Tuesday, 18 December 2012

PCMC to give report on pros and cons of LBT

PCMC to give report on pros and cons of LBTThe Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) is all set to abolish octroi and start the local body tax (LBT) though it is yet to get an official go ahead from the state government. Presently, it is preparing a report on the advantages and disadvantages of the LBT and a work-plan for implementing the proposed tax. The report will be submitted by the end of the month.

Install CCTV cameras to prevent thefts, police chief tells Pimpri Chinchwad industrialists

Install CCTV cameras to prevent thefts, police chief tells Pimpri Chinchwad industrialists: Police commissioner Gulabrao Pol on Monday advised industrialists in Pimpri-Chinchwad to install CCTV cameras, employ young and capable security guards, and check the background of employees before their appointment to reduce the thefts occurring in industrial areas.

PMC panel okays metro from PCMC to Swargate

PMC panel okays metro from PCMC to Swargate: The PMC standing committee on Monday gave a green signal to a metro corridor between Pimpri-Chinchawad and Swargate and also decided to extend the corridor to Katraj.

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोलाहिरवा कंदील

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोलाहिरवा कंदील: पुणे। दि. १७ (प्रतिनिधी)

स्वारगेट ते पिंपरी या १६.५ किलोमीटरच्या मेट्रोच्या मार्गास स्थायी समितीने आज हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या मार्गास पिंपरी-चिंचवड महापालिकेने मान्यता देण्यास लावलेल्या दोन वर्षांच्या उशिरामुळे या मार्गाच्या वाढीव खर्चाचा बोजा पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. याशिवाय हा मार्ग पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यासही समितीने एकमताने मान्यता दिली असून, त्याचा प्रकल्प आराखडा नंतर तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) मेट्रोचा अहवाल चार वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. वनाज ते रामवाडी या १६.५ किलोमीटरच्या प्रस्तावास पुणे महापालिकेने यापूर्वीच मान्यता दिली असून, नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वारगेट ते पिंपरी या १६.५ किलोमीटरच्या मार्गास मान्यता दिल्यानंतर महापालिकेच्या हद्दीतून जाणार्‍या मार्गाच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. त्यावर आज अखेर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले.

वाढीव ५ टक्के खर्च पुणे पालिकेवर
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील या दोन्ही मार्गांचे प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर एका वर्षात सर्व मान्यता मिळून काम सुरू न झाल्याने मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. पिंपरी ते स्वारगेट मार्गासाठी ५ हजार ९९८ कोटी रुपये खर्च येणार होता. पिंपरी पालिकेने उशीर केल्याने तो ७ हजार ९४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या मार्गाचा प्रस्तावही लवकरच मुख्य सभेच्या मान्यतेने राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. आज मान्य करण्यात आलेल्या मार्गापैकी ९.४४ किलोमीटरचा मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. यातील जवळपास ४.६६ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. रस्त्यावरील मेट्रोपेक्षा भुयारी मेट्रोसाठी तीनपट अधिक खर्च येतो. त्यामुळे पुणे महापालिकेस या मार्गासाठी अधिकचा ५ टक्के खर्च करावा लागणार आहे.

स्वारगेट ते कात्रज मार्गावरही धावणार मेट्रो
स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यासाठीच्या नगरसेवकांनी ठेवलेल्या प्रस्तावासही समितीने मान्यता दिली. त्यामुळे हा मार्ग आता पिंपरी ते कात्रज असणार आहे. यासाठीचा प्रकल्प आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे चांदेरे यांनी सांगितले. या मार्गासाठी किती खर्च येणार याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत करण्यात आली नाही.

Bhosari to have industrial estate for retired soldiers

Bhosari to have industrial estate for retired soldiers: MESCO has bought 2.5 acres near Pune-Nashik highway for the first-of-its-kind project

Infant drowns in bucket full of water

Infant drowns in bucket full of water: Pune: A one-and-half-year-old boy died after drowning in a bucket full of water in Rahatani area of Pimpri Chinchwad, on Monday afternoon.

Pimpri-Chinchwad-Swargate metro route gets nod

Pimpri-Chinchwad-Swargate metro route gets nod: Pune: The Standing Committee of the Pune Municipal Corporation, last Friday, approved a proposal to construct the metro route from Pimpri-Chinchwad to Swargate.

