MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 22 September 2017
PCMC to raze encroachments after Dasara
Pimpri Chinchwad: The civic body will conduct a massive drive to clear handcarts and other encroachments on footpaths and roads after Dasara.
PCMC invites citizens' views for theme park
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited citizens' views for the theme park to be developed on a 58-acre plot in the ...
नियंत्रण कक्षाची विभागणी
याचबरोबर उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे आणि परिमंडळ तीनचे (पिंपरी-चिंचवड) उपायुक्त गणेश शिंदे यांचे कार्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता असून, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कंट्रोल रूम सुरू होत आहे.
निगडी-दापोडी बीआरटीचा मुहूर्त लांबणीवर
पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बससेवा सुरु करण्यापूर्वी त्या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आयआयटीने केलेल्या सर्व्हेक्षणातून यासंदर्भात काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्या सुचनांची अंमलबजावणी व काही किरकोळ कामे पुर्ण करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ लागेल. त्यानंतर आयआयटी, मुंबई यांना अहवाल सादर करुन बीआरटीएस मार्ग सुरु होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कचराकुंड्या ओसंडून वाहताहेत, नुसते हातात झाडू घेऊन काय मिरवताय...?
नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु अशा वेळी लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाला धारेवर धरण्याऐवजी तेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिरवण्यात मशगुल झाले आहेत," अशी टीका पिंपळे गुरवचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून कचराकुंड्यामधील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल जगताप यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला.
कचऱ्यापासून इंधन निमिर्तीचे दोन प्रकल्प रखडले!
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट : प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सुरू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील कचरा डेपो परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्यास सुरूवात केली. परंतु, त्या ठिकाणी एकच प्रकल्प सुरू असून, दोन प्रकल्प अद्यापही रखडले आहेत. याबाबत अधिक माहिती देण्यास पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.
लोहमार्ग विस्ताराचे काम मंदगतीने
पुणे ते लोणावळा उपनगरीय आणि मुंबईपर्यंतच्या रेल्वे वाहतुकीच्या विस्तारासह पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्ग विस्तारीकरणाच्या प्रकल्पासाठी ...
श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार
– 16 लाखांचे धनादेश “बाउन्स’
पिंपरी – “सीएनजी कीट’ बसविलेल्या ऑटो रिक्षा परवाना धारकांना महापालिकेने अनुदान वाटप केले होते. मात्र, रिक्षा चालकांचे 16 लाख रुपयांचे धनादेश “बाउन्स’ झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पर्यावरण अधिकाऱ्याने हात झटकले असून, लेखा विभागाने दिलेले धनादेश आम्ही वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
Externed woman criminal lands in Pimpri police net
He added that the duo confessed to three cases of house break-ins in Pimpri and Bhosarilast month during questioning. "We have detected two burglaries registered with Pimpriand one with Bhosari police. We have also recovered gold ornaments worth Rs ...
देशी गाईच्या दुधाला ‘भाव’
पुणे - देशी गाईचे दूध रोगप्रतिकारक असल्याचा प्रचार होत असल्यामुळे या गाईच्या दुधाला मागणी वाढत आहे. प्रत्यक्षात उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात देशी गाईंच्या दुधाच्या उत्पादनासाठी शंभराहून अधिक ‘फार्म्स’ उभे राहिले आहेत. या दुधाला प्रतिलिटर ५० ते ९० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी आणि काही व्यावसायिकही देशी गाईंच्या पालनाकडे वळू लागले आहेत.
"सोफोश'मधील चिमुकल्यांना "मातृदूध'
पुणे - जगात येऊन जेमतेम काही तासांमध्ये त्याला जन्मदात्यांनी सोडून दिले. सात दिवसांच्या "त्या' चिमुकल्याला "सोफोश' संस्थेमध्ये आणले गेले. दुधाची पावडर हाच त्याचा आतापर्यंतचा आहार होता. ससून रुग्णालयातील मातृदूग्ध पेढीमुळे "त्याला' आज प्रथमच मातेचे दूध मिळाले.
पिंपरीत जयघोष अंबेचा
पिंपरी - धूप, अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध.. जोडीला श्रीसूक्त पठण, कीर्तन, भजन.."उदे गं अंबे उदेचा जयघोष अशा मंगलमय व भक्तिमय वातावरणात शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. शहरातील विविध मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करत शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारपासून (ता. 21) प्रारंभ केला. चार दिवसांनंतर पावसाने उघडीप दिल्याने देवीभक्तांमध्ये घटस्थापनेचा उत्साह होता.
मल्टिप्लेक्स बेकायदा कराची फाईल निकालासाठी बंद
सहा मल्टिप्लेक्सची कोट्यवधींची बाकी, महसूलमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
पुणे – करमणूक कर माफ असताना शहरातील सहा बड्या मल्टिप्लेक्स मालकांनी 68 कोटी 65 लाख रुपयांचा बेकायदा कर प्रेक्षकांकडून आकारल्याची फाईल महसूल मंत्र्यांच्या कोर्टात निर्णयासाठी बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर येत्या काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. यावर महसूलमंत्री सरकारच्या बाजूने निकाल देतात की मल्टिप्लेक्स थिएटर मालकांच्या बाजुने उभे राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)