Pune: The state election department has asked housing societies to check for missing names in the voters' list to be published on Friday.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 12 January 2019
CM vows Pavana-Nigdi water pipeline solutions
PIMPRI CHINCHWAD: The state government will try to find a solution agreeable to the Pimpri Chinchwad Municipal Corporation and the farmers of Maval to resume work on the Pavana dam-Nigdi water pipeline project.
बोपखेल रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याची लष्कराची मागणी आता पूर्ण केली जाणार आहे. पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लष्कराला कोणती जागा उपलब्ध करून द्यायची याबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना शुक्रवारी (दि. ११) आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा सरकार आणि महापालिकेचा प्रयत्न राहिल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
दीड वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात सर्वांधिक कामे : मुख्यमंत्री फडणवीस
पिंपरी चिंचवड शहरातील मागील सत्ताधार्यांनी जितके काम केले नाही, त्यापेक्षा अधिक काम दीड वर्षांच्या कालावधीत केले आहे. फेब्रुवारीत आणखी 1 हजार कोटींच्या कामाचे उद्घाटन आहेत. भाजपच्या हातात सत्ता आल्यानंतर काय करू शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, पाच वर्षांच्या कालावधीतील बदल नागरिकांना दिसेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना, ‘अर्बन स्ट्रीट डिजाईन’अंतर्गत 5 रस्त्यांचे सुशोभिकरण आणि स्मार्ट सिटी अंतर्गत फायबर केबल नेटवर्किंगच्या कामाचे ई-भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
आयुक्त अनधिकृत फलक उभारणीस चालना देणारा खरा मास्टरमाइंड शोधा
पिंपरी (दि. ११ जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अनधिकृत फलक हटवण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. शहरातील मोठी अनधिकृत फलक हटवण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जाते. पालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पोसण्याची भमिका अधिकारी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी केला आहे. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन आहे.
Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील तक्रार पेट्या तक्रारींच्या प्रतीक्षेत
एमपीसी न्यूज – महिलांवरील अत्याचार, चो-या आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात फिरती तक्रार पेटी ही संकल्पना सुरु केली. मात्र तक्रार पेटी वारंवार फिरती राहिल्याने तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही.
Bhosari : पवनाथडीच्या धर्तीवर आता भोसरीकर भरविणार इंद्रायणीथडी !
एमपीसी न्यूज – महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणारी यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा घेण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर भोसरीकर आता पवनाथडीच्या धर्तीवर लवकरच इंद्रायणीथडी जत्रा भरविणार आहेत.
अबब… ७० टक्के आरक्षित जागाही पिंपरी चिंचवड मनपाच्या ताब्यात नाही
पिंपरी चिंचवड : घर बचाव संघर्ष समिती गेल्या ५७५ दिवसांपासून हक्कांच्या घरांसाठी आंदोलन करीत आहे.त्या नुसार अनेक वेळा पत्रव्यवहारही पालिकेला केला आहे.आरक्षित जमिनीबाबत मोठी तफावत असल्याकारनाने त्याचप्रमाणे महापालिका हद्दीतील मोठ्या आरक्षित जागेंवर आता घरेही गेल्या २५ वर्षात उभी राहिल्यामुळे शहराचा डी पी अद्यावत करावा ह्याकरता समिती महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार सदरच्या पत्रामुळे मोठी बाब उघड झाली असून ११६७.७८ हेक्टर जमिनीपैकी फक्त ३९५.३९ हेक्टर जमीन क्षेत्र आता मनपाच्या ताब्यात आहे. उर्वरित ७७२.४० हेक्टर जमीन क्षेत्र हे मनपाच्या ताब्यात नाही.
वाकड-हिंजवडी रस्ता रुंदी करणाचा मार्ग मोकळा
हिंजवडी : वाकड येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रूंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी 19 कोटी 58 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना जादा दराची आलेली निविदा स्वीकरत रुंदीकरणासाठी 20 कोटी 55 लाख रुपयांचा खर्चाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. वाकड येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी येथे पिंपरी महापालिका हद्दीपर्यंत बीआरटी कॉरिडॉरवर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या रस्ता रूंदीकरणासाठी 19 कोटी 58 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 19 कोटी 46 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या.
