MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 13 September 2018
Pimpri police plan action: Vehicles that stray into Nigdi-Dapodi BRTS lane to face Rs 1,000 fine
The Pimpri-Chinchwad Police have decided to take stringent action against private vehicles that use the dedicated lane of Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS). Traffic police will impose a fine up to Rs 1,000 on vehicles that use the BRTS lane, said Police Commissioner R K Padmanabhan. “We are ready to impose fines ranging from Rs 200 to Rs 1,000 on vehicles flouting the ban notification on BRTS lane… two-wheelers will face a fine of up to Rs 200 and four-wheelers will face a Rs 1,000 fine,” Padmanabhan told The Indian Express.
हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वांची मदत महत्वाची : पद्मनाभन
आयटी पार्क मधील वाहतूक समस्या कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळे प्रयोग राबवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मिटिंग घेऊन यावर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली. हिंजवडीमधील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला असून तो सोडविण्यासाठी सर्वांची मदत गरजेची असल्याचे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केले.
Metro work stuck at Khadki: Army blames state govt, MahaMetro officials hit back
The Indian Army on Tuesday blamed the Maharashtra government for the delay in sanctioning 10 acres of defence land in Khadki, which has stalled work on the Pune Metro project in the area for 10 months, and said the government had not offered ‘Equal Value Land’ for the required land.
झोपडपट्टीतील महिलांना मोफत चादर, ब्लॅकेट, बेडशीट
स्थायी समितीकडून मिळाली मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील महिलांना महापालिकेतर्फे प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक केबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट असा संच मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी 90 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. दरम्यान, महिला बचत गटांना देखील साहित्य देण्यात येणार होते. परंतु, उपसूचनेद्वारे बचत गटातील महिलांना साहित्य देण्याचे रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या विभागांतर्गत महिला व बालकल्याण योजना राबविली जाते.
16 कोटीच्या विकास कामांना मंजुरी
विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य
स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 16 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अर्थ सहाय्यामध्ये वाढ करून ती दहा हजार प्रति लाभार्थी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र होणारे अर्ज यांचा विचार करता या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्यक असून त्याकामी सुमारे एक कोटी 50 लाख रूपये इतकी खर्चासाठी तरतूद वर्गीकरण करणेस स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
नगरसेवक, अधिकारी कर्मचार्यांकडून केरळसाठी 1 कोटी 6 लाखांची मदत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्त
पिंपरी-चिंचवड : पुरामुळे उध्वस्त झालेल्या केरळवासीयांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक आणि कर्मचारी धावून गेले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन आणि अधिकारी व कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण 1 कोटी 6 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश बुधवारी (दि. 12) सुपूर्त करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Centre 'delays' Pune Metro work, but Maharashtra, PMC and PCMC prompt in transferring land for project
While the central government is yet to transfer land for Pune Metro, delaying part of the project for months, the state government, Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) have been prompt in ensuring that the required land is made available without much hassle. Officials of MahaMetro, the implementing agency for the project, said the crucial support from the three bodies has helped them push the project, but it has run into a hurdle because of the delay by the Defence Ministry.
PCMC fixed water leakage at Rahatani
On September 5, Mirror had pointed to the problem of overflowing water at a busy chowk in Pimpri-Chinchwad
Slow progress on construction of 60k houses in PCMC limits
Pimpri Chinchwad: There has been a six-month delay in the co ..
हायपरलूपचा अहवाल ‘आयआयटी’ तपासणार
येत्या तीन महिन्यांत निरीक्षणे 'पीएमआरडीए'ले देणार
पुणे-मुंबई दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी 'व्हर्जिन हायपरलूप वन'ने 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'कडे (पीएमआरडीए) सादर केलेल्या अहवालाचा आढावा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'कडून (आयआयटी, मुंबई) घेण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईकडून आगामी तीन महिन्यांत अहवाल प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे.
