Sunday, 9 December 2012

शहरात बोकाळले "ओपन बार'

शहरात बोकाळले "ओपन बार' पिंपरी - शहरात "ओपन बार' बोकाळले आहेत. बिअर शॉपी आणि मद्य दुकानांच्या (वाइन शॉप) बाहेर आणि काही चायनीज हातगाड्यांवर सायंकाळ होताच हे बेकायदा बार ऐन वर्दळीच्या रस्त्यावर सुरू होत असून, हे बार महिलांच्या दृष्टीने तापदायक ठरत असल्याने ते त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे. 
पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकात या "ओपन बार'मुळे तेथून महिलांना ये-जा करणेही दुरापास्त झाले आहे. तेथे दिवसाही वाइन शॉपच्या बाहेर मद्यपी दारू पीत बसलेले दिसून येतात. तेथे सायंकाळ होताच खुले मद्यालयच भरते. त्यांना पाणी, सोडा, ग्लास, शीतपेय वाइन शॉपमधून उपलब्ध करून दिली जातात. हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तेथेच पीएमपीचा बसथांबा व रिक्षाथांबा आहे. तेथील महिला प्रवाशांना या बारचा व तेथील मद्यपींचा त्रास होतो

पिंपरीत-चिंचवडमध्ये भीममय वातावरण

पिंपरीत-चिंचवडमध्ये भीममय वातावरण पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजकीय पक्ष, सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि संघटनांच्या वतीने गुरुवारी अभिवादन करण्यात आले. पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंबेडकरप्रेमींनी घोषणा देत भीममय वातावरण निर्माण केले. 

स्वारगेट ते पिंपरी मेट्रो 'स्थायी' स्टेशनवर

स्वारगेट ते पिंपरी मेट्रो 'स्थायी' स्टेशनवर पुणे - स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. एकूण साडेसोळा किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यापैकी 9.44 किलोमीटर पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार आहे. त्यापैकी 4.66 किलोमीटर भूमिगत असेल.

Navi Sangvi may get mini ST terminus

Navi Sangvi may get mini ST terminus: done The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) plans to set up a mini bus terminus in the Navi Sangvi area.

PCMC extends deadline for water meters

PCMC extends deadline for water meters: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has extended the deadline till December 31 for its amnesty scheme in which citizens were asked to get authorized water connections.

मेट्रोच्या दुसऱ्या मार्गालाही मंजुरी

मेट्रोच्या दुसऱ्या मार्गालाही मंजुरी: वनाझ ते रामवाडी या मेट्रोला मिळालेल्या मान्यतेपाठोपाठ आता स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दुसऱ्या मेट्रोचा मार्गही मार्गी लागणार आहे. या साडेसोळा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीपुढे प्रशासनाने सादर केला असून यामध्ये भुयारी आणि एलिव्हेटेड अशा दोन्ही प्रकारे मेट्रो धावणार आहे.

मेट्रो विलंबाचा भुर्दंड २,६३१ कोटी

मेट्रो विलंबाचा भुर्दंड २,६३१ कोटी: भुयारी की एलिव्हेटेड; अशा मुद्यांवरून चर्चा-वादांचे गुऱ्हाळ, प्रशासकीय कूर्मगती आणि पक्षीय राजकारण अशा कारणांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील मेट्रोला प्रचंड विलंब झाला आहे. या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून, त्याचा भुर्दंड आहे दोन हजार ६३१ कोटी रुपये!

नागरिकांना मिळणार 'टेंपररी आधार'

नागरिकांना मिळणार 'टेंपररी आधार': नोंदणी करून कित्येक महिने लोटले, तरी आधार कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो नागरिकांना सरकारने आता दिलासा दिला आहे. आधार कार्ड मिळेपर्यंत या नागरिकांना पोर्टलवरून टेंपररी आधार कार्ड मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे इंटरनेट नाही, अशा नागरिकांना महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्र येथे दोन रुपये घेऊन 'आधार'ची प्रत दिली जाणार आहे.