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांनी आपल्या तक्रारींचे गोठोडे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ याच्यासमोर उघडले

उद्योगनगरीत वाढत्या चोरीच्या घटनांनी उद्योजकांना सळो की पळो सोडले आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळे कामगार, लघुउद्योजक असुरक्षित आहेत असे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांनी आपल्या तक्रारींचे गोठोडे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ याच्यासमोर उघडले. या चो-यांवर आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क राहातील असे आश्वासन त्यांनी देत या उद्योजकांची बोळवण केली.


चिंचवड येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या हॉलमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांच्या समस्या जाणून घेणे व उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लघुउद्योजक व पोलीस यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्यावेळी लघुउद्योजकांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासमोर 'एमआयडीसी'तील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव दीपक करंदीकर, पिंपरी-चिचंवड प्लास्टिक असोसिएशनचे गोविंद पानसरे, लघुउद्योग संघटनेचे सचिव संदीप बेलसरे, लघुउद्योजक दीपक फल्ले, संजय आहेर, विकास ताकवणे, शिवाजी साठे, जगदीश राणे, आर. एस. नागेशकर, अमोल सोमाणी, सुभाष कारकर, साहेबराव खरात आदींनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या.

एमआयडीसीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांच्या मदतीने महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोर कारखाने लुटत आहेत. चोरांकडून भंगार विकत घेणा-या व्यावसायिकांवर कारवाई करावी, त्यांना जरब बसविण्यासाठी चिखली, कुदळवाडी, तळवडे परिसरातील विनापरवाना स्क्रॉप डिलरवर कारवाईची मागणी लघुउद्योजकांनी केली आहे.

प्रत्येक महिन्याच्या सात ते 15 तारखेच्या दरम्यान कामगारांची होणारी लुटमार रोखा अन्यथा उद्योगधंदे बंद पाडण्याची वेळ येईल. चोरी, लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उद्योगनगरीतील कामगार, मालक असुरक्षित झाले आहेत. या सर्व प्रकारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या सुरक्षा अधिका-यानेही कंपनीच्या जागेतील झोपड्यांच्या अतिक्रमणाबाबत व्यथा व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत उद्योजकांच्या समस्या गंभीर आहेत. उद्योगनगरीत सुमारे चार हजार लहान मोठे उद्योग आहेत. याठिकाणी माथाडी कामगारांची समस्या, भंगार वितरक, लुटमार, खंडणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहाण्याची गरज असल्याचे मत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.

लघुउद्योजकांनी कारखान्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत, त्यामुळे कारखान्यातील चोरीच्या घटना रोखल्या जातील. एमआयडीसीतील जागांवर झालेल्या अतिक्रमणासाठी पोलीसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. याशिवाय चोरीचा माल विकत घेणा-यांवर पोलीस कारवाई करतील. खंडणी मागणा-यांवर कारवाई केली जाईल, दादागिरी, भाईगिरी आणि भीतीचे वातावरण निर्माण करणा-यांना पोलीसी खाक्या दाखविला जाईल. पगाराच्या काळात 'एमआयडीसी'त कामगारांना होणा-या लुटमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांकडून गस्त घातली जाईल, खंडणीची मागणी केली तर ताबडतोब पोलिसांना कळवा, असे आश्वासन देऊन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी या उद्योजकांची बोळवण केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

खेळताना बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा अंत

खेळताना बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा अंत
पिंपरी, 17 डिसेंबर
आई झोपलेली असताना खेळत-खेळत पाण्याच्या बादलीत पडून बुडाल्याने एक वर्षाच्या चिमुरड्याचा आज दुपारी दुर्दैवी अंत झाला. पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी भागात ही दुर्घटना घडली. पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांना प्राण गमवावा लागण्याची महिनाभरातील पिंपरी-चिंचवडमधील ही चौथी घटना आहे.

समीर अर्जुनकुमार केवाट (वय एक वर्ष) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. समीरचे वडील हे अनिलकुमार हे मूळचे छत्तीसगडचे बिगारीकामासाठी ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. शाहूनगर येथे ते राहात होते. आज सकाळी समीरची आई बाळाला घेऊन रहाटणी येथे नातेवाईकांकडे गेली होती.