पुणे-मुंबई दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी 'व्हर्जिन हायपरलूप वन'ने 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'कडे (पीएमआरडीए) सादर केलेल्या अहवालाचा आढावा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'कडून (आयआयटी, मुंबई) घेण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईकडून आगामी तीन महिन्यांत अहवाल प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे.
प्राधिकरण इमारतीमधील ‘स्कॅनर’सह ‘टच स्क्रिन’ही बंद
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ सुसज्ज अशी पर्यावरणपूरक इमारत बांधली आहे.
शौचालय कामात गोलमाल?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने कासारवाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ‘पैसे द्या व वापरा’ तत्वावर शौचालय बांधले जाणार आहेत. या सुलभ शौचालयाच्या एकाच प्रकारच्या दोन्ही वेगवेगळ्या कामात तब्बल 41 लाख 9 हजार 146 रुपयांचा फरक आहे. स्थायी समिती सदस्यांनी देखील याची माहिती न घेता दोन्ही विषयांना डोळे झाकून मंजुरी दिली. हा फरक नेमका कोणत्या कारणांमुळे आहे, हे समितीला सांगता देखील आले नाही. सुलभ इंटरनॅशनल संस्थेकडून विद्याविकास शाळा आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या ठिकाणी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पुरुषांसाठी 10 शौचालये, सहा स्वच्छतागृहे, तर महिलांसाठी सात शौचालये व केअर टेकरसाठी रुम बांधली जाणार आहे.
स्मार्ट सिटी, शांततेचे शहर बनवू या
पिंपरी - ‘‘हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण वाढवू नका, आपल्याला आपले शहर स्मार्ट सिटी, शांततेचे शहर (सायलेन्ट सिटी) बनवायचे आहे,’’ असे भावनिक आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले. निमित्त होते, आरटीओ, पोलिस आयुक्तालय, रोटरी क्लब आणि बसचालक असोसिएशनतर्फे ‘नो हॉर्न’ दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहिमेचे.
HINI deaths attributed to delays in treatment
Delay in seeking medical treatment, which resulted in patien ..
खासगी रुग्णालयात 300 रुग्ण
पिंपरी:पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयात सुमारे 200 ते 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव वाढत असून तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी केल्या आहेत.
पुणे, पिंपरीमधील पावणेदोनशे पतसंस्था तोट्यात!
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती चांगली असली तरी एकूण पतसंस्थांपैकी सुमारे पावणेदोनशे पतसंस्था सध्या तोट्यात आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, एखादी पतसंस्था सातत्याने तोट्यात येऊन अडचणीत येण्यापूर्वी त्यांचा कारभार वेळीच सुधारता यावा, यासाठी सरकारने नेमलेल्या राज्यस्तरीय समितीचे काम संथ गतीने सुरू आहे.
महापालिकेच्या शिक्षक दिनाला मुहूर्त?
पिंपरी – महापालिकेने सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनाला कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याने सर्वस्तरातून टीका झाली होती. परंतु, लांबणीवर पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येत्या आठ दिवसांत मुहूर्त मिळणार आहे. कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची 19 सप्टेंबरला तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
रेल्वे “ब्लॉक’मुळे प्रवासी हैराण
पिंपरी – गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना रेल्वे प्रशासनाने लोकलच्या 20 दिवस काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. खास गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ (एस. टी) व पीएमपीएमएल प्रशासन जादा गाड्या सोडत असताना रेल्वेने मात्र फेऱ्या रद्द केल्याने गौरी-गणेशोत्सात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
मजूर अड्ड्यासाठी महापालिकेवर धडक
पिंपरी – “”कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “”कामगार नाका झालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे”, “”कामगार एकजुटीचा विजय असो” अशा जोरदार घोषण देत, शहरातील हजारो असंघटीत कामगारांनी टिकाव, फावडे, घमेल्यासह बुधवारी (दि. 12) महापालिकेवर धडक दिली.
Subscribe to:
Posts (Atom)