नवी दिल्ली – देशभरातील ऑनलाईन औषधे विक्रीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला असून सक्तीने राबविण्याचा आदेश दिला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 14 December 2018
पिंपरी मतदारसंघातील प्रश्न तातडीने सोडविण्याचे आयुक्तांचे आदेश
चौफेर न्यूज – पिंपरी भाजी मंडईचा विकास, पत्राशेड, लिंक रोड व अजंठानगर येथील रखडलेले पुनर्वसन, पिंपरी स्मशानभूमी ते सुभाषनगर डीपी रस्ता आणि बोपखेल मधील आरक्षित जागांचा विकास आदी महत्त्वपूर्ण प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे शनिवारी उद्घाटन
चौफेर न्यूज – वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना मोफत भोजन देणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे शनिवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल यांनी दिली.
शनिवारी दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड स्टेशन येथील अग्रसेन भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीच्या कामाची महापौरांकडून पाहणी
चौफेर न्यूज – पिंपळे सौदागर येथे स्मशान भूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव व नगरसेवक नाना काटे यांनी पाहणी केली. ही स्मशानभूमी बांधण्यासाठी महापालिकेने दि.१६ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी दिली. ३ जानेवारी २०१२ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. या स्मशानभूमीच्या कामात अम्फीथीएटर, दशक्रिया विधी हॉल, पिंडदान व्यवस्था, ८० मीटर लांब व ८ मीटर रुंद घाट, स्वच्छता गृह, पार्किंग, वाचमन रूम, कंपाउंड वाल, गेट, कमान आदी कामाचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा ठेवलेली आहे. या कामापैकी मागील भिंत आणि कमानीचे काम व इतर अनुषंगिक काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव आणि नगरसेवक नाना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Identify land for defence in four months: High court to government
PIMPRI CHINCHWAD: The high court, in an interim order, has told the state government to identify in four months the land to be provided to defence authorities in lieu of the access road and bridge to be built for residents of Bopkhel village.
Maharashtra mulls police station for Baner
PUNE: The state government has suggested a new police statio ..
भोसरी गावठाणात कबड्डी प्रशिक्षण केंद्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी गावठाण येथील सर्व्हे क्रमांक 1 येथे कबड्डी प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येणार आहे. या केंद्रासाठी तब्बल 8 कोटी 87 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना पाच लाखांच्या आरोग्य विम्याचे कवच
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा योजना राबविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे. तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. या १३३ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्यात आला आहे.
Pimpri: महापालिका स्थायी समितीची 54 कोटीच्या विकास कामांना मंजुरी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 54 कोटी 22 लाख चोवीस हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. स्थायी समितीच्या सभेत एकूण 43 कामांना मंजुरी देण्यात आली.
शहरबात पिंपरी : नव्यांचा वरचष्मा, जुन्यांची अस्वस्थता
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षामध्ये नव्या-जुन्यांमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली. नव्याने पक्षात आलेल्यांवर पूर्णपणे विसंबून न राहता निष्ठावंतांकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली पाहिजे, असा सूर निघू लागला आहे. वास्तविक, जुन्यांवर खरेच अन्याय होतोय की त्याचे भांडवल करून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, याविषयी साशंकता आहे. दुसरीकडे, पार्थ अजित पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
महिला बचतगटांसाठी हक्कांचे बाजारपेठ उपलब्ध
पिंपरी चिंचवड : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. ही जत्रा कोठे भरवायची यावरुन सतत नगरसेवकात मतभेद निर्माण होतात. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 मध्ये जत्रा भरविण्याचा ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.
PCMC panel approves Metro extension report
Pimpri Chinchwad: The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation on Tuesday approved the detailed project report (DPR) for the exten.
Civic body to impose user charges for processing waste from bulk generators
PIMPRI CHINCHWAD: The civic body has proposed the collection of user charges from bulk garbage generators that do not process wet waste on their premi.
PCMC mayor Rahul Jadhav stands firm on Chikhali STP location
PIMPRI CHINCHWAD: Mayor Rahul Jadhav said the civic body will construct a sewage treatment plant(STP) in Chikhali to check pollution of the Indrayani .
‘रेडझोन’ची जमिन खरेदी करू नका
पिंपरी - दिघी, वडमुखवाडी, भोसरी येथील रेडझोन हद्दीतील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीनविक्रीची ‘दुकाने’ थाटली आहेत. मात्र, ‘रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते,’ असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे.
बहुचर्चित डिजीटल घड्याळाचा प्रस्ताव फेटाळला
पिंपरी- शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने 7 कोटी खर्चुन सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी 4 हजार 544 स्मार्ट वॉच थेट पद्धतीने भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला. मोघम प्रस्ताव सादर न करता त्याची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करा. त्यानंतर बघू, अशी स्थायी समिती सदस्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे. ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
महापालिका सेवक पत संस्थेवर कारवाईचा इशारा
पिंपरी – जिल्हा उप निबंधकांनी मागवलेला खुलासा वेळेत सादर न केल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पत संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उप निबंधक बी. टी. लावंड यांनी दिला. माजी संचालक गणेश भोसले यांनी तक्रार केली होती.
जागतीक भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त मोशीत बैठक
पिंपरी- जागतीक भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मोशीतील प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. ग्राहकांना आपले अधिकार समजावून सांगणे आणि ग्राहक जागृती करणे, ग्राहकांचे न्याय हक्कांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे व न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी अवलंबावयाच्या कार्य पद्धतीचा या बैठकीत उहापोह करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे स्थलांतरण पुन्हा लांबले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या चिंचवड येथील इमारती येथे सोमवारी (दि. 10) स्थलांतर होणार होते. मात्र अद्यापही इमारतीची कामे पूर्ण झालेली नसल्याने आयुक्तालयाचे स्थलांतर पुन्हा लांबले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)