पिंपरी - वाहतूक पोलिसांनी हिंजवडीत सुरू केलेला एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे शनिवारी (ता. ८) काढण्यात आली. पोलिस, एमआयडीसी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती. यामध्ये या परिसरातील ४०० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 9 September 2018
विसर्जन घाटांची स्वच्छता सुरू
पिंपळे सौदागर – गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना अद्याप गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली नव्हती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सदर बाबीची दखल घेत तातडीने पालिका आरोग्य विभागास संपर्क साधून देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदी पात्र परिसर तसेच बाकी सर्व घाटांची साफ-सफाई करण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानंतर देवी आई माता व दत्त मंदिर घाट व नदीपात्र परिसर साफ सफाईच्या कामास पालिका आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.
महापालिकेची “हायटेक’ उपक्रमशिल शाळा
पिंपरी – महापालिकेची शाळा म्हटलं की नाक मुरडलं जातं. गुणवत्तेवरुन कायम ताशेरे ओढले जात असताना इतर उपक्रम तर या शाळांच्या गावीही नसतात. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेची अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा अपवाद ठरली आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्टींग, कुंडी प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, योगा, वाचन प्रकल्प यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत असून विद्यार्थ्यांना चक्क “ई-लर्निंग’ची सुविधा आहे. त्यामुळे शाळेने नुकतेच “आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे.
गुडघे प्रत्यारोपणासाठी “वायसीएम’चा आधार
पिंपरी – गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी महापालिकेचे वायसीएम रुग्णालय वरदान ठरत आहे. खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चून होणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण साहित्य वगळता अन्य कोणताही खर्च करावा लागत नसल्याने अनेक गरजू रुग्ण आपल्या पायावर “उभे’ आहेत.
Swine Flu deaths touch 14 in Pimpri-Chinchwad
The number of deaths due to swine flu in Pimpri-Chinchwad touched 14 with one male succumbing to the H1N1 virus, on Thursday, official sources said.
Padmanabhan, Hardikar meet representatives of mandals
To be able to provide adequate bandobast during Ganesh Chatu ..
विनापरवाना पोस्टरसाठी प्र.चौ.मी.650 रुपये दंड
शहर विद्रुप करणार्यांवर होणार गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकती अथवा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स, बॅनर्स अथवा भित्तीपत्रके लावून शहर विद्रुप करणार्यांकडून प्रती चौरस मीटर 650 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच आरोग्य निरीक्षकांकडून संबंधितावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने मान्यता दिली. शहरातील ठिकठिकाणच्या पालिकेच्या मिळकती, रस्त्याच्या कडेला, पुलाचे कठडे, भिंती, विद्युत फिडर आदी ठिकाणी विनापरवाना भिंतीपत्रके, हॅण्डबिल, पोस्टर्स, स्टीकर्स लावले जातात. तसेच, जाहिरातीसाठी रंगकाम केले जाते. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. या संदर्भात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा सूचना स्थायी समितीने दीड महिन्यांपूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या. अखेर त्यासंदर्भात नुकतीच प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. कारवाईचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकास दिले आहेत.
Why Metro work on Khadki stretch is stuck, and how Pune MPs can help move it forward
In the last one week, two important developments have come to light vis-a-vis the Pune Metro project.The first one pertains to the suspension of two engineers by Brijesh Dixit, managing director of MahaMetro, the implementing agency of the project.
PCMC to take action against pig breeders
The health department on Wednesday issued a directive that c ..
One-way trial run at IT park to go on for 15 days
The Pimpri Chinchwad police have introduced minor changes in ..
आता मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी होणार आणखी सोपी
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) आता आणखी सोपी होणार आहे. यासाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहेत . टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) लवकरच पोर्टेबिलिटीसाठी लागणारा वेळ ७ दिवसांवरुन २ दिवस करण्याच्या तयारीत आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सहज होण्यासाठी ट्रायकडून एप्रिलमध्ये मसुदा तयार करण्यात आला होता. यात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बाबत नवी नियमावली तयार करण्यात आली होती.
सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही सत्ताधारी नगरसेवकांची कामे मार्गी लागत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक संताप व्यक्त करीत आहेत. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आली. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत पालिका प्रशासनावर तोंडसुख घेत अनेक गंभीर आरोप केले.
प्राधिकरण सदस्य निवडीतील ‘वाट्या’मुळे भाजप कार्यकर्ते गॅसवर
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांची निवड करण्यात आली आहे. खाडे यांच्यासह सात जणांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे. नियमानुसार दोन नगरसेवक घेणे बंधनकारक आहे. सदस्य निवडीत भाजपाला 60 आणि मित्रपक्षाला 40 टक्के असा फॉर्मुला तयार केल्याने सदस्य निवडीत शिवसेना आणि आरपीआयला संधी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे सदस्य पदात वाटेकरी वाढल्यामुळे प्राधिकरण सदस्य होण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप कार्यकर्ते सध्या गॅसवर असल्याचे पाहवयास मिळत आहेत.
पारंपरिक ढोल-लेझीमचा वापर करावा; शांतता बैठकीत आयुक्तांचे मंडळांना आवाहन
शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेतलेली असून त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल. विसर्जन मार्गावरील खड्डे हे बुजवण्यात येतील. तसेच, अधिकृत विज जोड घ्यावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या जाहीर आवाहनाप्रमाणे गणेश मंडळानी कार्यवाही करावी. मिरवणुकीतील पारंपारिक ढोल लेझीमचा वापर करून ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी लोखंडी ढोलचा वापर कमी करण्याबाबत मंडळानी विचार करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
कारवाईत जप्त केलेल्या हातगाड्या, टपर्यांचा दंडाची रक्कम निम्माने कमी करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या हालचाली सुरू
पिंपरी-चिंचवडमहापालिकेने कारवाईत जप्त केलेल्या हातगाड्या, टपर्या, वाहन व साहित्य परत करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दंडाची रक्कम निम्माने कमी करण्याचा सत्ताधारी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भात पदाधिकार्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली.
अखेर सोमवारपासून जयहिंद शाळेत विध्यार्थाचा प्रवेश; निर्भीडसत्ताच्या बातमीचा दणका
पिंपरीतील जय हिंद शाळेने ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला आहे अशी बातमी निर्भीडसत्ता या वेब पोर्टने शुक्रवारी (दि. ७) प्रसिद्ध केली होती. जयहिंद शाळेच्या प्रशासनाने याची दाखल घेत शाळेच्या प्राचार्या जोतिका मलकानी, जोशी सर यांनी राजेश रोचीरमानी यांच्या मुलाला सोमवारपासून शाळेत येण्यास सांगितले आहे.
आळंदीत अतिक्रमणाची दाटी
आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीला विविध कारणांनी अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे, त्यामुळेच येथे जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. माउली मंदिर परिसरातील फुटभर जागेला तर सोन्याचा भाव आला असून, अतिक्रमणांचा जणू येथे बाजारच भरलेला दिसतो आहे. त्यामुळे “माउलींच्या नगरीत होते अतिक्रमणांची दाटी…; कोणाचीच कशी येत नाही आडकाठी…!’ असे म्हणण्याची वेळ आळंदीकरांवर आली आहे.
पाणीवाटपाची फेररचना?
शहर आणि जिल्ह्यातील पाणीवापराची सद्यस्थिती आणि पुणे महानगर क्षेत्रातील भविष्यातील पाण्याची उपलब्धता आणि गरज यांचा आढावा घेऊन पाणी वाटप आणि वापर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नियुक्त केली आहे. महापालिकांमधील पाण्याच्या वापरासह सिंचनासाठी उपलब्ध क्षेत्र आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या पाण्याच्या वापराचा अभ्यास करून त्याचा अहवाल जलसंपदा विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, शहराच्या पाणीवापराचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)