Friday, 15 September 2017

महापालिकेच्या आयटी विभागाचा ‘सारथी’ बदला : अमोल थोरात

रोखठोक न्यूज
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान अर्थात ‘आयटी’ (इन्फर्मेशन टेक्नालॉजी) विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’चे सारथ्य महापालिकेचा आयटी विभाग करणार आहे. असे असले तरी महापालिकेच्या आयटी विभागात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ आहे. या विभागाचा अन्य विभागांशी असलेला समन्वयाचा अभाव आणि या विभागप्रमुखांचा एकांगी कारभार यामुळे आयटी विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. संबंधित विभागप्रमुखांच्या मक्तेदारी पध्दतीच्या कारभारामुळे महापालिकेची वेबसाईट आणि विविध अ‍ॅप्स सहज हॅक करता येईल, अशा पध्दतीने त्यांची रचना आहे. या विभागाचा ‘सारथी’ कार्यक्षम आणि तत्पर तसेच पारदर्शी कारभारावर भर देणारा नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या अंमलबजावणीत अशा अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेचा ‘व्हायरस’ निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांना हटवून आयटी विभागाचा ‘सारथी’ बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

[Video] पिंपरी-चिंचवड । गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

Crime Increase in Pimpri Chinchwad City

सब को मालूम है और सब को खबर हो गई

आता तर विकिपीडिया मुळे सर्व जगाला माहित झाले आहे, निगडीपासून पुणे मेट्रो फेज 1 सुरु करणे का महत्वाचे आहे आणि पिंपरी चिंचवड शहरावर कसा अन्याय होत आहे!

अखेर शिक्षिका गजाआड, बालक मारहाणप्रकरण, एक दिवसाची पोलीस कोठडी

पिंपरी : पिंपळे गुरव येथील भावनगरमध्ये राहणाºया देव कश्यप या अडीच वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. डोळे सुजेपर्यंत मारहाण करणाºया या शिक्षिकेविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

फायर 'एनओसी' आॅनलाइन, सप्टेंबरअखेर कार्यवाहीला होणार सुरूवात

बांधकाम करण्यासाठी अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र, दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना अनेक दिव्यातून जावे लागत होते. मात्र, फायर एनओसीसाठी आता पिंपरी-चिंचवडमहापालिकेत चकरा माराव्या ...

शिवाजीराव आढळरावांची मोर्चेबांधणी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामांचे श्रेय एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळू नये, या उद्देशाने शिवसेनेच्या खासदारांनीही महापालिकेच्या, तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासकामांमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील रस्सीखेच तीव्र होत असल्याचे गेल्या महिनाभरात जाणवू लागले आहे.

पीएमपीएमएलच्या प्रस्तावित भरतीचा ” बाजार’ उठला

* किमान तीन वर्षे भरतीच नाही
* आर्थिक ” भार’ कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
* तीन वर्षानंतरही नव्याने प्रक्रिया राबविणार
* राज्यभरातील 90 हजार बेरोजगारांचे भवितव्य टांगणीला

या माहितीतून वाचा ‘आधार’ बद्दल सर्व काही

नवी दिल्ली – आपले बँक खाते व मोबाइल नंबर आधार शी जोडणे आता आवश्यक करण्यात आले आहे. जर बँक खात्याबद्दल बोलायचे झाले तर यासाठी 31 डिसेंबर च्या आत आपण आपला आधार क्रमांक बँकेत देणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर आता नवे खाते उघडण्यासाठीही आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या बरोबरच आता 50,000 रुपयांहून अधिक पैशाची देवघेव करण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

देशातील १.५५ लाख टपाल कार्यालयांत पेमेंट बँक सुविधा

भारतीय टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) वेगाने विस्तार करणार आहे. देशभरातील १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्यात येणार असून याद्वारे सर्व आर्थिक सेवा पुरवण्यात येणार आहेत. २०१८ अखेरीपर्यंत १.५५ लाख टपाल कार्यालये आणि तीन लाख कर्मचाऱ्यांमार्फत ही सेवा दिली जाईल.

महापालिका देणार महिलांना चारचाकी वाहने चालविण्याचे प्रशिक्षण

शहरातील विविध विकास कामांसाठी १३ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना चारचाकी हलके वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, त्यासाठी येणाऱ्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्याकरीता सुमारे १३ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

लिनिअर अर्बन गार्डन येत्या चार महिन्यात होणार खुले

पिंपरी – परदेशातील उद्यानांच्या धर्तीवर पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते स्वराज गार्डनदरम्यान साकारण्यात येणारे “लिनिअर अर्बन’ उद्यानाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करून या उद्यानाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला असून येत्या चार महिन्यात हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

बीआरटी, मेट्रोबाबत नगरसेवकांची बैठक घ्यावी

पिंपरी – शहरातील मेट्रो, बीआरटीएस या महत्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळावी, यावर प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेवून सर्व नगरसेवकांना द्यावी, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली.