पिंपरी – दापोडी ते निगडी दरम्यान दोन महिन्यापूर्वी बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला. मात्र, या मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी 90 माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहे. देशाची सेवा करुन आलेले जवान बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा शिरकाव होऊ न देण्याची कामगिरी चोख पद्धतीने बजावत आहेत. मात्र, या जवानांची सुविधेअभावी गैरसोय होत आहे. बीआरटी मार्गात जवानांना बसायला खुर्ची नाही, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, वाहने आडवण्यासाठी हातात तुटलेली दोरी या अवस्थेत जवानांना सेवा बजवावी लागत आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 8 October 2018
Eight spans placed in a month alone, says official
PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation Lim ..
टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटला रीन्युएबल एनर्जी इंडिया पुरस्कार 2018मध्ये मानाचा ‘रीन्युएबल एक्सलन्स एंड युझर’ पुरस्कार
टाटा मोटर्स या भारतातील एका आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपनीने त्यांच्या पुणे प्लांटला रीन्युएबल एनर्जी इंडिया पुरस्कार 2018 मध्ये मानाचा ‘रीन्युएबल एक्सलन्स एंड युझर’ पुरस्कार मिळाल्याची घोषणा आज केली. यूबीएम इंडियातर्फे आयोजित हे आशियातील सर्वात मोठे रीन्युएबल एनर्जी एक्स्पो होते.
हिंजवडीत “पिक अवर’मध्ये जड वाहनांना “नो एन्ट्री’
पिंपरी – हिंजवडी परिसरातील वाहतूक नियमनासाठी गेल्या महिनाभरापासून वाहतूक पोलीस वेगवेगळे बदल करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार शनिवारपासून (दि. 6) हिंजवडी परिसरात सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
महापालिकेत 2,763 पदांच्या भरतीची “दिवाळी’
पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार अद्यापही नोकर भरती झालेली नाही. प्रत्येक विभागात मनुष्यवळाचा तुटवडा जाणवत असून, विविध विभागांकडून होणाऱ्या मागणीनुसार कर्मचारी पुरविताना प्रशासन विभागाची दमछाक होत आहे. ही बाब लक्षात घेत, महापालिका प्रशासनाने विविध 311 संवर्गातील एकूण 2, 763 पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला “ग्रीन सिग्नल’ मिळताच ही पदे भरली जाणार आहेत.
सोसायट्यांमध्ये ‘कॉप शॉप’
पुणे - शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आता गृहरचना संस्थांना त्यांच्या आवारात शंभर चौरस फूट क्षेत्राचे विक्री दालन उभे करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात सहकार पणन विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती जिल्हा निबंधक आनंद कटके यांनी दिली. या निर्णयानुसार पुणे, पिंपरी- चिंचवड या शहरांत ५० ‘कॉप शॉप’ उभे केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
वाहतुकीचा चक्रव्यूह
पिंपरी - उलट्या दिशेने येणारी वाहने, डबल आणि रस्त्यालगत केलेले पार्किंग, अनधिकृत हातगाड्या आदी अनेक समस्यांमुळे हिंजवडीत राबविण्यात येत असणाऱ्या चक्राकार वाहतुकीची ‘ऐशी तैशी’ होत असल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीच्या कामाला गती द्या
सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिल्या सूचना
चिंचवड : पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाला वेग देण्यात यावा. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. आगामी महिन्यभरात फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकार्यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात चिंचवड येथील अॅटो क्लस्टर मधून आयुक्तालयाचे कामकाज सुरु आहे. पोलीस आयुक्तालय चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये कायमस्वरुपी होणार आहे. इमारतीमध्ये कामकाज सुरु असून सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शनिवारी (दि. 6) कामाची पाहणी केली.
जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ
पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीला स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांना सोबत घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे.
After hoarding collapse PCMC hints at tweaking rules, PMC says talks are on
While the PCMC, headed by Shravan Hardikar, has sent out some positive signals, the Saurabh Rao-led PMC does not seem to have made much progress. Last week’s accident happened in its area.
गुन्हे शाखेत ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या
नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात हजर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या. आयुक्तालयातील ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या गुन्हे शाखेत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी (दि.६) रात्री काढले. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव व कोठून कोठे हे पुढील प्रमाणे…
शहरात ३ हजार ६०० रिक्षा धावतात विनापरवाना...
