Saturday, 26 August 2017

देशात पिंपरी-चिंचवड प्रथम आणूया!

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचा संकल्प : मिशन स्वच्छ भारत अभियान
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 4 जानेवारी 2018 पासून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेला प्रारंभ होत आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेची महापालिकेने पुर्वतयारी करण्यासाठी आराखडा तयार केला असून, 1 सप्टेंबरपासून स्वच्छतेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

'स्वारगेट'सारखा न्याय 'निगडी'ला मिळणार का?

ट्रान्सपोर्ट हबचे महत्व मुख्यमंत्र्यांनी ओळखले म्हणूनच 5 वर्षांपूर्वी स्वारगेट येथील जेधे चौकाच्या मंजूर प्रकल्पाचे आता नव्याने नियोजन केले जाणार... निगडी येथेही ट्रान्सपोर्ट हबचीनितांत गरज आहे. भक्ती-शक्ती चौकात सध्या PCMC, PCNTDA, State Transport, PMPML, MahaMetro यांचे वेगवेगळे नियोजन चालले आहे यातून वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो जटिल होईल नाहक वेळ व पैसा वाया जाईल. भक्ती-शक्ती चौकाचा पुढील 30 वर्षांचा विचार करून सक्षम यंत्रणेला 'मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब'चा मास्टर प्लॅन बनवण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी द्यावा हि पिंपरी-चिंचवड शहरातील जाणकार नागरिकांची मागणी आहे. 

SSC HSC मार्कशीट आता डिजीलॉकर वर उपलब्ध

#DigiLocker touches a new milestone. Maharashtra State Education Board's 26 years digital marksheets & certificates (1990-2016) are now available on DigiLocker. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या SSC HSC मार्कशीट (1990-2016) आता डिजीलॉकर वर उपलब्ध

 

डिजिटल पोलीस, आता FIR व अन्य सेवा ऑनलाईन शक्य

डिजिटल पोलीस पोर्टलच्या साहाय्याने आता FIR, भाडेकरू, कामगार पडताळणी, सभा/मिरवणूका/आंदोलनाच्या परवानग्या, हरवले व सापडले, वाहन चोरीच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवणे आता शक्य आहे

PCMC corporators to talk to Fadnavis on people's problems

... Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) limits. The authority began sending notices to 2,000 affected houses and shops in Walhekarwadi, Chinchwadenagar, Akurdi and ...

एच. ए. च्या 59 एकर जागेबाबत मागविल्या हरकती

आयुक्‍तांचे आदेश : बहुउद्देशीय सार्वजनिक मैदानाचे आरक्षण टाकणार
पिंपरी – पिंपरी-वाघेरे येथील मे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच. ए.) लिमिटेड कंपनी ताब्यातील अतिरिक्‍त 59 एकर जमीन विक्रीस शासनाने परवानगी दिली. ती जमीन महापालिका खरेदी करुन त्यावर बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान विकसित करणार आहे. याकरिता पालिका नगररचना विभागाने त्या जमिनीवरील आरक्षण फेरबदलाची कार्यवाही सुरु केली असून, नागरिकांच्या हरकती व सूचना 8 सप्टेंबरपर्यंत मागविल्या आहेत.

वरुणाभिषेकात 'बाप्पा'चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक

शहरातील पिंपरीचिंचवडभोसरीनिगडी, प्राधिकरण, दापोडी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच गणपती मूर्ती विक्रीच्या ठिकाणीही लगबग दिसत होती.

क्रीडा धोरणाविषयी शनिवारी आकुर्डीत निषेध सभा

पिंपरी – राज्य सरकारने क्रीडा धोरणात बदल करुन 41 खेळांच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. याविरोधात या 41 खेळांच्या राज्य संघटनांनी राज्य सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. येत्या शनिवारी (दि. 26) या निर्णयाच्या निषेधार्थ खेळ वाचवा कृती समितीने आकुर्डीत निषेध सभा आयोजित केली आहे.

गणपतीसाठी जादा बस

तर, पिंपरी-चिंचवडसाठी भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी या मार्गवरही प्रतिप्रवासी दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. ही सेवा ३१ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान सायंकाळी सहा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ...