Wednesday, 5 December 2012

Now, common admission schedule for all schools in Maharashtra

Now, common admission schedule for all schools in Maharashtra: The state directorate of education will issue a common admission schedule for all schools in the next 10 days. Schools will have to set their admission dates and deadlines as per this schedule, announce dates for the issue of application forms and the last date for receiving them.

Six found guilty of Sagar Sahani’s murder

Six found guilty of Sagar Sahani’s murder: A special court here on Tuesday pronounced six of the 11 accused guilty in the sensational kidnapping and murder of 22-year-old Sagar Sahani, son of a Pimpri businessman, for a ransom of Rs 2 crore in 2005. The quantum of punishment will be declared on Friday.

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात वाढ

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात वाढ: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ७५ रुपयांनी वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये एक हजार ७०१ रुपयांना मिळणारा सिलिंडर या महिन्यात एक हजार ७७६ रुपयांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

घरकुलाचा ताबा देण्यात अडचण

घरकुलाचा ताबा देण्यात अडचण: पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वस्त घरकुल प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थींना ताबा देता येऊ शकत नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (चार डिसेंबर) मान्य केले. नवनगर विकास प्राधिकरणाकडून जागेचे पैसे न दिल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाटचाल पर्यटनाच्या दिशेने

वाटचाल पर्यटनाच्या दिशेने: पिंपरी- चिंचवडच्या चिरंतन आणि चिरस्थायी विकासासाठी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या प्रकल्पाचे मंगळवारी (चार डिसेंबर) सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याअंतर्गत सिटी सेंटर विकसित करण्याबरोबरच पर्यटन केंद्राचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले.

नर्सरी, केजीच्या प्रवेशांना ब्रेक!

नर्सरी, केजीच्या प्रवेशांना ब्रेक!: वंचित आणि दुर्बल घटकांमधील मुलांना शालेय प्रवेशामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला खासगी शाळांकडून हरताळ फासला जात असल्याने, नर्सरी व केजीच्या प्रवेशप्रक्रिया थांबविण्याचा आदेश राज्याचे शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या कारवाईमुळे प्रवेशप्रक्रियांविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’

‘BSNL’ हेल्पलाइनला हवे मदतीचे ‘कनेक्शन’: ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा त्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी उपलब्ध असलेला ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (बीएसएनएल) हेल्पलाइन क्रमांकालाच (१५००) गेल्या दहा दिवसांपासून ‘हेल्प’ची गरज आहे. ग्राहकांकडून या क्रमांकावर केला जाणारा संपर्क कोणत्याही प्रतिसादाअभावी पूर्णच होत नसल्याची तक्रार केली जात आहे.

अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध

अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध: पिंपरी चिंचवड येथील एका उद्योजकाच्या मुलाचे अपहरण करून खंडणीची रक्कम घेऊन त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सहा आरोपींना मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मंगळवारी दोषी ठरविले.

िपपरी पालिकेचा २५०० कोटींचा पर्यावरण विकास आराखडा नियोजित २३ पर्यटन केंद्रांमुळे उद्योगनगरी बनणार पर्यटननगरी?

िपपरी पालिकेचा २५०० कोटींचा पर्यावरण विकास आराखडा नियोजित २३ पर्यटन केंद्रांमुळे उद्योगनगरी बनणार पर्यटननगरी?:
pune-2
िपपरी-चिंचवड शहराला वेगळी ओळख देणारा अंदाजे २५०० कोटी रुपयांचा पर्यावरण विकास आराखडा महापालिकेने तयार केला असून, त्यात शहरातील प्रमुख २३ ठिकाणे पर्यटनकेंद्रं म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून िपपरी-चिंचवड नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शहराचा चिरंतन विकास करण्याबरोबरच एकात्मिक पर्यटन विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी तयार केलेल्या आराखडय़ाचे सादरीकरण चिंचवड येथील अ‍ॅटो क्लस्टरमध्ये करण्यात आले. यावेळी महापौर मोहिनी लांडे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, शहर अभियंता महावीर कांबळे, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे आदी उपस्थित होते. आराखडा तयार करण्याचे काम मुंबईतील पी. के. दास यांना देण्यात आले. त्यांनीच याबाबतचे सादरीकरण
केले.
पहिल्या टप्प्यात २३ स्थळे विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये बहिणाबाई प्राणी संग्रहालय, बर्ड व्हॅली, बालनगरी, गुलाबपुष्प उद्यान, पर्यावरण संस्कार केंद्र, भोसरी सहल केंद्र, सफारी पार्क, सायन्स सेंटर, सिटी सेंटर प्रकल्प, िपपळे गुरव उद्यान, शिवसृष्टी उद्यान, सावित्रीबाई फुले उद्यान, थेरगाव बोट क्लब, मोरया गोसावी मंदिर, गणेश तलाव, अप्पूघर, दुर्गादेवी उद्यान, हरिण उद्यान, भक्ती शक्ती उद्यान आदींचा समावेश आहे. याशिवाय बर्ड व्हॅली समोरील खाणीत लेझर शो तसेच औद्योगिक प्रदर्शन
केंद्र व अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार
आहे.
बालनगरीत अहमदाबाद येथील कांकरिया तलावाच्या धर्तीवर मुलांसाठी साहसी खेळ व मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या तसेच माहिती देणाऱ्या खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. सिटी सेंटर विकसित करणे, मोकळ्या जागांचा विकास करणे, शहरांचे नेटवर्किंग करणे, प्रत्येक प्रभागात सेंटर विकसित करणे आदींचा आराखडय़ात समावेश आहे. या आराखडय़ासाठी अंदाजे २५०० कोटी खर्च येणार असून सिटीसेंटर व अन्य माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनातून या खर्चाची उभारणी करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.  

