Saturday, 23 June 2018

Use discarded waste for tarring of roads: Maharashtra govt

To reuse the discarded plastic that will pile up once the plastic ban comes into effect on Saturday, Maharashtra government has decided to make the use of such plastic mandatory for tarring of roads.

शहर ‘पार्किंग पॉलिसी’ अखेर मंजूर

पिंपरी-चिंचवड वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी आणि वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे पालिकेच्या धर्तीवर ‘पार्किंग पॉलिसी’ तयार केली आहे. त्यामुळे शहरातील काही भागात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वाहन लावताना सर्वच वाहनांना शुल्क द्यावे लागणार आहे. त्यास  सर्वसाधारण सभेने राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नोंदवून 25 टक्के सलवतीच्या उपसूचनेसह मान्यता दिली. 

दळवीनगर येथील स्थलांतरित शाळेची इमारत सुसज्ज; पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये – सभागृह नेत्याचे आवाहन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या शाळेची इमारत अतिशय देखणी असून शाळेमध्ये सर्व अत्याधुनिक असून सुसज्ज आहे. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टाहास न धरता दळवीनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांच्या सूचनांचा विचार केला जाईल. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये असे कळकळीचे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

बोपखेलसाठी पालिका संरक्षण विभागाला २५ कोटी देणार

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्या जागेची किंमत म्हणून पालिका संरक्षण विभागाला २५ कोटी रुपये देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची तहकूब सभा आज शुक्रवारी आयोजित केली आहे. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

दुकानांत शिरले पाणी

पिंपरी - रस्त्याची असमान उंची, बुजलेले पावसाळी गटारांचे आउटलेट, पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे न केलेली या गटारांची स्वच्छता आदी कारणांनी गुरुवारी (ता. २१) झालेल्या पावसामुळे चिंचवडगावातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

भूसंपादन सक्तीचे न ठेवल्याने अडचणी

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी सहा गावांतील सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन होणार आहे. परंतु, अजून सरकारने अंतिम दरनिश्‍चिती मंजूर केलेली नाही. तसा आदेश ‘एमआयडीसी’ला आलेला नाही. सक्तीने जमीन संपादन होणार नाही. पन्नास हेक्‍टर जमीन एका गावात संपादन झाली, तरच त्या गावात संपादन होणार आहे. 

कुचकामी प्रशासन; नागरिकांचे हाल

पिंपरी - नागरिकांना कराच्या बदल्यात चांगल्या सेवा वेळेत देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, कुचकामी प्रशासनामुळे योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याचाच प्रत्यय गुरुवारी झालेल्या पावसामुळे आला. महापालिकेच्या विकासकामांचा बुरखा यामुळे फाटला आहे.

अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी केलेली दुरूस्ती रद्द करावी

पिंपरी – महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाकरीता जुन्या शासकीय अध्यादेशात सुधारणा केली आहे. त्यानुसार, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यास दमदाटी केल्यास तो अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग करुन सर्वसामान्यांची आणि कार्यकर्त्यांची गळचेपी होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची माहणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दळवीनगर येथील स्थलांतरित शाळेची इमारत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी उपलब्ध ; पक्षनेते एकनाथ पवार आणि पत्रकारांनी दिली शाळेला भेट !

निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील  महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या शाळेची ईमारत अतिशय देखणी असून शाळेमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टाहास न धरता दळवीनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांच्या सूचनांचा विचार केला जाईल. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये असे कळकळीचे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

पिंपरी पालिका सभागृहात राष्ट्रवादीचा ‘आवाज’ घुमलाच नाही…

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी स्वत:चा खाजगी स्पिकर आणला होता. मात्र महापौर नितीन काळजे यांनी हा स्पिकर सभागृहात ठेवण्यास विरोध दर्शविला. साने यांनी सुरूवातीला नकार दिला. मात्र महापौरांनी विनंती वजाआदेश दिल्याने स्पिकर बाहेर काढण्यात आला. त्यामुळे पालिका सभागृहात राष्ट्रवादीचा ‘आवाज’ घुमलाच नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती; या ९ सदस्यांची झाली निवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांची आज झालेल्या सर्वसाधारणसभेत नियुक्ती करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

सल्लागारांवर उधळपट्टी करणा-या भाजपला वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूंचे वावडे का? – अमित बच्छाव

पिंपरी (Pclive7.com):- आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल – रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आव आणणा-या भाजपने राष्ट्रवादीला बदनाम केले परंतू त्या आरोपात काहीच तथ्य आढळले नाही, त्याउलट भाजपने मात्र गत वर्षी वारक-यांना वाटप केलेल्या ताडपत्री खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. भयमुक्त भ्रष्टाचार मुक्तीच्या वल्गना करीत सत्तेत आलेल्या भाजपचा मात्र ‘भ्रष्टाचार’ हाच अजेंडा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या वर्षी वारक-यांना कोणतीही भेटवस्तू न देणे म्हणजेच भाजपला पुन्हा एकदा भ्रष्टाचार होण्याची पक्की खात्री असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे.

पावसाचे पाणी तुंबल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहराला काल पावसाने चांगलेच झोडपले. शहरातील विविध भागात घरात पाणी शिरल्याच्या, रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याच्या घटना घडल्या. चिंचवड येथील ग्रेडसेप्रेटर मध्ये पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप मिळाले होते. ग्रेडसेपरेटरमधील गटारी तुंबल्याने पाऊस पडून १२ तास उलटले तरी देखील हा तलाव आटण्याचे नाव घेत नाही. महापालिकेचे कर्मचारी पाणी काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मोठ्या कसरतीने कर्मचा-यांनी साचलेले पाणी काढले आहे. पाणी काढले असले तरी कचरा मात्र अजूनही तसाच पडलेला आहे.

घरात-दुकानात शिरले पाणी

सांगवी – काही दिवसांपूर्वीच आलेल्या काही मिनिटांच्या पावसाने सांगवी आणि पिंपळे गुरव परिसराची अवस्था बिकट केली होती. यावेळी पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व कारवाईच्या नावाखाली काहीही केलेले नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी पालिका आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतरही पालिका प्रशासनाकडे बराच कालावधी होता, परंतु पालिका प्रशासनाने काहीही केले नाही आणि गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने पालिकेचे पितळ उघडे पाडले. कित्येक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते.


“त्या’ अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा

पिंपरी – महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवक कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर जयस्वाल यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. अनुकूल गोपनीय अहवाल लिहिण्याकरिता एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याला त्रास देण्याची बाब उघडकीस आली होती. याशिवाय या पूर्वी देखील एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला त्रास देण्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती.