Friday, 13 July 2018

पॅन सिटीसाठी ६५० कोटींची निविदा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पॅन सिटी प्रकल्पासाठी सुमारे ६५० कोटींची निविदा काढण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिली.

#PCMCVoter #207Bhosari विशेष मतदार नोंदणी मोहीम दिवस दि. 14 जुलै

207 भोसरी विधानसभा: मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, रंगीत फोटो देणे, मतदार यादीतून नाव वगळणे इत्यादी कामासाठी दिनांक 14 जुलै व 28 जुलै 2018 या दोन दिवशी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी/ यादी अद्ययावत करण्याचे कामकाज चालणार आहे तेव्हा जरूर या संधीचा लाभ घ्यावा. मतदार नोंदणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे! 

#PCMCVoter #206Pimpri विशेष मतदार नोंदणी मोहीम दिवस दि. 14 जुलै

206 पिंपरी विधानसभा: मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, रंगीत फोटो देणे, मतदार यादीतून नाव वगळणे इत्यादी कामासाठी दिनांक 14 जुलै व 28 जुलै 2018 या दोन दिवशी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी/ यादी अद्ययावत करण्याचे कामकाज चालणार आहे तेव्हा जरूर या संधीचा लाभ घ्यावा. मतदार नोंदणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे! 

#PCMCVoter #205Chinchwad विशेष मतदार नोंदणी मोहीम दिवस दि. 14 जुलै

205 चिंचवड विधानसभा: मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, रंगीत फोटो देणे, मतदार यादीतून नाव वगळणे इत्यादी कामासाठी दिनांक 14 जुलै व 28 जुलै 2018 या दोन दिवशी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी/ यादी अद्ययावत करण्याचे कामकाज चालणार आहे तेव्हा जरूर या संधीचा लाभ घ्यावा. मतदार नोंदणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे! 

वाहन दुरुस्ती ठेकेदाराला ६० लाख वाढीव देण्याचा खटाटोप

महापालिकेच्या कार्यशाळा विभागामार्फत ई गटातील वाहन दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला सुमारे ६० लाख रुपयांचा वाढीव खर्च देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.११) ऐनवेळी दाखल करून घेण्यात आला.

आरोग्य विभागाचा ठेकेदारांना दणका

पिंपरी – किमान वेतन दिल्याचा पुरावा सादर करण्यासाठी “बॅंक स्टेटमेंट’ सादर न करु शकलेल्या दोन ठेकेदारांचे तीन महिन्यांचे बील महापालिकेच्या आरोग्य विभागाने रोखले आहे. त्यामुळेच कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन मिळू न शकल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे हे “स्टेटमेंट’ सादर कसे करावे, असा गहन प्रश्‍न या ठेकेदारांना पडला आहे.

दोन दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवा ; पिंपरी महापौरांचे आदेश

पिंपरी : दोन दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवा, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी दिले. महापालिका प्रशासनाने विविध भागांमध्ये खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. 

मुळानदी किनारा रस्ता सांगवीकरांच्या मुळावर

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी मुरूम व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात आले. मात्र मोठ्या पावसात या भागातील खोदाईवर केलेले डांबरीकरण खचले आहे.

स्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्‍नावर मनसेचे आंदोलन

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्‍नावर गुरुवारी मनसेतर्फे महापालिका भवनात सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

शाळा सुटली, कोंडी नाही फुटली

निगडी - शाळा-महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात होणारी तुडुंब गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा उडालेल्या बोजवारा यामुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागतो. पोलिस व शाळा प्रशासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे.

Plastic waste rules: NGT raps civic bodies

PUNE: The National Green Tribunal (NGT) bench in Pune took s ..

…अन्यथा पशुवैद्यकीय विभाग बंद करा, थेरगावकरांचे आरोग्य धोक्यात – माया बरणे

थेरगाव मधील गुजरनगर, संतोष नगर, बेल्ठीका नगर भागात ऐन पावळ्यात भटक्या जनावरांनी प्रामुख्याने डुकरे, कुत्री यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी संबधीत पशूवैद्यकीय विभागाला गेली अनेक दिवस पाठपुरावा करूण सुद्धा कार्यवाही करण्यात ते अपयशी ठरत असेल तर हा विभागच बंद करून टाका असा संतप्त सवाल स्थानिक नगरसेवीका माया बारणे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केला आहे.

‘एसकेएफ’इंडिया तर्फे क्रीडा शिक्षण कार्यक्रम जाहीर

‘गोथिया कप’मधील सहभागाचा १० वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने एसकेएफ इंडियातर्फे पिंपरी-चिंचवड महारपालिका विभागातील शाळांसाठी एसकेएफ क्रीडा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रम असे नाव दिले आहे. त्याचे उद्घाटन एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस,  महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

[Video] चिंचवडमध्ये केली 70 झाडांची कत्तल आणि इतर महत्वाच्या बातम्या!


#CabSurge कॅबचा नकार तरी प्रवाशांना भार

पुणे - पाऊस पडतोय आणि प्रवासासाठी तुम्ही कॅब मोबाईलवरून बुक केली. १५-२० मिनिटांनंतर चालकाचा फोन येतो आणि सांगतो, मला फेरी शक्‍य नाही. माझ्याकडून फेरी कॅन्सल होत नाही. तुम्ही कॅन्सल करा आणि दुसरी कॅब बुक करा. प्रवाशाने कॅब कॅन्सल केली की, त्याचा भुर्दंड त्याला बसतो अन्‌ कॅबही मिळत नाही. त्यातून मात्र कॅब कंपन्या आणि चालकाची प्रवास न करताही उत्पन्नाची चंगळ होते!

झाडांचा रेल्वे पुलाला धोका

पिंपरी - हॅरिस पुलाजवळील रेल्वे पुलालगत असणाऱ्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी वडाची झाडे फुटली आहेत, त्यामुळे शंभर वर्षे जुन्या असणाऱ्या या पुलाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने त्याची तत्काळ दखल न घेतल्यास भविष्यात त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

टाऊनशीपमध्ये वृद्धाश्रम सक्तीचा

ज्येष्ठ नागरिकांना आपला वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, यासाठी नवीन टाऊनशीप तसेच मोठ्या संकुलांना मान्यता देताना नगर विकास विभागाने वृद्धाश्रमाची स्थापना सक्तीची करावी, अशी शिफारस राज्य सरकारने तयार केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामु‌ळे यापुढील काळात कोणतेही मोठे बांधकाम करताना संबधित विकसकाला वृद्धाश्रमासाठी ठराविक जागा द्यावी लागणार आहे.

old age homes in township

ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे

नागपूर – ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

PCNTDA land in PCMC: Fake 'go take what you want' WhatsApp rumour has residents demarcating plots

Residents of Chikhali and nearby areas in Pimpri Chinchwad township were the latest victims of fake social media rumors.On Monday, rumours forced residents to demarcate plots in Sector no 13 of Pimpri Chinchwad new township development authority (PCNTDA), popularly known as Nigdi Pradhikaran. Officials of Pradhikaran, with the help of police, succeeded in fleeing the agitated residents away.

Within two to three hours, residents demarcated the entire 50 acres with clothes, stones, and whatever they had.