त्या ठिकाणी आईची झोप लागल्यानंतर छोटा समीर एकटाच खेळत होता. तो खेळत असलेली वस्तू पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीत पडली. ती वस्तू काढण्यासाठी चिमुकला समीर वाकला आणि तो बादलीत पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्यानं तो गुदमरला गेला. घरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. समीरला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिनाभरात पालकांच्या हलगर्जीपणामुळे चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. भोसरी 'एमआयडीसी'तील शर्मा प्रेसिंग कंपनीमध्ये 25 नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास निरूता ओढ या चार वर्षांच्या मुलीचा कंपनीच्या प्रवेशद्वारात अडकून मृत्यू झाला.

चिंचवडच्या दळवीनगर येथील उज्वल सोसायटीत 27 नोव्हेंबरला निधी कटारे ही नऊ महिन्यांची मुलगी इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून मृत्युमुखी पडली. तर 28 नोव्हेंबरला मोशी येथे पाण्यात पडून तुषार माळी या दोन वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाला.

पालकांच्या हलगर्जीपणामुळे शहरात महिनाभरात चार मुलांचा मृत्यू झाला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या लहान मुलांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

माजी महापौरांच्या वार्डातील इकोमॅन यंत्रच गायब !

माजी महापौरांच्या वार्डातील इकोमॅन यंत्रच गायब !
पिंपरी, 17 डिसेंबर
माजी महापौर योगेश बहल आणि तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी शिफारस केलेली फूड वेस्टपासून खतनिर्मिती करणा-या 'इकोमॅन' लघुसंयत्रांचा घोटाळा समोर आला आहे. योगेश बहल यांच्या प्रभागात बसविलेले हे यंत्र गायब झाले असून माजी महापौर मंगला कदम यांच्या प्रभागात बसविलेले यंत्र अक्षरश: धूळ खात पडले आहे. ही दोन लघुसंयत्रे महापालिकेने 20 लाख रुपयात खरेदी केली होती. या यंत्रावर करण्यात आलेला खर्च संबधितांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी याबाबतची कागदपत्रे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांना सादर केली. याबाबत पत्रकारांना माहिती देताना सीमा सावळे म्हणाल्या की, शहरातील कचरा विघटनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी महापालिकेने गृहप्रकल्पांना प्रायोगिक तत्वावर ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत निर्मितीसाठी दोन 'इकोमॅन' लघुसंयंत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी तत्कालीन महापौर योगेश बहल आणि सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी लेखी शिफारस केली. आपल्या बंगल्यामध्ये याच स्वरुपाची लघुसंयत्रे असून ती कार्यक्षम आणि प्रभावी आहेत, असे लेखी पत्रही या दोघांनी कंत्राटराला दिले. बहल - अय्यर यांच्या लेखी पत्राचा आधार घेत महापालिकेने 30 कुटुंब संख्येकरिता 30 किलो विघटन क्षमतेचे 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे आणि 50 कुटुंबांसाठी 50 किलो क्षमतेचे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे दोन 'इकोमॅन' खरेदी केले.
महापालिकेने स्वखर्चाने खरेदी केलेल्या दोन 'इकोमॅन' यंत्रांपैकी एक यंत्र माजी महापौर योगेश बहल यांच्या प्रभागातील सुखवाणी कॅम्पसमधील वॉटरलीली कॉ-ऑपरेटीव्ह सोसायटीत (वल्लभनगर) आणि दुसरे यंत्र माजी महापौर मंगला कदम यांच्या प्रभागातील साईमंगल सहकारी गृहरचना संस्थेत (संभाजीनगर) बसविण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावरील या 'इकोमॅन'च्या उपयुक्ततेची माहिती सीमा सावळे यांनी आरोग्य विभागाकडे मागितली. मात्र, याविषयाची फाईलच सापडत नसल्याने आरोग्य विभागाने उत्तर देण्याकामी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी घेतला. या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर ती फाईल सीमा सावळे यांना देण्यात आली. संभाजीनगरमध्ये बसवलेले 'इकोमॅन' बसविल्यापासूनच बंद अवस्थेत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तर वल्लभनगरमधील 'इकोमॅन' जागेवरच नसल्याचे आढळून आले. याबाबत रहिवाशांकडे विचारणा केली असता, याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे या रहिवाशांनी सांगितले.
अखेरीस, 20 लाख रुपयांच्या इकोमॅनबाबत सीमा सावळे यांनी आरोग्य विभागाला जाब विचारला. आरोग्य विभागाची जबाबदारी केवळ यंत्र खरेदी करण्यापुरती मर्यादित आहे. यापुढील नियंत्रण आणि कामकाज पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे असल्याचे सांगण्यात आले. तथापि, पर्यावरण अभियांत्रिकी कक्षाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी याबाबत कानावर हात ठेवले.
आरोग्य विभागाने याबाबतची कोणतीच माहिती आपणास दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला. 12 लाखांचे यंत्र गायब असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणूनही दोन्ही विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सहआयुक्त अमृत सावंत यांच्याकडेही तक्रार करुनही त्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

