Thursday, 2 January 2014

महापालिका अधिका-यांसाठी 'आठवड्याचा मानकरी' उपक्रम

रामदास तांबे ठरले पहिले मानकरी
महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कठोर शिस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आता आपली प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न केला आहे. आठवडाभरात चांगले काम करणा-या अधिका-याला 'आठवड्याचा मानकरी' किताबाने

निगडीतील चौकाला स्व. शांताराम भोंडवे यांचे नाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील सेक्टर 26 येथील स्वा.सावरकर उद्यान पाटीदार भवन समोरील चौकाचे स्व. शांताराम एल. भोंडवे, माजी मुख्य उद्यान अधिक्षक असे नामकरण आज (बुधवारी) महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी सुधारित प्रस्ताव केंद्राकडे

पिंपरी-चिंचवड हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मेट्रोसाठी सुधारित प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावाला केंद्राने मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वायसीएमएचमध्ये रुग्णांच्या मोफत जेवण योजनेला मंजुरी

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएमएच) राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार घेणा-या केसरी व पिवळ्या रेशनकार्डधारक रुग्णांना मोफत उपचारांबरोबरच मोफत जेवणाची सुविधा देण्यात येणार असून पॅन्ट्रीची सुविधा कार्यान्वित होईपर्यंत सुमारे 3 महिने कालावधीसाठी 90 रुपये प्रति व्यक्ति प्रतिदिनाप्रमाणे येणा-या खर्चाला स्थायी समितीने आज मान्यता

तळीरामांकडून १ कोटीचा दंड वसूल

वाहतूक पोलिसांनी सरत्या वर्षात शहरातील तळीरामांकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यांत सर्वाधिक असा ३० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या २५३ तळीरामांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

"आप' करणार दिग्गजांना "गप्प'

पिंपरी - महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळींना "टार्गेट' करून राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडवून देण्याचा अजेंडा आम आदमी पक्षाचा असल्याने नवीन वर्षात अनेक सर्वपक्षीय नेते, अधिकारी आणि सरकारशी जवळीक असणारे ठेकेदार यांची डोकेदुखी वाढणार आहे.

जेनेरिक औषधे "ब्रॅंडेड'इतकेच "रामबाण'



पुणे - स्वस्त दरात मिळणारी जेनेरिक औषधे देखील ब्रॅंडेडइतकीच गुणकारी असतात, असा निर्वाळा शहरातील बहुसंख्य वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.