MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 23 April 2020
कोरोना साथीच्या लढाईत "वायसीएम'कडून यशस्वी मुकाबला
पिंपरी - "पांढरा हत्ती' अशी टीका होणारे महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अर्थात "वायसीएम' सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी जीवनसाथी ठरले आहे. कारण, कोणतीही लस उपलब्ध नसताना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन मिळत आहे. आतापर्यंत चौदा दिवस उपचार घेऊन तब्बल 18 जण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.
फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!
पिंपरी - कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरातील स्वत:ची आठ रुग्णालये व २८ दवाखाने (क्लिनिक) सज्ज ठेवली आहेत. फ्लूची लक्षणे दिसताच नागरिकांनी या क्लिनिक व रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांसाठी ‘व्हॉटस्अप चॅटबॉट’ची सुविधा सुरू
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेमार्फत Whatsapp मोबाईल क्रमांकाद्वारे Chatbot ची सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याद्वारे Covid-19 बाबत नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन होणार आहे. कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी, Covid-19 चाचणी केव्हा करावी? अशा प्रकारची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आज गुरुवार दि. २३.०४.२०२० रोजी Covid-19 संदर्भातील अद्ययावत माहितीकरिता ‘Whatsapp द्वारे Chatbot’ ची सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे.
‘या’ माहितीसाठी आरोग्य सेतू अॅपचा वापर करा; महापालिकेचे आवाहन
एमपीसी न्यूज – भारत सरकारने कोविड-19 ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अॅन्ड्रॉईड व आओएस प्रणाली धारक भ्रमणध्वनी धारकांसाठी बहूभाषिक (एकूण 11 भाषांमध्ये उपलब्ध) आरोग्य सेतू अॅप विकसीत केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या अॅपचा वापरा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. या अॅपची वैशिष्टये! : # हे अॅप ब्ल्युटुथ टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. […]
नगरसेविका सुजाता पालांडे निवारा केंद्रातील लोकांना करणार समुपदेशन
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे त्यांच्या संस्थेमार्फत निवारा केंद्रातील लोकांसाठी समुपदेशन करणार आहेत. यासाठी पालिकेची परवानगी घेण्यासाठी त्यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे अर्ज केला आहे.
शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यावर 500 रुपये दंडाची होणार कारवाई; आयुक्तांचा आदेश
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 500 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही […]
डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
एमपीसी न्यूज : डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले तर संबंधित हल्लेखोरांकडून दुप्पट पैसा वसूल केला जाईल. त्याचबरोबर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यावरील हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली . देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार लवकरच कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढणार असल्याचेही त्यांनी […]
विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना निवाला
पिंपरी : महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या 14 स्वयंसेवी संस्था आणि अन्य 10 ते 15 संस्था मिळून 30 संस्थांच्या माध्यमातून शहरातील सुमारे 60 हजार गरजूंच्या पोटाला अन्न मिळत आहे.
रखरखत्या उन्हात फुलांची मोहिनी
पिंपरी - रखरखत्या उन्हात रस्त्याच्याकडेला बहरलेली फुले मन मोहून टाकत आहे. शहरात ठिकठिकाणी बहावा, गुलमोहर, नीलमोहर, बोगनवेल, पळस, गोल्डनशॉवर, जारूल या झाडांची बहरलेली फुले लक्ष्यवेधी ठरत आहेत
औषधांच्या दुकानांबाबत महत्वाचा निर्णय
शहरातील घाऊक आणि किरकोळ आैषधे विक्रेत्यांनी २७ एप्रिलपर्यंत दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अत्यावश्यक आैषधांची घरपोच सेवा पूर्वी प्रमाणेच चालू राहणार आहे.
कामावर गैरहजर राहणारे सात पोलीस निलंबन
पिंपरी – करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना बंदोबस्त करताना मनुष्य बळाची अडचण येत आहे. त्यातच काही पोलीस गैरहजर आहेत. त्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. तरीदेखील काहीजण जाणीवपूर्वक हजर होत नसल्याने त्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (दि. २१) आदेश दिले आहेत.
वाकड वसाहतीमधील पोलिसाला करोनाची बाधा
पिंपरी – करोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कर्तव्यावर नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पुण्यातील दोन पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एकजण कावेरीनगर (वाकड) पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे.
Subscribe to:
Posts (Atom)