आकुर्डीत सव्वालाखाची घरफोडी

आकुर्डीत सव्वालाखाची घरफोडी: दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख २९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या विठ्ठल हेरिटेज मध्ये ही घटना घडली. मंगळवारी (चार डिसेंबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रशांत सोमनाथ दशपुत्रे (वय ४३) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

आकुर्डी सब-वे ला रेल्वेची परवानगी

आकुर्डी सब-वे ला रेल्वेची परवानगी: पुणे-मुंबई लोहमार्गावर आकुर्डी येथे सब-वे उभारण्याला रेल्वे खात्याने तत्त्वतः मान्यता दिली आहे. लेखी पत्रानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येऊ शकेल, असे आश्वासन रेल्वेचे विभागीय जनरल मॅनेजर एस. के. जैन यांनी बुधवारी (पाच डिसेंबर) दिले.

राजगुरूनगर विमानतळाचे लवकरच ‘टेकऑफ’

राजगुरूनगर विमानतळाचे लवकरच ‘टेकऑफ’: राजगुरूनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा ‘विमानतळ प्राधिकरणा’च्या तांत्रिक समितीने निश्चित केली असून, जागेचे नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठ ते दहा दिवसात हे नकाशे पूर्ण होतील, त्यानंतर हे नकाशे मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविले जातील, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांन‌ी बुधवारी सांगितले.

पुण्यातील बँकांवरील ‘काळा डाग’ कायमच

पुण्यातील बँकांवरील ‘काळा डाग’ कायमच: बँक खात्याचे बनावट स्टेटमेंट देत असल्याचा ठपका ठेवत देशातील १,९४० बँकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणा-या ब्रिटनने नव्या वर्षातही तोच डाग, त्याच बँकांवर कायम ठेवला आहे. आमच्यावर अनावश्यक आणि सरसकटपणे लावलेला हा डाग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने कोणताही प्रयत्न केला नाही, असे खापर आता या बँका फोडत आहेत.

पुणे मेट्रोचा वाढीव खर्च राज्य शासनाने उचलावा

पुणे मेट्रोचा वाढीव खर्च राज्य शासनाने उचलावा:
पुणे आणि पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाला होत असलेला विलंब आणि त्यामुळे प्रकल्पाचा वाढत असलेला खर्च याला पिंपरी महापालिका आणि राज्य शासनच जबाबदार असून त्यांनी मंजुरीसाठी लावलेल्या विलंबामुळेच प्रकल्प खर्च वाढला आहे. त्यामुळे खर्च वाढीचा भरुदड राज्य शासन आणि पिंपरीने सोसावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्प केव्हा सुरू होणार याबाबत संपूर्ण अनिश्चितता असतानाच मेट्रोचा खर्च मात्र तब्बल सव्वीसशे कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रो अद्यापही मंजुरीच्याच टप्प्यात आहे आणि हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण झाल्यास या वाढीव खर्चात तो पूर्ण होऊ शकणार आहे. मेट्रो प्रकल्पातील दहा टक्के खर्च महापालिकेने करायचा असल्याने महापालिकेलाही आता वाढीव रक्कम उभी करावी लागणार आहे.
या वाढीव खर्चाला पुणे जनहित आघाडीने विरोध केला असून मुळातच मेट्रोला प्रथम िपपरी महापालिकेने विरोध केला आणि या प्रकल्पात सहभागी व्हायला नकार दिला. त्यामुळे मेट्रोचा फेरप्रस्ताव तयार करावा लागला आणि आता पुन्हा िपपरीने मेट्रोला अनुकूलता दर्शवली आहे. या विलंबात मेट्रोचा खर्च वाढल्याचे आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य शासनाकडेही हा प्रकल्प मंजुरीसाठी दीड वर्षे पडून होता. अशा विविध कारणांनी मेट्रोला विलंब होत आहे आणि त्याचा वाढता खर्च मात्र पुणे महापालिकेला द्यावा लागणार आहे. हा खर्च राज्य शासनाने आणि पिंपरीने द्यावा, अशीही मागणी आघाडीने केली आहे.