बँक खात्यावर रॉकेल मिळणार

बँक खात्यावर रॉकेल मिळणार: पुणे। दि. ४ (प्रतिनिधी)

शासनाच्या वतीने रॉकेलसाठी देण्यात येणारे अनुदान आता थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असून, त्यासाठी दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर देखील जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांने हे बँकखाते उघडले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता बँक खाते क्रमांक दिल्यानंतरच रॉकेल देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या वतीने रॉकेलसाठीचे अनुदान आता पर्यंत संबंधित तेल कंपन्यांना देण्यात येत होते. परंतु आता रॉकेल वितरण बंद करून पात्र लाभार्थ्यांना दये रॉकेलवर सबसीडी (अनुदान) रोखीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. बँक खाते उघडण्यासाठी शासनाने दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. बँक खाते उघडल्यानंतर खाते क्रमांक व पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची एक झेरॉक्स प्रत गावकामगार तलाठी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले आहे. परंतु अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी बँक खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

घरातील पुरुषाच्या नावे बँक खाते असल्यास त्यामध्ये केवळ महिलेच्या नावाचा समाविष्ट करुन संयुक्त खाते सुरु करावे किंवा महिलेच्या नावे स्वतंत्र खाते सुरु करायचे आहे. त्यामुळे अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी बँक खाते सुरु केले नाही त्यांनी त्वरीत खाते सुरू करावे, असे अवाहन देशमुख यांनी केले आहे.

Landage family stands by son, calls it ‘revenge murder’

Landage family stands by son, calls it ‘revenge murder’: Rahul Landage’s mother said the family was proud of him.

पूर्णत्वाच्या दाखल्याअभावी झोनिपू, घरकुलचे वाटप अशक्य'

'पूर्णत्वाच्या दाखल्याअभावी झोनिपू, घरकुलचे वाटप अशक्य'
पिंपरी, 4 नोव्हेंबर
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरकुल आणि झोपटपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिकांचे वाटप करण्याची जोरदार मागणी स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी केली. मात्र चिखली येथील स्वस्तातील घरकुल प्रकल्पासह मिलिंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळाल्याने त्याचे वाटप करणे अशक्य असल्याचे सांगत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी वर्मावर बोट ठेवताच सदस्यांनी माघार घेतली.
www.mypimprichinchwad.com

काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएससाठी 49 कोटींचा खर्च !

काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएससाठी 49 कोटींचा खर्च !
पिंपरी, 4 नोव्हेंबर
भूसंपादन रखडले असतानाही काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी या 11.2 किलोमीटर बीआरटीएस रस्त्याच्या विकसनात महापालिकेने घाई गडबड सुरु केली आहे. ताब्यात असलेल्या जागेचाच टप्प्याटप्प्याने विकास करण्याचे धोरण ठरविणा-या महापालिकेने चौथ्या टप्प्यात 49 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. कुपोषित स्थायी समितीला 'व्हिटॅमिन एम' पुरविण्याचे फर्मान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडताच महापालिका प्रशासनाने तत्काळ बीआरटीएस प्रकल्पाची 49 कोटींची निविदा काढल्याने तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
mypimprichinchwad.com

अबब... सदनिकाधारकाला तीन लाखाची पाणीपट्टी...

अबब... सदनिकाधारकाला तीन लाखाची पाणीपट्टी...
पिंपरी, 4 डिसेंबर
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका सदनिकाधारकाला महापालिकेने तब्बल 3 लाख 6 हजार रूपयांचे पाणीपट्टीचे बील दिल्याने सदनिकाधारकावर पाणी...पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेश कुलकर्णी आणि शाखा उपप्रमुख साहील शहा यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले आहे. संत तुकारामनगर येथील नारायण मुल्य यांना महापालिकेच्या या अजब कारभाराचा प्रत्यय आला आहे.

मुल्य यांना प्रत्येक वेळी 700 ते 800 रूपयांपर्यंत पाणीपट्टी येते. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागामार्फत 23 नोव्हेंबर रोजी मुल्य यांना तब्बल 3 लाख 6 हजार रूपये पाण्याचे बील पाठविण्यात आले आहे. हे पाणीबिल पाहून मुल्य यांच्या घशाला कोरड पडली.

