
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 25 December 2017
“बीआरटी’ अभ्यास दौऱ्याचा खर्च वसूल करा
पिंपरी – अहमदाबाद येथील बीआरटीएस अभ्यास दौऱ्यामुळे महापालिकेचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. हे नुकसान संबंधीत अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी करत बीआरटीएस अभ्यास दौऱ्याच्या अहवालाचे काय झाले, असा प्रश्न मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे.
Pune Police launch flagship education programme for skilling, educating Muslim youth
In a bid to spread to awareness about skill and vocational education, importance of competitive examinations among the Muslim youth, Pune City Police following the footsteps of their Mumbai counterpart launched the Muslim youth connect programme called ‘Mission Parvaaz’ in 15 police stations across Pune.

महापालिकेच्या मालमत्तेसाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात विविध ठिकाणी एकूण 750 मालमत्ता आहेत. त्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एकूण 1 हजार 181 सुरक्षा रक्षक, मदतनीस आणि वॉर्डन नेमले जाणार आहेत. याकरिता सुमारे 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
“त्या’ अधिकाऱ्यांना आयुक्तांची तंबी
लेखापरिक्षणास “रेकॉर्ड’ द्या, अन्यथा कारवाई ः 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पिंपरी – महापालिकेतील विविध विभागांचे आर्थिक वर्षानुसार लेखा परिक्षण करण्यात येत आहे. यामध्ये मागील कित्येक वर्षांतील “रेकॉर्ड’ उपलब्ध न झाल्याने त्यांचे लेखापरिक्षण रखडले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देत सर्व विभाग प्रमुखांना “रेकॉर्ड’ सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आली आहे. “रेकॉर्ड’ उपलब्ध न केल्यास दंडात्मक कार्यवाही येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका
पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स सफाईचे दैनंदिन कामे 68 स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कामे होत आहेत. मात्र, त्यांना डावलून केवळ दोनच कंपन्यांना या कामाचा ठेका देण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या निर्णयास स्थगिती देण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.20) दाखल करून घेतली.
जनाची नाही निदान महापालिकेची तरी…
पिंपरी-चिंचवड वर्तमान – अमोल शित्रे
आशिया खंडात नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला अधिकारीच आतून पोखरू लागले आहेत. प्रशासकीय सेवा बजावताना करदात्यांच्या पैशातून मिळणाऱ्या वेतनातून समाधान न मानता चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपासून ते प्रथम वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा छुप्या मार्गाने पैसे कमावण्याचा हव्यास सुटला आहे. 25 हजारापासून ते दीड लाख रुपयांहून अधिक मासिक वेतन उचलणारे अधिकारी देखील काळ्या मार्गाचा अवलंब करत आहेत. चार-दोन हजार रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी बिले अडवून धरणे, अनधिकृत घरांवर कारवाई न करणे, बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांना पाठिशी घालणे, अवैध नळ कनेक्शनवर कारवाईस टाळाटाळ करणे, एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीपासून ते आयुक्तांच्या टेबलावर फाईल सरकवत नेण्याच्या मार्गातील प्रत्येक टेबलावर चिरीमिरी घेतली जात आहे. अशा लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत आहे. आजपर्यंत अधिकारी, कर्मचारी अशा 21 जणांची महापालिकेची इभ्रत वेशीवर टांगली आहे.
“मिशन-2017′ अन् भाजप केंद्रीत वर्ष!
पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी “मिशन-2017′ चा नारा दिला होता. त्यात भाजप यशस्वी ठरले. भाजपसाठी हे वर्ष लाभदायी ठरले. 15 वर्षांनंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने राष्ट्रवादीच्या कायम स्मरणात राहणारे, तर शिवसेना, कॉंग्रेस व मनसेसाठी हे वर्ष “चिंतन’ करायला लावणारे ठरले. महापालिकेत प्रथमच झालेले सत्तांतर, कारभारी अन् बदललेला कारभार, आरोप-प्रत्यारोप यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्रासाठी एकूणच हे वर्ष “भाजप केंद्रीत’ राहिले.
पिंपरी बाजारात भेंडी, फ्लॉवरची आवक घसरली
पिंपरी – पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांची एकूण आवक घटली. कांद्याची दोन क्विंटल आवक घटून, भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक 19 क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. टोमॅटोची आवक पाच क्विंटलने घटली असून, भाव स्थिर राहिले.
Industrial traffic, road works choke Alandi
PUNE: Daily commute within the pilgrim town of Alandi, about 25km from here, has become a daunting task for the local residents as the internal roads are plagued by traffic snarls and heavy vehicles.


Coaching class owners protest draft law, say it is a bid to ‘stifle business’
A draft of the state government’s proposed law on coaching classes, which has several provisions that coaching classes owners are opposing vehemently, was leaked online.
Miffed by the provisions in the draft law to regularise coaching classes in the state, owners of tutorials plan to oppose the law which they term as “draconian and unfair”. The furore started after a draft of the state government’s proposed law on coaching classes, which has several provisions that coaching classes owners are opposing vehemently, was leaked online.
Subscribe to:
Posts (Atom)