Monday, 9 December 2013

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या चार आमदारांचे राजीनामे

अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात दिले राजीनामे नागपूर : पिपंरी चिचंवड, वडगाव शेरी, भोसरी येथील राहती घर नियमित करावीत, या निर्णयसाठी राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे, अण्णा बनसोडे आणि अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप, विलास लांडे यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 
दरम्यान, विरोधकांनी उद्या नागपुर विधानभवनावर आयोजित केलेल्या मोर्चाची हवा काढण्यासाठी एक दिवस अगोदरच राजिनामा दिल्याची चर्चा शहरात पसरली आहे. तर हा स्टंट असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. 

महापालिका विद्यार्थ्यांसाठीचे 184 पैकी 90 संगणक बंद

महापालिकेच्या विद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठीचे 184 पैकी 90 संगणक बंद असल्याचे मनसेने मागितलेल्या माहिती अधिकारामधील माहितीतून समोर आले आहे. संगणक दुरुस्तीकडे महापालिकेच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे बहुसंख्य विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे मनसेने म्हटले आहे.  

PCMC schools to have semi-English classes from 2014

PIMPRI: The School Board of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has reached the conclusion that since parents are choosing English medium schools for their pupils, it is leading to a significant decline in the number of students studying in municipal schools over the past few years.

Even after 10 yrs, PCMC still waiting for second garbage depot

PIMPRI: Even after 10 years of demanding 22.08 hectares land from the Forest Department for a garbage depot, the proposal of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) remains only on paper.

Tanishka library to acquaint women with laws

PIMPRI: Tanishka Women’s Dignity Forum group of Akurdi-Vitthalwadi has opened a free library of books pertaining to law for its members.

अवैध बांधकामांवरील कारवाईविरोधात मोर्चेकरी नागपूरकडे रवाना

पिंपरी चिंचवड शहरातून नागपूर विधानभवनावर उद्या (दि.10) काढण्यात येणा-या मोर्चासाठी शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीसह शेकडो नागरीक आज नागपूरच्या दिशेने रवाना झाले. रेल्वे, बस, स्वत:ची चारचाकी वाहनांमधून नागरिकांनी नागपूरकडे कूच केली.

आकुर्डीतील प्राथमिक शाळेचे आरक्षण बदलण्याची 'शाळा'!

अवैध बांधकाम वाचविण्यासाठी खटाटोप
आकुर्डीतील येथील सर्व्हे क्रमांक 35/3/1 मध्ये शाळेसाठी आरक्षित असलेला सुमारे सव्वा एकराचा भूखंड निवासी भागामध्ये समाविष्ट करण्याची 'शाळा' करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या शिफारशीनंतर स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला

ट्रॅफिक वार्डनची होतेय पिळवणूक

वाकड : वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून शहरात सुमारे ७ वर्षांपूर्वी वार्डन नेमण्यात आले. महापालिकेकडून वार्डन पुरविण्याचा ठेका घेतलेल्या सिक्युरीटी कंपन्याच वार्डनला कुठलीही कामगार सुविधा न देता कवडीमोल पगारात राब-राब राबवून गब्बर होत आहे. दुसरीकडे वाहतूक पोलीस आपले काम वॉर्डनवर ढकलून पिळवणूक करीत आहेत.

भाजप कार्यकर्त्यांचा शहरामध्ये जल्लोष

पिंपरी : राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात भारतीय जनता पक्षास मिळालेले यश आणि दिल्लीतील आमआदमीचे यश याबद्दल शहरातील विविध भागांत आनंदोत्सव करण्यात आला. पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

सुनावणीकाळात पाच कोटींचा भरणा

पिंपरी : मागील महिन्यात नोटीस पाठवून १४७0 व्यापार्‍यांना एलबीटी बाबतच्या सुनावणीस बोलावण्यात आले होते. या सुनावणीच्या कालावधीत एलबीटी भरणा रकमेत ४ कोटी ८६ लाखांची वाढ झाली आहे. ज्या व्यापार्‍यांनी अद्यापही प्रतिसाद दिला नाही, त्यांना आवाहन केले आहे. ३0 हजार व्यापार्‍यांना एलबीटी प्रमाणपत्र त्यांच्या दुकानात जाऊन वितरित केले जात आहेत. यापुढे कठोर कारवाईची भूमिका स्वीकारावी लागेल, असे एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने यांनी सांगितले.

भेदभावाची नको; सरसकट कारवाई करा

पिंपरी : भूसंपादन होईल, मोबदला दिल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन देणारे महापालिकेचे अधिकारी रहाटणीतील सर्व्हे क्रमांक ५९ मध्ये राहणार्‍या नागरिकांना अतिक्रमण कारवाईची भीती दाखवू लागले आहेत, अशी तक्रार नोंदवून १२ मीटर रस्त्यासाठी बाधितांवर सरसकट कारवाई करावी, विशिष्ट लोकांना टार्गेट करू नये, अशी विनवणी तेथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनास केली आहे.

'जिजामाता'तील एक्स-रे मशिन भोसरी येथे हलवणार

महापालिकेच्या जिजामाता रूग्णालयाचे नुतनीकरणाचे काम सुरू झाले असल्याने रूग्णालयातील अत्याधुनिक एक्स-रे मशिन भोसरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या स्थलांतरणासाठी तब्बल एक लाख रूपये खर्च होणार आहे.

सांस्कृतिक भवनाच्या नामकरणाचा राष्ट्रवादीचा डाव

मोहननगर येथे उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन असे नामकरण करण्याचा प्रस्ताव 2011 मध्येच मंजूर झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पाशवी सत्तेच्या बळावर वेगळे नामकरण करण्याचा डाव रचला जात आहे. मात्र राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला विरोध करून वेगळे नामकरण करण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन

रोड स्विपर मशिन देखभालीसाठी 'बीव्हीजी'ला मुदतवाढ

'जेएनएनयुआरएम' योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याकरिता खरेदी केलेल्या तीन रोड स्विपर मशिनच्या देखभाल व दुरूस्तीसाठी बीव्हीजी इंडिया या सध्याच्या ठेकेदार कंपनीलाच दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेमार्फत घेण्यात आला आहे.
Nagpur
<p><a href=

अखेर नढेनगरमध्ये प्रलंबित रस्त्याचे काम सुरु

प्रभाग क्रमांक 46 (काळेवाडी) मधील नढेनगरमध्ये 30 वर्षांपासून प्रलंबित रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला.
या वेळी विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर,