1 April 2019

रिक्षांच्या अतिक्रमणांमुळे पीएमपीचे प्रवासी धोक्‍यात; चौकाचौकात वाहतूक नियमांची पायमल्ली

अधिकृत थांबे सोडून पीएमपीएमएलचे बस थांबे रिक्षांनी बळकावले आहेत. त्यामुळे जीव धोक्‍यात घालून प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करावा लागत आहे. मात्र, वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

Pimpri : उद्योगनगरीचे दहशतवाद कनेक्शन अधोरेखित

एमपीसी न्यूज- जगामध्ये वाढत असलेल्या दहशतवादाच्या उंबरठ्यावरून उद्योगनगरीकडे पहिले असता येथील स्थानिक पातळीवरील दहशतवाद उघड झाला आहे. अतिरेकी भटकळ बंधूंची कुदळवाडी वास्तव्याची शक्यता, शहरात अनेकदा कधी छुप्या तर कधी उघडपणे होणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाया. त्यातच स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असणाऱ्या दहशतवाद्याला नुकतेच चाकण परिसरातून शस्त्रासह केलेली अटक अशा केली होती. 

होस्टेलचालकांना ‘जीएसटी’चा दिलासा

पुणे - भाड्याने दिलेल्या रूमला प्रतिदिन एक हजार रुपये भाडे असेल, तर संबंधित उत्पन्नावर आता ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही. जीएसटी विभागाच्या या निर्णयामुळे देशभरातील होस्टेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

संगणक टंकलेखन, लघुलेखन संस्थांच्या मनमानीला “चाप’

पुणे – शासकीय संगणक टायपिंग परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत न भरल्यास व अर्जातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेला आहे. याचा संस्थांनी धसकाच घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने शासकीय संगणक टायपिंग परीक्षा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्‍टर्स अँड स्टुड्‌टस या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फी घेण्यात येते.

शहरात 5 ठिकाणी मिळणार ऑनलाइन “पीयूसी’

पुणे – नव्या नियमानुसार वाहनाची “पीयूसी’ अर्थात “पोल्यूशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र आता ऑनलाइन मिळणार आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रक्रियेला काही वेळ जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शहरातील पाच ठिकाणी ही ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.

पुणे – मेट्रो कर्मचाऱ्यांच्या संवादासाठी ‘सी-डॅक’ देणार तंत्रज्ञान

पुणे – मेट्रो रेल्वेत कर्मचाऱ्यांना अंतर्गत संवाद साधण्यासाठी नवीन संगणक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टिम सेंटर फॉर डेव्हपलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंग (सी-डॅक) तर्फे विकसित केली जात असल्याची माहिती महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.

निगडीतील परिमंडळ कार्यालय बंद

पिंपरी चिंचवड ः निगडी येथील परिमंडळ अधिकारी यांचा इलेक्शन ड्युटी व ऑनलाईनच्या नावाखाली नविन दुबार नुतनीकरण व विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवून मनमानी कारभार सुरू आहे. दोन-दोन महिने अर्ज करून देखील नागरिकांना शिधापत्रिकेसाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई  करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी शासकीय कर्मचार्‍यांना सुट्टी, अधिसूचना जाहीर

पिंपरी चिंचवड ः राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना मतदानाचा हक्क बजाविता, यावा याकरिता मतदानाच्या दिवशी त्या-त्या मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदारसंघात 11, 18, 23 व 29 एप्रिल असे चार टप्प्यात मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ज्या तारखेला ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने राजपत्र असाधारण भाग 1-मध्य उप-विभाग, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना जाहीर केली आहे.

वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर पालिकेने भर द्यावा

महापालिकेने वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याऐवजी या सुविधेचे खासगीकरण करण्यावर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे. ही बाब भविष्यात अडचणीची ठरू शकते. पालिकेच्या वैद्यकीय सुविधेच्या केंद्रबिंदूस्थानी वायसीएम रुग्णालय राहिले आहे. मात्र, या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी भोसरीत 100 बेड क्षमतेचे रुग्णालय बांधून ते खासगी संस्थेला 30 वर्षे एवढ्या दीर्घ मुदातीवर चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर केला आहे. तो विंखंडीत करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

PCMC Rs 73 crore behind its annual property tax target

Pimpri Chinchwad: The civic body's property tax department faces an uphill task of collecting Rs73 crore over the next two days to achieve its annual target of ...

मेट्रोसाठी फ्रान्सचे ‘सिग्नल’

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील पिंपरी -स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मेट्रो मार्गासाठी सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन सिस्टिम फ्रान्समधील ‘अलस्टॉम’ कंपनी करणार आहे. जागतिक स्तरावरील पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत ‘अलस्टॉम’ला सुमारे २४० कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग येणार असून, कंपनीकडून अल्पावधीतच काम सुरू होईल.

इंग्रजीतील बोलणे ऐका मराठीत

पुणे - एखादा माणूस इंग्रजीत बोलत असताना, त्याचे संभाषण तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू आले तर! काय, आश्‍चर्य वाटतंय ना! अहो, पण हे लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे बरं का! एवढंच नव्हे तर तुम्ही मराठीतून साधलेला संवाद त्या संबंधित माणसाला त्यांच्या इंग्रजीत ऐकू जाणार आहे. हो, देशात "स्पीच-टू स्पीच' भाषांतर करण्याचे नवे तंत्रज्ञान "सी-डॅक'मार्फत विकसित होत आहे. 

जप्तीची कारवाई टाळण्याकरीता मिळकत कर भरा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. कोषागारात आजपर्यंत मालमत्ता करातून 435 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. महापालिकेने जप्तीची कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल..!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील हापूस जातीचा पहिला आंबा पिंपरी कँम्पातील फ्रुट मार्केटमध्ये आला आहे. याशिवाय बदाम आणि लालबाग जातीचे आंबेही विक्रीसाठी आले आहेत. या मोसमातील पहिला आंबा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.

स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कार्यालय सापडेना

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडसाठी स्वतंत्र कार्यालयासाठी महापालिकेच्या 5 ते 6 इमारतींची पाहणी केली गेली आहे. मात्र, सदर इमारती स्मार्ट सिटीच्या अधिकारी व संचालकांना पसंत पडत नसल्याने कार्यालय निश्‍चित झाले नाहीत. स्मार्ट सिटीची एसपीव्ही कंपनी स्थापन होऊन वर्ष लोटत आले तरी अद्याप कार्यालयाचा शोध सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कारभारावर परिणाम होत आहे.

पालिका भवन परिसरात तब्बल 27 मोटारी धुळखात

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या पार्किंग परिसरात तब्बल 27 मोटारी धुळखात पडून आहेत. तर, असंख्य दुचाक्यांचा खच पडला आहे. त्याचबरोबर वापरात नसलेले फर्निचर व साहित्य पडून आहे. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या वाहन व फर्निचरमुळे अस्वच्छता निर्माण होऊन रोगराईसह सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पडिक भंगार साहित्यामुळे वाहनांना पार्किंग अपुरे पडत आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रासाठी 3 निविदा

आंद्रा व भामा-आसखेड धरणातून आणण्यात येणारे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या परिसरातील भागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या केंद्राच्या निविदेसाठी एकूण 3 निविदा पालिकेस प्राप्त झाल्या आहेत. तर, देहूगावच्या इंद्रायणी नदीवरील बंधारा ते चिखली केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.  भामा-आसखेड धरणातील 60.79 दलघमी व आंद्रा धरणातील 38.87 दलघमी असे एकूण 99.66 दलघमी इतके आरक्षित पाणी साठ्यास जलसंपदा विभागाने पालिकेस 24 ऑक्टोबर 2018 ला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुनर्स्थापनेच्या एकूण 238 कोटी 53 ला खर्चापोटी 45 कोटींचा पहिला हप्पा पालिकेने नोव्हेंबर 2018 ला अदा केला आहे.