नेते, पदाधिकारी विसरले नागरिकांचे प्रश्न

नेते, पदाधिकारी विसरले नागरिकांचे प्रश्न: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)

निवडणुकीचा काळ नसल्याने नेते, पदाधिकार्‍यांना आता नागरिकांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईने नागरिक त्रस्त आहेत. शासनस्तरावरील प्रस्तावाचा पाठपुरावा थांबला आहे. घरकुलचा प्रकल्प रेंगाळला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. नेते, पदाधिकारी, नगरसेवक मात्र त्यांच्याच कामात व्यस्त आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर अनधिकृत बांधकामाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव महापालिकेने शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. शासनाकडे हा प्रस्ताव पडून आहे. न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून शहरातील अनधिकृत बांधकाम पाडली जात आहेत. सध्या ३१ मार्च नंतरच्या व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली जात आहे. पुढील टप्प्यात अन्य अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा वळविला जाण्याची शक्यता आहे. शासनस्तरावर प्रलंबित प्रस्तावावर निर्णय होणे अपेक्षित आहे. तो अनुकुल निर्णय झाला तरच उर्वरित अनधिकृत बांधकामांना अभय मिळू शकणार आहे. अन्यथा पिंपरी चिंचवडमधील अन्य अनधिकृत बांधकामांनाही धोका पोहोचणार आहे. ही बाब माहीत असूनही नेते, पदाधिकारी पाठपुराव्याबाबत बेफिकीर आहेत.

निवडणूक येताच सर्वच राजकीय पक्ष नागरी प्रश्नांसाठी मोर्चे,आंदोलने करतात. नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याचे श्रेय लाटण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा पहावयास मिळते. आता उलट परिस्थिती अनुभवास येत आहे. आधार कार्ड नोंदणीतील अडचणी, झोपडपट्टी पुनर्वसनातील अडथळे, घरकुल कर्ज प्रकरणे यासाठी नागरिक स्वत:च धावपळ करताना दिसून येत आहेत. निवडणूक नसल्याने कार्यकर्तेही नागरिकांच्या मदतीला धावून येत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाल्यानंतर मात्र नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वजण सरसावतील, अशी चर्चा आहे.

विवाह सोहळ्यांमुळे मनपा ओस

विवाह सोहळ्यांमुळे मनपा ओस: पिंपरी । दि. ७ (प्रतिनिधी)

अधिकारी, पदाधिकारी तसेच नगरसेवक विविध ठिकाणच्या विवाह सोहळ्यांना गेले असल्याने महापालिकेत शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट होता. अधिकारी कक्ष, पदाधिकार्‍यांची दालने रिकामी होती. मंत्री, नेते, खासदार, आमदार आदी व्हीआयपी मंडळींच्या घरातील विवाह समारंभ असल्याने अधिकारी, पदाधिकारी आवर्जून त्या सोहळ्यांना हजर राहिले. त्याचा परिणाम महापालिकेत जाणवला.

खासदार गजानन बाबर यांच्या चिरंजीवांचा विवाह सोहळा रावेत येथे होता, तर पुण्यात बालेवाडी येथे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या चिरंजीवांचा विवाह समारंभ होता. आमदार बापू पठारे यांच्या घरीही लग्नसमारंभ असल्याने महत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकारी महापालिकेकडे फिरकले नाहीत. काही अधिकारी, पदाधिकारी महापालिकेत आले. थोडा वेळ थांबून दुपारी लग्नसमारंभांसाठी निघून गेले. दुपारनंतर महापालिकेत केवळ शिपाई आणि अन्य कर्मचारी दिसत होते. एरवी तिसर्‍या मजल्यावर दिसणारे कार्यकर्तेही कोणी दिसून आले नाहीत.

