Wednesday, 28 September 2016

अमृत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बॅकबोन ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार... पिंपरी-चिंचवड शहराला हे तीन प्रकल्प 'तारणार' का?

स्मार्ट सिटीमधून (राज्य शासनाच्या चुकीने) बाहेर पडल्यानंतर शहराकडे तीन नवीन प्रकल्प आले ज्यातूनच राज्य/केंद्र सरकारचा निधी मिळणे शक्य होणार आहे. आम्ही PCCF, Connecting NGO या सर्व संस्थांनी स्मार्ट सिटी समावेशाचा आग्रह सोडला का? तर नाही! आम्ही समावेश होणार यासाठी अजूनही आशावादी आहोत कारण 100 पैकी 97 नावेच फायनल झाली आहे (इथे वाचा https://goo.gl/Wqf19w) महाराष्ट्राचे केंद्रात वजन असेल आणि स्थानिक नेत्यांचे राज्यात वजन असेल तर राहिलेल्या तीनमध्ये शहर अजूनही निवडले जाऊ शकते. महानगरपालिका निवडणूका जवळ आल्या आहेत तेव्हा श्रेयवादाच्या फेऱ्यात अडकलेल्या या शहराला न्याय मिळेल अशी अशा वाटते. सध्या तिसऱ्या यादीत शहराचे नाव का नाही यावर निरर्थक वाद/राजकारण चालू आहे. केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश नव्हता त्यामुळे दुसऱ्या/तिसऱ्या यादीत समावेशाचा प्रश्नच येत नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार...

पिंपरी-चिंचवडकरांना 'पर्यटननगरी'साठी प्रतीक्षाच

पिंपरी-चिंचवड शहरात दुर्गादेवी उद्यान, वॉटर पार्क, भोसरी तळे उद्यान, बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान, केजुदेवी बोट क्लब, शाहूनगर आणि पिंपळे गुरव उद्यान, महापालिकेचे विविध प्रकल्प आदी पर्यटनस्थळे म्हणता येतील, अशी ठिकाणे आहेत. संपूर्ण शहरच ...

PCMC seeks Rs 4 cr to repair dug up roads


Twitter control room on track: Pune Railway Division to respond to online complaints @ 4.4 min speed


पुणे-लोणावळा मार्गास महापालिकेचा 'रेड सिग्नल'


त्यावेळी, पुणे-लोणावळा लोहमार्गासाठी आर्थिक सहभाग न देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही काही महिन्यांपूर्वीच अशाच तऱ्हेने नव्या रेल्वेमार्गासाठी आपला हिस्सा उचलण्यास नकार दिला होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढीव खर्चाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या सात महिन्यांत ऐनवेळच्या प्रस्तावांच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, त्यामध्ये १३५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा समावेश आहे. या वाढीव ...

पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू


सायकलप्रेमींचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार होऊ लागले असून, सायकलिंग हा उत्तम व्यायाम असल्याचे मनोेमन पटलेल्यांच्या सायकली रोज सकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. रोज सकाळी शुद्ध हवेत जॉगिंंगसाठी ...

विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

विमानतळ पुरंदर ऐवजी चाकणला झाले असते, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असती व या परिसराचा विकास झाला असता. परंतु, राज्य सरकारने विमानतळ पुरंरदला हलविण्याच्या निर्णयाबाबत पिंपरी-चिंचवड ...

स्मार्ट सिटीबाबत आशा पल्लवित

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीआहे. अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा ...

पिंपरी-चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश करा - लक्ष्मण जगताप

त्या वेळी त्यांनी नवी मुंबई या योजनेतून बाहेर पडत असेल तर तिच्याऐवजी पिंपरी-चिंचवडमहापालिकेचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला त्यांनी अनुकूलता दर्शविल्याचे जगताप ...