Friday, 7 December 2018

महापालिकेची आर्थिक स्थिती असमाधानकारक

महापालिकेच्या दरवर्षी फुगविल्या जाणार्‍या अर्थसंकल्पाचा फुगा अखेर लेखा परीक्षण अहवालामुळे फुटला आहे. अर्थसंकल्प हा वास्तववादी असणे आवश्यक असताना महापालिकेने अवास्तव अंदाजपत्रकीय जमेच्या आधारावर विकासकामांना मंजुरी दिली जात असल्याचे ताशेरे लेखा परीक्षणात ओढण्यात आले आहे. तसेच अर्थसंकल्पातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधत महापालिकेची आर्थिक स्थिती असमाधानकारक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

कचरा निविदेतील ठेकेदाराची न्यायालयात धाव

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय घेतला. परंतु,  आरोपांच्या खैरातीमुळे वादग्रस्त ठरलेली ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. ही निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या निवेदेशी संबधित ए. जी. एन्व्हायरो या ठेकेदाराने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या निविदेप्रक्रियेला लागलेले वादाचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया आणखी लांबणार आहे.

प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे ब प्रभागाची बैठक ठरली वादग्रस्त

पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाची प्रभाग समितीची बैठक बुधवार (दि. ५) रोजी पार पडली. या बैठकीस प्रभाग समिती अध्यक्षा करूणा चिंचवडे, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, नगरसेविका नीता पाडाळे, उषा काळे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव यांनी समाविष्ट भागातील विकासकामांची केली पाहणी

चिखली  (दि. ०५ डिसें.) :-  पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेत समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, च-होली व डुडूळगाव येथील विकास कामांची पाहणी केली. यावेळी महिला बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरिदे, जे. डी. जाधव आदी उपस्थित होते.

मनाचा ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जाहीर

पिंपरी / पुणे (दि. ०५ डिसें.) :- पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे हा पुरस्कार सोहळा रविवारी (दि. ९) रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत.

स्मार्ट सिटीअतंर्गत प्रायोगिक तत्वावर 12 शाळा होणार स्मार्ट

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवडमधील बारा शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

Pimpri: पवनाथडी आयोजनावरुन सत्ताधा-यांमध्ये मतभेद,जत्रा भोसरी की चिंचवडला संभ्रामवस्था कायम !

एमपीसी न्यूज – महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेला वादाची परंपरा यंदाही कायम आहे. जत्रेचे ठिकाण भोसरी असावे की चिंचवड यावरुन सत्ताधारी नगरसेवकांमध्ये मत-मतांतरे असून महिला व बालकल्याण समितीने दोन परस्परविरोधी ठराव केले. 

खिळेमुक्त झाडांबाबत पालिका प्रशासनाची कारवाई शून्य

निगडी :अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत ‘खिळेमुक्त झाड’ हे अभियान गेले 8 महिन्यांपासून शहरात प्रभावीपणे सुरू आहे. काल प्राधिकरणातील सी.एम.एस. शाळेसमोरील रस्त्यावर हे अभियान राबवण्यात आले. शाळा असल्यामुळे इथे एका एका झाडावर 5 ते 6 क्लासचे बोर्ड अनधिकृतपणे लावण्यात आले होते. या 20 झाडांवरचे जवळपास 50 खिळे आणि तारा आणि 30 बोर्ड काढण्यात आले. स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहर म्हणून पिंपरी-चिंचवड हे शहर पुढे येत असताना झाडांवरचा कचरा मात्र प्रशासनाला दिसत नाही. नगरपालिकेत उद्यान आणि आकाश-चिन्ह विभागाकडे हवा तेवढा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे कारवाई होत नाही. त्यामुळे फ्लेक्स, बॅनर आणि खाजगी क्लासच्या जाहिरातींमुळे शहर बकाल होत चालले आहे.

प्रकल्प दहा वर्ष रखडल्याच्या मुद्द्यावरून सहशहर अभियंता राजन पाटील यांची पळवाट

पिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप करण्यास दिरंगाई करणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला रिपब्लिकन युवा मार्चाच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 4) ताळ्यावर आणले. या आंदोलकांनी सदनिका वाटपाला विलंब का होतोय? याचा जाब विचारला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकार्‍यांनी 9 इमारतीतील 378 सदनिका लाभार्थ्यांना हस्तांतरासाठी त्वरित कार्यवाही सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन आंदोलकांना दिले. दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम पूर्ण करत नसलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अजिज शेख यांनी केली. परंतु, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घरकुल प्रकल्पाच्या कामाला 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.