खासदार बाबर यांच्या चिरंजीवाच्या लग्नसोहळ्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांचे बहुतांश नगरसेवक, कार्यकर्ते गेले होते. शुक्रवारचा विवाहसोहळ्याचा मुहूर्त महापालिकेच्या शुकशुकाटास कारणीभूत ठरला. आळंदीत संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. त्याचाही परिणाम जाणवला.

महापालिकेत शुकशुकाट, तर बाहेर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. विविध ठिकाणी लग्न असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहने दिसून येत होती. एरवीपेक्षा रस्त्यांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ होती. बालेवाडी, बाणेर आणि अन्य ठिकाणी वाहतुकीवर ताण आला. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला होता.

Traffic crawls as VVIPs descend for high-profile weddings

Traffic crawls as VVIPs descend for high-profile weddings: Traffic on the Mumbai-Bangalore Highway and Baner Road swelled up on Friday evening as VVIPs, celebrities and other guests arrived for the high-profile wedding of State Forest Minister Patangrao Kadam’s son and construction magnate Avinash Bhosale’ daughter at Balewadi Sport Complex.

Pimpri-Chinchwad firms to undertake block closure

Pimpri-Chinchwad firms to undertake block closure: Two major industrial units in Pimpri-Chinchwad, Tata Motors Limited and Sandvik Asia Limited, have decided to halt production at their plants in the twin town for a few days.

पिंपरीतील कत्तलखाना अखेर बंद !

पिंपरीतील कत्तलखाना अखेर बंद !
पिंपरी, 8 डिसेंबर
शहराचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा पिंपरी पुलाखालील मोठय़ा जनावरांचा कत्तलखाना अखेर आजपासून (शनिवार) बंद करण्यात आला. पर्यायी जागा मिळेपर्यंत कत्तलखाना बंदच राहणार आहे.
www.mypimprichinchwad.com

दिनदर्शिका, रोजनिशीच्या खरेदीसाठी गर्दी

दिनदर्शिका, रोजनिशीच्या खरेदीसाठी गर्दी
पिंपरी, 8 डिसेंबर
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या दिनदर्शिका, रोजनिशींची खरेदी केली जाते. ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन शहरातील छोट्या-मोठ्या पुस्तकांच्या दुकानांचा दर्शनी भाग दिनदर्शिकांनी व्यापल्याचे दिसून येत आहे. www.mypimprichinchwad.com

राष्ट्रउभारणी केवळ शिक्षणामधूनच शक्य - डॉ. अनिल काकोडकर

राष्ट्रउभारणी केवळ शिक्षणामधूनच शक्य - डॉ. अनिल काकोडकर
पिंपरी, 8 नोव्हेंबर
राष्ट्रउभारणी करण्याचे काम हे केवळ शिक्षणामधूनच शक्य आहे. त्यासाठी देशातील शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे असल्याचे मत अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी आज ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या दुस-या सत्रात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना व्यक्त केले. www.mypimprichinchwad.com

मावळ तालुक्यात वाटली हत्तीवरून साखर

मावळ तालुक्यात वाटली हत्तीवरून साखर
वडगाव मावळ, 8 डिसेंबर
नेत्याला खूष करण्यासाठी, नेत्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय कार्यकर्ते काय शक्कल लढवतील याचा नेम नसतो. अजित पवार हे 72 दिवसांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले आणि मावळ तालुक्यातील त्यांच्या समर्थकांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. ष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं वडगाव मावळ येथे चक्क हत्तीवरून साखर वाटून जल्लोष करण्यात आला.
www.mypimprichinchwad.com

समस्या जाणून घेण्यासाठी मानवाधिकार संघटनेची फिरती व्हॅन !

