महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला रोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. ते महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. तो लगेच खर्च होत नसल्याने विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातो. उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने रोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला भाजपने पाठबळ दिले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 15 November 2017
वर्षभरात रेल्वे अपघातात 251 बळी
पिंपरी - पुणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वे अपघातात 251 जणांचे बळी गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली. दरम्यान, रेल्वे गाड्यांचे वेग वाढविण्यात आले असून नागरिकांनी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Work on two weirs across Pavana gains momentum
PIMPRI CHINCHWAD: The proposal for constructing two Kolhapuri-Type (KT) weirs on Pavana in Maval taluka is set to be revived after five years.
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has agreed to provide funds to the irrigation department for conducting a geological survey.
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has agreed to provide funds to the irrigation department for conducting a geological survey.
PCMC moots training for youths in agro courses
PUNE: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed vocational training in 19 courses to people from SC, ST categories, and Vimukta Jati Nomadic Tribes.
Maharashtra wants policy to help differently-abled students: SPPU plans to lead initiative
As a first step, the SPPU authorities organised a special study meeting on Tuesday, which was arranged by the Students’ Welfare Commission of the SPPU and the National Service Scheme (NSS), on the request of the Maharashtra Disability Welfare Commissionerate.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या 19 तज्ज्ञ डॉक्टरांना ‘डोस’
आयुक्तांनी दिला दणका; सुधारीत वेतनश्रेणीचा आदेश रद्द
– डॉक्टरांच्या वेतनातून रक्कम वसुलीचे आदेश
– डॉक्टरांच्या वेतनातून रक्कम वसुलीचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 19 विशेष तज्ज्ञ वर्ग-1 डॉक्टरांना सुधारीत वेतनश्रेणी लागू केली. त्यामुळे आयुक्तांच्या बरोबरीने त्यांची वेतनश्रेणी लागू झाली. मात्र, वैद्यकीय शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख अभिमानाची पदे पालिका आस्थापनेवर अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सदरील आदेश रद्द करुन त्या आदेशाने दिलेली सुधारित वेतनश्रेणीनूसार रक्कम संबंधित डॉक्टरांच्या वेतन, सेवानिवृत्त वेतनातून वसूल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. यामुळे पालिका वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे.
काळेवाडी ते आळंदी बीआरटीसाठी हालचाली सुरु
पिंपरी – शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा रखडलेला चौथा प्रमुख बीआरटीएस मार्ग सुरू करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे. तत्पूर्वी मार्गावर बीआरटी बस थांब्यांचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. बस थांब्यांची उर्ववित कामे करण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च पालिकेकडून करण्यात येणार आहे.
मुळा नदीवरील नियोजित पुलामुळे बोपखेलकरांची सोय
पिंपरी - मुळा नदीपात्रावर बोपखेल-खडकीला जोडणारा पूल उभारल्यास सुमारे 12 ते 15 हजार बोपखेलवासीयांची सोय होणार आहे. त्यांना पुण्याला जाण्यासाठी सुमारे 18 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार नाही. संबंधित पुलासाठी आवश्यक जागेचा ताबा आणि संरक्षण मंत्रालयाकडे महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील दोन वर्षात प्रत्यक्ष पुलाची उभारणी होऊ शकेल.
“सल्लागार नेमणूक’ पद्धती कुणासाठी?
पिंपरी – महापालिकेतर्फे विकास कामांमध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. अलिकडच्या काळात बहुतेक विकास कामांमध्ये सल्लागार नेमण्याची पद्धत निर्माण झाली आहे. सल्लागाराकडून कामे न होणे व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरुन या सल्लागार संस्थांनी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासनाकडे प्रत्येक विभागातील सक्षम व तज्ज्ञ अधिकारी असताना अशा प्रकारे सल्लागार नेमणूक कशासाठी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी उपस्थित केला आहे.
“वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – जागतिक मधुमेह दिनानिमित्त सुप्रिम क्लिनिक आकुर्डी आणि रोटरी क्लब ऑफ निगडी वतीने वॉकेथॉन 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनमध्ये 800 नागरिकांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नेमबाजी स्पर्धेत कस्तुरी गोरेचे यश
पिंपरी – राज्यस्तरीय नेमबाजीत स्पर्धेत कस्तुरी गोरे हिने उत्कृष्ट खेळ दाखवत यश मिळवल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी अंकिता बोडकेची निवड
पुणे – निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची खेळाडू अंकिता बोडके हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून ती मध्यप्रदेश येथील देवास या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नुकतीच रवाना झाली आहे. जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या मुलींच्या राज्यस्तरीय 17 वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये अंकिता बोडके हिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिची मध्यप्रदेशमधील देवासमध्ये होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अंकिता ही ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असून तिला भगवान सोनवणे व स्वाती ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी विद्यालयाचे केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे, प्रार्चाया प्रज्ञा पाटील, केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर यांनी अंकिताला शुभेच्छा दिल्या.