रिक्षासाठी परवाने खुले झाल्यानंतर त्यात भर पडली आहे. मात्र, नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अनेकजण पुन्हा ‘आरटीओ’कडे फिरकतच नाही. सद्यस्थितीत 3600 रिक्षांची नोंदणी होऊन पुढील प्रक्रियेसाठी रिक्षाचालक पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या सर्व रिक्षा अनधिकृतपणे शहरात धावत असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेची निविदा प्रक्रीया रद्द करा; खासदार बारणे यांची केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील च-होली, बोऱ्हाडेवाडीसह इतर ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदा पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी संघनमताने भरल्या आहेत. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रीया रद्द करावी आणि नव्याने फेरनिविदा काढण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच निविदांमध्ये अफरातफर करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शिक्षक वर्गीकरणासाठी फुटला प्रत्येकी पाच लाखांचा भाव; राष्ट्रवादी, शिवसेना सदस्यांचा आरोप
जिल्हा परिषदेचे 50 शिक्षक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवा वर्गीकरण्यासाठी प्रत्येकी 5 ते 8 लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे. सदर विषय प्रशासनाचा असताना आयुक्तांशी संगणमत करून सदस्य प्रस्ताव ऐनवेळी दाखल करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या विषयाला विरोधकांचा विरोध नोंदवून आयत्यावेळी शिक्षण समितीने गुरूवारी (दि.4) मंजुरी दिली.
पक्षनेत्यांकडून प्रेमलोक पार्क येथील पोलिस आयुक्तालयाच्या कामाची पहाणी
पोलिस आयुक्तालय इमारतीचे दिवाळीपर्यंत उद्घाटन, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती
शाळा पाहणीसाठी पालिका पदाधिकार्यांचा दिल्ली दौरा; पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, सर्व गटनेते, शिक्षण समितीचे सदस्य आणि काही अधिकारी दिल्लीचा अभ्यास दौरा करणार आहेत. या रविवारी (दि.7) ते मंगळवारी (दि.9) अशा 3 दिवसांच्या दौर्यात तेथील शाळा व मोहल्ला क्लिनिकची पाहणी केली जाणार आहे.
प्राधिकरणाच्या कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्या – आमदार महेश लांडगे
विकसकांनी जबाबदारी पुर्व केल्यानंतरच ना-हारकत प्रमाणपत्र द्यावे
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली. तसेच प्राधिकरण हद्दीतील विकसकांनी गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी करण्यात यावी. ज्या विकसकांनी पूर्तता केली नाही, अशा विकसकांना येत्या आठ दिवसात नोटीसा देण्यात याव्यात. सोसायटीतील प्रलंबित समस्याकरिता कॅम्प घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकती हस्तांतरण करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली. तसेच प्राधिकरण हद्दीतील विकसकांनी गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी करण्यात यावी. ज्या विकसकांनी पूर्तता केली नाही, अशा विकसकांना येत्या आठ दिवसात नोटीसा देण्यात याव्यात. सोसायटीतील प्रलंबित समस्याकरिता कॅम्प घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आम्ही पोलीस आहोत, पटापट पाकिटे काढा!
आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना मारहाण, लुटालुट
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने पकडून दिले पाकिटमाराला
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने पकडून दिले पाकिटमाराला
राष्ट्रवादीकडून मावळसाठी वाघेरे, भोईर इच्छूक
पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी याठिकाणाहून लढण्याची इच्छा पक्षाच्या मुंबईतील आढावा बैठकीत व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत, मावळातून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.
शिवसेनेचे महापालिकेत “ठिय्या आंदोलन’
पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या “एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेना गटनेते राहुल कलाटे व मारुती भापकर यांनी शनिवारी (दि. 6) सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयीन कामकाजानंतर सुरु झालेले हे आंदोलन माहिती मिळाल्याशिवाय मागे न घेण्यावर कलाटे व भापकर ठाम आहेत. त्यामुळे सहशहर अभियंता कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
दहावी, बारावी परीक्षा; वेळापत्रक जाहीर
चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, बारावीचे ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहे.
शहरात प्रथमच भव्य मोरया युथ फेस्टिव्हलचे आयोजन
मोरया युथ फेस्टिव्हलच्या ‘लोगो स्पर्धे’ची घोषणा
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe to:
Posts (Atom)