समस्या जाणून घेण्यासाठी मानवाधिकार संघटनेची फिरती व्हॅन !
पिंपरी, 8 डिसेंबर
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मानवाधिकार कायद्याबाबतची जनजागृती आणि पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'फिरती व्हॅन' उपलब्ध करुन देणार आहे. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त येत्या 14 डिसेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगण सिध्दीमध्ये त्याचे उद्‌घाटन होईल.
www.mypimprichinchwad.com

अजितदादांच्या शपथविधीनंतर पुणे-पिंपरीत कार्यकर्त्यांचा जल्लोश

अजितदादांच्या शपथविधीनंतर पुणे-पिंपरीत कार्यकर्त्यांचा जल्लोश:
pune-jaloshh
अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर फटाक्यांच्या माळा लावल्या. पेढे वाटले, तर महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. या वातावरणात अजितदादांनी दुपारी शहरात भेट देऊन खासदार गजानन बाबर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
अजितदादांचा शुक्रवारी सकाळी शपथविधी झाला. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महापालिकेतही सत्ताधारी गोटात आनंदाचे वातवरण होते. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर अजित पवार मुंबईतून पुण्याकडे रवाना झाले. दुपारी दीडच्या सुमारास रावेत येथे बाबर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील टिळक रस्त्यावरील कार्यालयातही कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोश केला. शांतीलाल मिसाळ, शैलेश बडदे, शिल्पा भोसले, अनिल आगवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  

Life term for 6 in Sagar Sahani abduction and murder case

Life term for 6 in Sagar Sahani abduction and murder case: The six accused who were convicted in the abduction and murder of 22-year-old Sagar Sahani in August 2005, were on Friday sentenced to life imprisonment and fined Rs 10 lakh each.

Shiv Sena demands speeding up work

Shiv Sena demands speeding up work: Shiv Sena corporator from Thergaon Shrirang Barne has demanded that the civic body speeds up the work of constructing a flyover in Dange Chowk.

Metro rail from Pimpri, Chinchwad to Swargate mooted

Metro rail from Pimpri, Chinchwad to Swargate mooted: Proposal tabled before PMC standing committee; 16.5km route will cost `7,984 crore if work starts in 2014.

आयुक्तांचा मोर्चा अनधिकृत फ्लेक्सकडे ! फौजदारी कारवाईचा इशारा

आयुक्तांचा मोर्चा अनधिकृत फ्लेक्सकडे ! फौजदारी कारवाईचा इशारा
पिंपरी, 7 डिसेंबर
अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम राबविणारे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आता आपला मोर्चा शहरात झळकणा-या बेकायदा फ्लेक्सकडे वळविला आहे. विनापरवाना व बेकायदेशीर जाहिरात फलक लावून शहर विद्रुप करणा-यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
www.mypimprichinchwad.com

महापालिकेकडून पशूगणनेला सुरुवात ; पाच लाखांचा खर्च

महापालिकेकडून पशूगणनेला सुरुवात ; पाच लाखांचा खर्च
पिंपरी, 7 डिसेंबर
केंद्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनगणनेचे काम हाती घेतले आहे. त्यावर सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च होणार असून हा खर्च शासन अदा करणार आहे. मात्र हा खर्च महापालिकेला अगाऊ स्वरुपात अदा करावा लागणार असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
www.mypimprichinchwad.com

सागर सहानी खूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

सागर सहानी खूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा
पुणे, 4 डिसेंबर
सहा वर्षापूर्वी खंडणीसाठी पिंपरीतील उद्योजक सतिंदर सहानी यांचा बावीस वर्षाचा मुलगा सागर याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करणा-या सहा जणांना विशेष मोक्का न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सहा जणांना मंगळवारी (दि. 4) न्यायालयाने दोषी ठरवले होते.
www.mypimprichinchwad.com

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पिंपरी चौकात जल्लोष

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पिंपरी चौकात जल्लोष
पिंपरी, 7 डिसेंबर
अजित पवार यांनी आज सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात फटाके वाजवत व मिठाई वाटप करीत आनंद व्यक्त केला.
www.mypimprichinchwad.com

एकाच विचाराने काम करणे हीच राष्ट्रीय एकात्मता- अभ्यंकर

एकाच विचाराने काम करणे हीच राष्ट्रीय एकात्मता- अभ्यंकर
पिंपरी, 7 डिसेंबर
राष्ट्र उभारणीचे काम करण्यासाठी एक विचार असणे आवश्यक आहे. विचार एकच असेल पण कृती भिन्न असेल तर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सर्वांनी एकाच विचाराने काम करणे गरजेचे आहे. त्यातच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे असे मत ज्ञानप्रबोधिनीचे संचालक प्रा.वा. ना. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com

मेट्रो ट्रॅकवर!

मेट्रो ट्रॅकवर!: पिंपरी ते स्वारगेटचा पहिला टप्पा १६ किलोमीटरचा
पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. साधारण १६ किलोमीटरचा हा मार्ग पिंपरीत इलेव्हेटेड व पुणे हद्दीत काही ठिकाणी भुयारी असणार आहे. पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन व स्पेशल परपज व्हीकल या कंपनीची स्थापन करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतून जाणार्‍या मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) चार वर्षांपूर्वी तयार केला होता. त्या वेळी पहिल्या टप्प्यात पिंपरी-स्वारगेट आणि दुसर्‍या टप्प्यात वनाझ ते रामवाडी असे मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासन प्रत्येकी २0 टक्के, महापालिका १0 टक्के आणि उर्वरित ५0 टक्के खर्च ‘बीओटी’ अथवा ‘पीपीपी’द्वारे कर्जाऊ घेऊन विकसित करण्यात येणार होता. त्यापैकी पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणार्‍या दुसर्‍या टप्प्याला महापालिका व राज्य शासनाचीही मान्यता मिळाली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील १६ किलोमीटरच्या मार्गावरून दोन्ही महापालिकांचे एकमत होत नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता.

अखेर पिंपरी महापालिकेच्या हद्दीतून जाणारा ७.१५ किलोमीटरचा मार्ग व ६ स्थानकांचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शवून मान्यताही दिली. उर्वरित ९.४४ किलोमीटरचा रस्ता पुणे महापालिका हद्दीतून जाणार असून, त्यापैकी ४.६६ किमीचा भुयारी मार्ग राहणार आहे. इलेव्हेटेड मार्गावर ३ आणि भुयारी मार्गावर ४ स्थानके उभारण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे रेल कार्पोरेशन व एसपीव्ही या कंपनीतर्फे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूसंपादन, मोबदला देणे, जमीन हस्तांतरण, कर्ज उभारणी व प्रकल्पाचे नियोजन डीएमआरसीच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. भुयारी मार्गासाठी तीनपट अधिकचा खर्च येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला

मेट्रो दूर; मात्र खर्च सव्वीसशे कोटींनी वाढला:
M_Id_148695_Metro
पुण्याचा मेट्रो प्रकल्प केव्हा सुरू होईल आणि मेट्रो कधी धावायला लागेल याबाबत पूर्णत: अनिश्चितता असली, तरी मेट्रोच्या दोन प्रस्तावित मार्गाचा खर्च मात्र तब्बल दोन हजार ६३१ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रोचा खर्च आता १० हजार ५७७ कोटींवर गेला असून खर्चाचा हा आकडा मेट्रो २०१४ पर्यंत सुरू झाली तरचा आहे. प्रकल्प आणखी लांबल्यास खर्चात आणखी वाढ होईल.
मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, निधी उभारणीबाबत निर्णय घेण्यासाठी आणि प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्तांना सर्वाधिकार द्यावेत, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात मेट्रोच्या खर्चात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मेट्रोचा प्रस्तावित खर्च आणि खर्चात झालेली वाढ यातील अंतर भरून काढण्यासाठी आर्थिक उपाययोजना करणे व त्याचे निर्णय घेणे, तसेच मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन होईपर्यंत कार्यवाही करणे यासाठीही आयुक्तांना अधिकार देण्यासंबंधीचा हा प्रस्ताव आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंवचडमधील संयुक्त मेट्रो प्रकल्प सन २००९ पासून चर्चेत आहे आणि त्यातील वनाझ ते रामवाडी या एकाच मार्गाला आतापर्यंत राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी मिळाली आहे. दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. मेट्रोचा प्रकल्प अहवाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सन २००९ मध्ये तयार केलेला असून वनाझ ते रामवाडी या मार्गासाठी १,९४८ कोटी रुपये खर्च त्यावेळी अपेक्षित होता. हा मार्ग २०१४ पर्यंत पूर्ण झाल्यास या मार्गासाठी २,५९३ कोटी इतका खर्च येईल, तर स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गासाठी ५,९९८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. तो आता ७,९८४ कोटी इतका वाढेल. या दोन्ही मार्गाची एकूण लांबी ३१.५१ किलोमीटर इतकी असून पुणे आणि पिंपरी महापालिकांनी आपापल्या हद्दीतील मार्गाचा खर्च करायचा आहे. एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार आहे, तर दहा टक्के रक्कम महापालिकेने द्यायची आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कोणत्या माध्यमातून उभी करायची यासंबंधी वेगवेगळे पर्याय समोर आले आहेत. त्यात मुख्यत: पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) किंवा खासगीकरण किंवा बीओटी आदी पर्यायांची चर्चा आहे.
 सहा भुयारी स्थानके
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग १६.५१९ किलोमीटर इतक्या लांबीचा असून वनाझ ते रामवाडी हा मार्ग १५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील स्वारगेट ते िपपरी या मार्गात १५ स्थानके आहेत. त्यातील सहा स्थानके पिंपरीच्या हद्दीत आहेत आणि ती सर्व उन्नत मार्गावरील (इलेव्हेटेड) आहेत. पुणे महापालिका हद्दीत दोन आणि खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत एक इलेव्हेटेड स्थानके असून उर्वरित सहा स्थानके भुयारी आहेत आणि ती पुणे महापालिका हद्दीतील आहेत. यातील पिंपरी महापालिका हद्दीत पूल, उड्डणपूल, ग्रेड सेपरेटर यांची संख्या अधिक असल्याने तेथील तांत्रिक बदलांसाठी अधिक खर्च येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.   

पिंपरीतील कत्तलखाना बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय

पिंपरीतील कत्तलखाना बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय:
जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून िपपरी रेल्वे उड्डाणपुलाखाली सुरू असलेला कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतची माहिती संबंधित व्यावसायिक व पोलीस यंत्रणेलाही कळवण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून िपपरीतील कत्तलखाना बंद करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी जोर धरू लागली होती. मातृभूमी दक्षता चळवळ या संघटनेने महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. २९ नोव्हेंबरला गोवंश रक्षा समितीच्या पुढाकाराने या मागणीसाठी सर्वपक्षीय महामोर्चा काढला. खासदार गजानन बाबर, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, अमर साबळे, माजी महापौर संजोग वाघेरे, बांधकाम व्यावसायिक संदीप वाघेरे, मिलिंद एकबोटे, डॉ. कल्याण गंगवाल व मोठय़ा संख्येने नागरिक त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली असता याबाबतची सर्व माहिती घेऊ व आठ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले होते. त्यानंतर, भरवस्तीत असलेल्या कत्तलखान्यास असलेला विरोध लक्षात घेऊन आयुक्तांनी हा कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.   

PMC, PCMC blamed for poor dengue awareness

PMC, PCMC blamed for poor dengue awareness: The Union health ministry's team that carried out larval survey in the dengue affected areas of Pune and Pimpri-Chinchwad observed that both the civic bodies failed in carrying out adequate health education activities among their citizens about how to tackle the breeding sites of aedes aegypti mosquito, the dengue vector.