समन्वय कुटुंब सल्ला केंद्राचे उद्घाटन
आकुर्डी – पोलीस मित्र संघ पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्या वतीने समन्वय कुटुंब सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्यातलं हे 'गार्डन' बनतेय 'ओपन बार'...!
नवी सांगवी : पिंपळे सौदागर येथील स्वराज चौक ते कोकणे चौकापर्यंत अडीच किमीपर्यंत विकसित होत असलेले लिनियर गार्डनला सध्या तरी ओपन बारचे रूप आल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी हा प्रकल्प केवळ सौदागर पुरता मर्यादित न भविष्यात शहराचे भूषण ठरणार आहे. त्याकरीता युध्द पातळीवर येथे कामही सुरू असुन एवढ्या चारपाच महिण्यात तो पुर्णत्वालाही लागणार आहे.
ग्राहक हितरक्षण
झगमगाटी जाहिरातींना भुलून आपण अनेक वस्तू खरेदी करतो; परंतु त्यातील अनेक वस्तू गुणात्मकदृष्ट्या जाहिरातीतील वर्णनानुसार असत नाहीत. परिणामी, ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते. ऑनलाइन खरेदी व्यवहार वाढल्यामुळे व्यवसायांचे स्वरूपच बदलून गेले आहे आणि त्यामुळे फसवणुकीचे स्वरूपही बदलले आहे. हे बदल जेवढ्या वेगाने घडत आहेत, तेवढा वेग ग्राहकांच्या हितरक्षणासाठी योजल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर, सरकारने ग्राहकहिताच्या रक्षणासाठी नव्या कडक कायद्याचा तयार केलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे.
‘घर बचाव’ला फुटीचे ग्रहण
पिंपरी – रिंग रोडसाठी हलचाली सुरु होताच हजारो नागरीक घर वाचविण्यासाठी एकत्र आले आणि त्यातून एक व्यापक आंदोलन उभे राहिले. गेली दीडशे दिवस हे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे. कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसतानाही बाधितांनी खूप संयम आणि सहनशक्ती दाखवली. दिंडी, चिंतन मोर्चा, मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदारांना राखी बांधून साकडे, कोपरासभा, बैठका धरणे अशी कित्येक आंदोलने करुन बाधितांनी संपूर्ण शहराचे लक्ष आपल्याकडे वेधले. परंतु आता याच आंदोलनाला फुटीचे ग्रहण लागले आहे. घर बचाव संघर्ष समिती विरुद्ध स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ असा कलगीतुरा सध्या रिंग रोड बाधितांना अनुभवयास मिळत आहे.
…अन् शहरवासियांनी अनुभवले पक्षी विश्व
पिंपरी – नागरीकांनी पक्षांचे विश्व अनुभवावे, दर वर्षी पक्षी निरीक्षकांच्या संख्येत वाढ होऊन, निसर्ग संवर्धनाची चळवळ आणखी व्यापक व्हावी या हेतूने पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावर्षी जवळपास तीस प्रकारचे पक्षी निरीक्षकांना पाहावयास मिळाले. खासकरुन पिवळा धोबीचेही नागरीकांना दर्शन घडले.
शहरात गतीरोधकांच्या नियमांना हरताळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात जागो-जागी रोडवर, आपल्या घरा-दुकानासमोर गतिरोधक टाकले जात आहेत. त्या बनविलेल्या गतिरोधकांमुळे अनेकांना पाठीदुखी, मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. अनेक लोकांना गतिरोधकाचे दुष्परिणाम माहीत नसल्याने ते आपल्या घराच्या आजूबाजूला गतिरोधकांची मागणी करतात. मात्र, लोकांना जागृत करण्यासाठी महापालिकेने गतीरोधकाच्या दुष्परिणामावर नागरिकांत जनजागृती करावी, नियमांना हरताळ फासणारे गतिरोधक काढण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून होवू लागली आहे.
मतदारांची नेमकी आकडेवारी समजणार
अचूक मतदारयादीसाठी बीएलओंकडून घरोघरी पडताळणी
पुणे – मतदार यादीमध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, दुबार, मयत आणि स्थलांतरीत यांची नावे मतदारयादीतून वगळून अधिक अचूक मतदार यादी तयार व्हावी ; यासाठी निवडणुक आयोगाने विशेष मोहिम आखली आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करणार आहेत. ही मोहिम येत्या गुरुवारपासून (दि.15) सुरू होणार आहे. या मोहिमेमुळे मतदारांची फुगलेली आकडेवारी कमी होण्यास तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)