माजी महापौर योगेश बहल यांच्या शिफारसीनुसार 'इकोमॅन' खरेदी करण्यात आले. कोणतेच निकष निश्चित न करता त्यांच्या आणि मंगला कदम यांच्या प्रभागात ते बसविण्यात आले. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तत्काळ ही यंत्रे खरेदी करण्यात आली. अवघ्या दोनच दिवसात कंत्राटदाराला 20 लाख 39 हजार 700 रुपयांचे बिल महापालिकेच्या 'कर्तव्यदक्ष' अधिका-यांनी अदा केले. मात्र, यानंतरची कार्यवाही करण्याकामी महापालिकेचे सर्वच अधिकारी कुचकामी ठरले. संबधित अधिका-यांना निलंबित करावे, त्यांच्याकडून पैशांची वसूली करावी. तसेच, वल्लभनगर येथील यंत्र चोरीप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सीमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

भारत केसरी विजय गावडे याचा देहुकराच्या वतीने सत्कार

भारत केसरी विजय गावडे याचा देहुकराच्या वतीने सत्कार
देहुगाव, 17 डिसेंबर
यशाची पायरी चढत असताना आपल्या मातीचा सुगंध दरवळत ठेवण्याचे कार्य याच मातीत खेळणा-या मल्लांनी केले असल्याचा आनंद होत असल्याची भावना बापुसाहेब भेगडे यांनी व्यक्त केली. देहूगाव येथे भारतकेसरी विजय गावडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पिंपरी चिंचवडमहानगर पालिकेचे नगरसेवक शांताराम भालेकर, बाळासाहेब तरस, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूगावचे सरपंच कांतीलाल काळोखे, उपसरपंच आनंदा काळोखे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, प्रसिध्द मल्ल दिलीप पिंजण, साहेबराव काशिद, संजय पिंजण, ज्ञानोबा काळोखे, संतोष माचुत्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश हगवणे, रत्नमाला करंडे, सुनीता टिळेकर, अशोक मोरे, अभिमन्यू काळोखे व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भेगडे म्हणाले, भारतीय मल्लांना देशांतर्गत स्पर्धेत समाधानी न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरावे. भविष्यात गावडे यांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन विययी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत सातकर म्हणाले की, सध्याचे मल्ल पदवीधर असल्याने आनंद वाटतो. मल्ल म्हणजे अडाणी असा लोकांचा गैरसमज आहे. हे विजय गावडे यांनी सिध्द केले आहे याचा विशेष आनंद असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी देहूगाव तालमीतील मल्ल दिलीप पिंजण यांनी विजय गावडे यांना रोख 51 हजार रुपये दिले. देहूगाव तालमीचे वस्ताद तानाजी काळोखे यांनी रोख 5 हजार रुपये देऊन सन्मान केला. अभिमन्यू काळोखे, अशोक मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक तानाजी काळोखे यांनी केले. तर प्रकाश हगवणे यांनी आभार व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

सराईत गुन्हेगाराचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

सराईत गुन्हेगाराचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी, 17 डिसेंबर

घरफोडी आणि अन्य गुन्ह्यात पिंपरी पोलिसांनी पकडलेल्या एक सराईत गुन्हेगाराने पोलीस कोठडीच्या लोखंडी दरवाजाच्या गजावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. बिलाल खान (वय 45, रा. चिखली मूळ रा. उत्तरप्रदेश) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बिलाल खान याच्यावर घरफोडीचे महिलांना गुंगीचे औषध पाजून लुबाडण्याचे असे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला पिंपरी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक करून पिंपरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिसांना शिवीगाळ करीत त्याने कोठडीच्या लोखंडी दरवाजाच्या गजावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो जखमी झाला. उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
mypimprichinchwad.com