वास्तविक मुल्य यांच्या रिडींग मीटरवर केवळ 235 रिडींग झाले आहे. असे असताना मीटरवर पूर्वीचे रिडींग 1710 दाखविण्यात आले असून चालू रिडींग 22853 दाखविण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणामुळे मुल्य कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करावी, असे कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे.
mypimprichinchwad.com

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार
पिंपरी, 4 डिसेंबर
पिंपरी-चिंचवड शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी महापालिकेचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. यामध्ये जुन्या उद्यानांसह नव्याने प्रस्तावित असलेल्या सिटी सेंटर, औद्योगिक प्रदर्शन केंद्र, लेझर शो, अत्याधुनिक मत्स्यालय यांसारख्या शहरातील 23 पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे 'कामगारनगरी' आता 'पर्यटननगरी' होणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करताना नागरिकांनी केलेल्या सूचनांचा समावेशही केला जाणार आहे. येत्या 15 व 16 आणि 22 व 23 डिसेंबर रोजी हा आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
mypimprichinchwad.com

सततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर वाढता ताण !

सततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर वाढता ताण !
पिंपरी, 4 डिसेंबर
हिवाळी अधिवेशन, 'व्हीआयपी' बंदोबस्त, सातत्याची अतिक्रमण कारवाई, आयत्यावेळी गृह विभागाकडून सुट्ट्यांना दिला जाणारा 'खो' यामुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अपु-या पोलीस बळावर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com

भाटनगरचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंजूर ; नागरिकांचा विरोध

भाटनगरचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंजूर ; नागरिकांचा विरोध
पिंपरी, 4 डिसेंबर

भाटनगरचे पुन्हा एकदा पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला. हा प्रस्ताव मंजुरही करण्यात आला. या प्रस्तावानुसार भाटनगर मधील मजबूत इमारती पाडून त्या जागी परत नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
www.mypimprichinchwad.com

दप्तरदिरंगाईमुळे दहापटीने खर्च वाढलेल्या पुलासाठी सल्लागाराचा घाट

दप्तरदिरंगाईमुळे दहापटीने खर्च वाढलेल्या पुलासाठी सल्लागाराचा घाट
पिंपरी, 4 डिसेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गालथान कारभाराचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. महापालिका प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे पिंपळेनिलख येथील उड्डाणपुलाचा खर्च तब्बल दहा पटीने वाढला आहे. ठेकेदाराने अचानकपणे काम करण्यास नकार दिल्याने महापालिकेला दुस-यांदा निविदा काढावी लागली. त्यामुळे तीन कोटी खर्चाचा हा पूल तेरा कोटी रुपयांवर पोचला. स्थायी समितीने त्यावर कडी करत निविदेनंतरच्या कार्यवाहीसाठी सल्लागार नेमण्याचा घाट आज (मंगळवारी) घातला.
www.mypimprichinchwad.com

औषधांच्या किमतीबाबत जनतेची केवळ फसवणूक

औषधांच्या किमतीबाबत जनतेची केवळ फसवणूक पुणे - देशातील 348 औषधे 100 ते 200 टक्‍क्‍यांनी स्वस्त होणे शक्‍य असताना या किमती केवळ 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे धोरण सरकार स्वीकारत आहे. ही जनतेची फसवणूक असल्याने या धोरणाचा जन आरोग्य अभियानतर्फे निषेध करण्यात येत आहे, असे अभियानचे प्रमुख डॉ. अनंत फडके यांनी सांगितले. औषधांच्या किमतींवर, उत्पादन खर्चावर आधारित नियंत्रण आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावली

अतिक्रमणविरोधी कारवाई थंडावली पिंपरी - पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात सुरू केलेली कारवाई गेल्या काही दिवसांपासून थंडावली आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच हा "हातोडा' पुन्हा उगारला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकामाविरुद्धच्या कारवाईलाही "ब्रेक' बसल्याचे आढळून आले आहे.

अनधिकृत पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांना हवी तक्रार !

अनधिकृत पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांना हवी तक्रार !
पिंपरी, 28 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत पार्किंगची समस्या मूळ धरू लागली आहे. आकुर्डी पोलीस चौकी ते आकुर्डी रेल्वे स्थानक दरम्यानच्या रस्त्यावर अनधिकृतपणे गाड्या उभ्या करणा-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला तसेच दुभाजकाच्या बाजुलाच दुचाकी आणि चारचाकी गाड्या उभ्या केल्या जात असल्याने परिसरातील रहिवाशांना तसेच रेल्वे प्रवाशांना त्याचा मोठा त्रास होत आहे. मात्र कुणाची तक्रार येत नाही म्हणून कारवाई केली जात नाही असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
mypimprichinchwad.com

देहुरोडच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातील स्फोटात चार कामगार जखमी

देहुरोडच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातील स्फोटात चार कामगार जखमी
पिंपरी, 4 डिसेंबर
देहुरोड येथील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात स्फोटक मिसळताना आज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी झालेल्या स्फोटात चार कामगार गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी बॉम्ब शोधक नाशक पथक दाखल झाले असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू आहे.
mypimprichinchwad.com