मोदींची ’59 मिनीटात एक कोटी’ एमएसएमई उद्योजकांसाठीची योजना फसवी

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एम. एस. एम. ई. उद्योजकांसाठी 59 मिनिटात 1 कोटी कर्जयोजना’ ही फसवी, निराधार, घोटाळेबाज योजना असून, केवळ निवडणुकीत सहकार्य केलेल्या आपल्या जुन्या मित्रांना आर्थिक मदत करून अर्थसंबंध जपण्यासाठी चराऊ कुरण आहे. देशात अनेक राष्ट्रीयीकृत बँका या कामासाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे या कामाची जबाबदारी न देता मोदींनी गुजरातस्थित एका संस्थेस या कामाचे कंत्राट दिले आहे. ‘उद्योजकांच्या हितासाठी’ या गोंडस नावाखाली एम. एस. एम. ई. चा आधार घेत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हेतू हाणून पाडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा, पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमेर्स, सर्विसेस अँड अग्रीकल्चर या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे.

सांगवीत 50 पेक्षा जास्त कंपन्यांचा रोजगार मेळावा

पिंपरी चिंचवड : नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. 8 डिसेंबर) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये 50 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालय येथे सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होईल, अशी माहिती संयोजक नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, कुणाल थोपटे, विकास शिंदे, सागर कोकणे, सुनील काटे आदी उपस्थित होते.

Mosquito-menace hits Sangvi hard, survey reveals

PIMPRI CHINCHWAD: Residents of Sangvi are most vulnerable to .. 

PCMC to cut 11,000 illegal water lines

PIMPRI CHINCHWAD: The civic body will continue its drive to cut all the 11000 unauthorized water connections.

Illegal hoardings: PCMC to spend Rs 3.5Cr

CHINCHWAD: The Pimpri Municipal Corporation will spend Rs 3.5 crore to remove 600 unauthorized hoardings in the municipal limits in 2018-19. 
The standing approved a short notice resolution to allocate Rs 2.5 crore to remove additional 300 unauthorized hoardings. The resolution stated that the administration had given a two-year contract to remove the 300 hoardings and Rs 1 crore was allotted for the same. The work is in progress however, it will require more money so the additional commissioner demanded an additional provision of Rs 50 lakh to be made for the same. But Rs 2.5 crore was allotted to remove 300 more unauthorized hoardings.

PCMC chief attends trial run of e-bus

Pimpri Chinchwad: Shravan Hardikar, the Pimpri Chinchwad municipal commissioner, and mayor Rahul Jadhav on Friday attended the trial run of an electric bus from Chikhli to Jadhavwadi on the Spine Road. The electric bus comes with a charging facility.

प्रशासकाच्या अंकुशाविना शाळा

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश नाकारल्यास कारवाई करण्यासाठी शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अद्याप मनुष्यबळाअभावी बहुतांशी शाळांवर प्रशासकच नेमले नाहीत. 

भाजप निष्ठावंतांचा पिंपरीत “एल्गार’

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील नाराज निष्ठावंतांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच शहरातील भाजपमधील सुमारे 300 निष्ठावंत कार्यकर्त्यांची अलिबाग सफर घडवून आणली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सत्तेत पदांचा वाटा न मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षात आपली ताकद दाखवून देवू, असा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. परिणामी, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा हा “एल्गार’ भाजपच्या दोन्ही आमदारांची डोकेदुखी ठरणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

…ही तर वीज ग्राहकांची लुटमार!

पिंपरी – वीज बिलाचा धनादेश बाउन्स झाल्यास अतिरिक्त दंड आकारून ग्राहकांच्या लुटमारीचा डाव महावितरणने आखला आहे. हा मागे घ्यावा अन्यथा महावितरणच्या विरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.

दापोडीत तासभर रास्ता रोको

पिंपरी – दापोडी परिसरातील पाणी पुरवठा गेल्या दीड वर्षांपासून विस्कळीत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह सुमारे तासभर रास्ता रोको केला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्याने जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी यावेळी केला.

झोपेची गुणवत्ताही आता तपासा!

पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात आहे. 

खासगीकरणामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी

पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

थकीत महसुलामुळे शेकडो वाहने जप्त

“आरटीओ’ ची कारवाई : वाहनांच्या लिलावाची तयारी
पिंपरी – शासनाचा थकवलेला महसूल व कागदोपत्राची पूर्तता न केल्याने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अनेक वाहने जप्त केली. मोशी येथे स्थलांतरित झालेल्या “आरटीओ’ कार्यालयात जप्त वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे दुचाकी वाहन तपासणी ट्रॅकची जागा या वाहनांनी व्यापली. महसूल बुडवणे, कागदोपत्रात अफरा-तफर करणे, वेळेत कागदपत्रांची पूर्तता न करणे यामुळे सदर वाहनांवर कारवाई केली आहे. या वाहन धारकांना सध्या आरटीओ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. वाहन धारकांनी नोटीसकडे दुर्लक्ष करुन शासनाचा महसूल किंवा कागद पत्रे वेळेत सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधीत वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगीतले. जीप, बस, स्कूल बस, ट्रक, पिकअप, दुचाकी व अवजड अशी 54 वाहने यावर्षी आरटीओने जप्ती केली. या वाहनांचा लिलावात जो पैसा मिळेल तो शासनाकडे जमा केला जातो. याबाबत हालचाल सुरू झाली असून वाहन धारकांनी महसूल जमा करुन आपले वाहन सोडवून नेण्याबाबत आवाहन केले आहे.