
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 May 2020
Good News : पिंपरी-चिंचवडकरांची पाणीटंचाईपासून सुटका होणार; जुलैअखेर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक!
पिंपरी-चिंचवडकरांना यंदा पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहरवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा आहे. आजमितिला धरणात 44.53 टक्के पाणी असून 31 जुलैपर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. त्यामुळे मे महिन्यात देखील नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे.
डी. वाय. पाटील रुग्णालयात लॅब सुरु होण्यासही विलंब
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करोना लॅब सुरु करण्याची तयारी केली आहे. परंतू, तेथेही आवश्यक उपकरणे प्राप्त होत नसल्याने अजून ८ दिवसांचा विलंब लागणार असल्याची माहिती डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाचे डॉ. राहुल पेड्डेवाड यांनी दिली. याठिकाणी करोना लॅब तयार झाल्यास एका दिवसाला ५०० करोना चाचण्या करता येणार आहेत.
आकुर्डी-प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौक परिसरातील रस्त्यांचे रात्रीचे सौंदर्य
पिंपरी - आकुर्डी-प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौक व तेथील चारही बाजूला जाणाऱ्या रस्त्यांचे हे रात्रीचे सौंदर्य पाहण्याची मजा काही औरच आहे. हे सौंदर्य पहा फोटोंच्या माध्यमातून...(संतोष हांडे - सकाळ छायाचित्रसेवा)b
दरमहा पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो रुपये
पिंपरी – शहरातील सोसायट्या सध्या पाणीटंचाईने हैराण झाल्या आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नसताना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठीही सोसायटीधारकांना टॅंकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी दरमहा लाखो रुपये सोसायटीतील रहिवासी मोजत आहे. महापालिका आमची पाणी समस्या कधी सोडवणार, असा सवाल सोसायटीतील नागरिक विचारत आहेत.
‘औंध रुग्णालयात’ नागरिकांची गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
पिंपळे गुरव – औंध जिल्हा रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याच ठिकाणी शहरातील परराज्य व जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक केल्याने नागरिकांची येथे गर्दी उसळली आहे. त्यामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पाळलेल्या नागरिकांवर या गर्दीमुळे अन्याय तर होणार नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’बाधितांचे दीड शतक पूर्ण
पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज बाधितांच्या आकड्यामध्ये सातने भर पडली आहे. त्यामुळे बाधितांच्या आकड्याने दीड शतक ओलांडत 151 चा आकडा गाठला आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सहा जणांचा तर पुण्यातील एकाचा समावेश आहे. या सर्वांना बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आल्यामुळे करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत करोनातून 62 जणांची मुक्तता झाली आहे.
मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची शक्यता
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला आषाढी वारी सोहळा यावर्षी रंगणार का? हा प्रश्न संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि मराठी जनांना पडला आहे. मात्र या परंपरेत कुठलाही खंड पडू न देता सुवर्णमध्य काढून श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच किंवा दहा ते बारा वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची शक्यता आहे.
संतापजनक : पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना 'असा' दाखवला जातोय घरचा रस्ता
पुणे : लॉकडाउन काळात कामगार कपात करू नये, असे केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांमुळे कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवता येत नसल्याने आयटी कंपन्यांनी छुपा मार्ग काढला आहे. कर्मचाऱ्यांना बेंच रिसोर्से करून त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
दरमहा पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो रुपये
पिंपरी – शहरातील सोसायट्या सध्या पाणीटंचाईने हैराण झाल्या आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नसताना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठीही सोसायटीधारकांना टॅंकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी दरमहा लाखो रुपये सोसायटीतील रहिवासी मोजत आहे. महापालिका आमची पाणी समस्या कधी सोडवणार, असा सवाल सोसायटीतील नागरिक विचारत आहेत.
परवानगीच्या नावाखाली पालिकेकडून करवसूली
पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – सरकारला महसूल मिळावा, यासाठी विशेष विचार न करता शहरातील दारुची दुकाने सुरु करण्यात आली. परंतु इतर दुकाने सुरु करण्यासाठी मात्र विशेष तयारी केली जात आहे. विक्रेते आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहेत. या परवानगीच्या नावाखाली या बिकट परिस्थितीतही पिंपरी-चिंचवड महापालिका करवसुली करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)