पिंपळेसौदागरमधील विकासकामांची महापौरांकडून पाहणी
सांगवी : पिंपळे सौदागर येथील विविध विकासकामांची महापौर राहूल जाधव यांनी पाहणी केली. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे महापौरांचे अधिकार्यांना आदेश दिले. पिंपळे सौदागर प्रबाग क्रमांक 28मधील रहाटणी- पिंपळे सौदागर येथील विविध विकास कामांची महापौर राहूल जाधव यांनी पाहणी केली.
PCMC to stage light and sound show at busy junction to attract tourists
PCMC to stage light and sound show at busy junction to attract tourists Times of India
PIMPRI CHINCHWAD: The busy Bhakti Shakti Chowk in Nigdi will now be the stage for a light and sound show developed by the civic body as a part of its .
खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम लवकरच
पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान आदी प्रकारच्या सुविधा विकसित करण्याचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले असून, आगामी दोन महिन्यांत या कामाला सुरवात होणार आहे.
कचरा निर्मूलन, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
मेट्रो करणार ‘थर्ड पार्टी ऑडिट’
पुणे - मेट्रो प्रकल्पात नाशिक फाट्याजवळ नुकताच झालेला अपघात हा कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पायलिंग रिग चालकाला कामावरून काढून टाकण्यात आले असून, कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे, अशी माहिती महामेट्रोकडून गुरुवारी देण्यात आली. तसेच, मेट्रो प्रकल्पातील कामांची सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी एका त्रयस्थ संस्थेकडून सुरक्षिततेचा अभ्यास (थर्ड पार्टी ऑडिट) करून घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दीड हजार बेघरांना हक्काचे घर
पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातील चऱ्होली-कोतवालवस्ती येथे प्रस्तावित १४४२ सदनिकांच्या प्रकल्पाला मुहूर्त मिळाला असून, त्याची वर्कऑर्डर काढली आहे.
उपचारास नकार दिल्यास रुग्णालयांवर “गुन्हा’
मुंबई – लैंगिक अत्याचार तसेच ऍसिड हल्ल्यातील महिलेवर उपचार नाकारणे आता सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना महागात पडणार आहे. अशा रुग्णांवर तातडीने मोफत प्रथोमचार न दिल्यास संबंधित रुग्णालयांवर भादंवि 166 (ब) कलमांतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आज परिपत्रक जारी केले आहे.
“टाऊन प्लॅनिंग’नुसार समाविष्ट गावांचा विकास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 12 समाविष्ट गावाचा टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास केला जाणार आहे. आराखडा व नियोजन करून रस्ते बांधण्यास प्राधान्य दिले जाईल. महापालिकेच्या 19 जानेवारी रोजी होणाऱ्या महासभेसमोर या विषय ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
चिखलीतील महापालिका शाळेचे काम अंतिम टप्प्यात
पिंपरी – चिखली या ठिकाणी सोयी-सुविधायुक्त महापालिका शाळेच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार मजली इमारतीमध्ये लिफ्टसह अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीचे अंतर्गत काम पूर्ण झाले असून बाहेरील संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. यामुळे, विद्यार्थी जुन्या शाळेतून लवकरच नवीन इमारतीत दाखल होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
महिला बाल कल्याण समितीला दौऱ्याचे वेध
पिंपरी – दौऱ्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असताना आता महिला व बालकल्याण समितीचे सदस्य जानेवारी महिनाअखेर अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. पवनाथडी जत्रेमुळे लांबणीवर पडलेल्या या दौऱ्याला आज (शुक्रवारी) झालेल्या समितीच्या सभेत पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दौऱ्याचा खर्च गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची चौकशी होणार
पिंपरी – पिंपळे सौदागर परिसरात एका जमिनीबाबत व्यावसायिकांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील एका बांधकाम व्यावसायिकास जमीन मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या चौकशी होणार आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)