राष्ट्रवादीकडून शाम लांडे, निकिता कदम यांनी भरले अर्ज
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले असल्यामुळे या दोघांची निवड निश्चित आहे. तर, राष्ट्रवादीकडून शाम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.