Pimpri : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी डॉ. के अनिल रॉय यांचे ‘फेसबुक पेज’ ठरतंय प्रभावी

एमपीसी न्यूज – शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘फेसबुक’ पेजचा योग्य वापर केला आहे. आरोग्य विभागाने ‘पीसीएमसी हेल्थ अॅन्ड सॅनिटेशन सोल्यूशन’ या नावाने फेसबुक पेज सुरु केले असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबतच्या तक्रारी या फेसबूक पेजवर करतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याची तातडीने दखल घेत परिसर स्वच्छ केला

पुणे खंडपीठ ४१ वर्षे कागदावरच

पुणे - प्रस्ताव मंजूर होऊन तब्बल ४१ वर्षे लोटूनही पुणे खंडपीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. यासाठी वकिलांनी वारंवार आंदोलने करूनही त्याकडे सरकारकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोर्चा, राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांना वारंवार निवेदने, एक थेंब रक्ताचा आंदोलन, मुंबईत मोर्चा, पुणे न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच सलग १६ दिवस न्यायालयीन कामकाज बंद अशा प्रकारच्या विविध आंदोलनांच्या माध्यमातून वकील सातत्याने खंडपीठाची मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या या लढ्याला अद्याप यश आलेले नाही. 

साडेतेराशे कोटींचे पिंपरी महापालिकेचे रेकॉर्ड गायब

पिंपरी - महापालिकेच्या विविध विभागांतील १३३९ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपयांच्या रकमेची कागदपत्रे गायब झाली आहेत. १९५ कोटी २७ लाखांची अर्धवट कागदपत्रे उपलब्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दुष्काळग्रस्त तरुणांना ‘होम डिलिव्हरीचा’ आधार

पिंपरी – राज्यातील एकूण 26 जिल्ह्यामंधील सुमारे पाच हजाराहून अधिक गावांमध्ये दुष्काळ किंवा दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने तरुण राज्याच्या दुष्काळी भागातून उद्योगनगरीत दाखल होतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त भागातून तरुण शहरात आले आहेत. यावर्षी अल्पशिक्षित असलेल्या तरुणांना “होम डिलिव्हरी’च्या नोकऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या विविध वस्तूंपासून ते दूध, भाज्या आणि जेवण देखील घर पोहच देण्याचे चलन शहरात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फायदा अनेक तरुणांना होत असून दरमहा दहा ते पंधरा रुपयांची नोकरी सहज रित्या मिळत आहे.

वाहनांची ‘पीयूसी’ प्रक्रिया यापुढे ऑनलाइन

पुणे – आतापर्यंत वाहनांची “मॅन्युअली’ करण्यात येणारी “पोल्युशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र अर्थात “पीयूसी’ प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात आहे. नव्या प्रक्रियेनुसार हे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे राहणार असून वाहनांचे छायाचित्र देखील यामध्ये “अपलोड’ करावे लागणार आहे.

सर्व सामान्यांना प्राधिकरणाची घरे न मिळण्यासाठी बिल्डर लॉबीचा प्रयत्न ः काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणसांसाठी गृहप्रकल्प योजना होऊ नयेत, म्हणून बांधकाम व्यावसायिक  विरोध करीत आहेत. त्यात शहरातील काही राजकारणी मंडळीही सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध झुगारुन गृहप्रकल्प पुर्ण करुन सर्वसामान्य घरांची योजना पुर्ण क रावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इरफान  चौधरी, चंद्रकांत कुंभार, सैफुल शेख, आबा शेलार, बालाजी इंगले, राजेश माने उपस्थित होते. प्रसंगी, महासंघाचे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अनिल सूर्यंवंशी  यांच्याशी चर्चा करण्यात आली.