भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर निगडी-प्राधिकरण येथील गुरुकुल नर्सरीतील चिमुकल्यांनी व शिक्षकांनीही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. गुरुकुल नर्सरीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. हातात तिरंगा घेत येथील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 27 January 2018
[Video] देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज असा उभा राहिला ...!
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने देशातील सर्वात उंच म्हणजे १०७ मिटर उंचीवर राष्ट्रध्वज निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात उभारला असून यासाठी २.४ कोटी रुपये खर्च आला असून राष्ट्रध्वज उभा करण्यासाठी ३ महिन्याचा वेळ लागला असल्याची माहिती पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी दिली
Civic bodies have to draft reports on project delay
PIMPRI CHINCHWAD: Municipal corporations have been asked to prepare detailed project reports on development works being delayed because of non-availability of land.
Crackdown time to tame errant drivers
PIMPRI CHINCHWAD: Officials in Pimpri Chinchwad will now be cracking down on traffic rule violators — those parking vehicles haphazardly, violating no-entry rules, carrying autorickshaws carrying more passengers than is allowed and private vehicles plying in BRTS lanes.
[Video] पाणी दरवाढीवरून राजकारण पेटले ....
पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील प्रत्येक कुटुंबाला ६००० हजार ली . मोफत पाणी देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला असला तरी इतर म्हणून प्रत्येक कुटुंबाला महिना २०० रु . आकारणी आकारणी व ६००० हजार ली . पुढच्या पाणी वापरास ५ टक्के दरवाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.
जुनी सांगवीत तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण
जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत विविध सामाजिक संस्था, शाळांमधून प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनवणे यांनी उपस्थिती लावली.
पुण्यातील ५ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक
पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत पाच अधिकारी, तर महाराष्ट्र राज्य कारागृह विभागातील सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
साडेआठ हजार घरे
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाचा 561 कोटी 3 लाख रुपये रकमेचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी प्राधिकरण सभेला सादर केला. चर्चेअंती हा अर्थसंकल्प मंजूर केला. शहरात एकूण आठ ठिकाणी प्राधिकरणातर्फे गृहयोजना साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये 8 हजार 570 घरे उभारण्याचे नियोजन आहे. संबंधित गृहयोजनांसाठी वर्षभराच्या कालावधीसाठी 213 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे.
आकुर्डी येथील विकास आराखड्यास शासनाची मंजुरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी आकुर्डी येथील सविस्तर विकास आराखड्यास (डीपीआर) राज्य शासनाच्या मुख्य सचिवांनी बुधवारी (दि.24) मान्यता दिली आहे.
सांगवीत स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागासह स्थानिक मंडळांचे श्रमदान
जुनी सांगवी : जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ सांगवी परिसरांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग व स्थानिक मंडळांच्या सहभागातून येथील शिवाजी पार्क, ममतानगर, संगमनगर भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील मोकळ्या जागेमधील कचरा, प्लास्टिक उचलण्यात आले.
स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहीले पाहिजे – आयुक्त श्रावण हर्डीकर
‘स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहिले पाहिजे.आरोग्यपूरक वातावरण निर्माण केले तरच आपण समाजाचा सन्मान केला असे होईल.’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. थेरगाव येथे प्रेरणा को.ऑप बँकेच्या १९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आज प्रेरणा बँक, प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था, प्रेरणा शिक्षण संस्था आणि प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित स्वछ भारत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रूग्ण आढळला
यंदाच्या वर्षातील पहिला स्वाईन फ्लूचा रूग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळला आहे. शहरातील एका खाजगी रूग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. गेल्यावर्षी तब्बल ६१ जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला होता.
निगडीत 11 फेब्रुवारीला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा
पिंपरी – रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी प्राधिकरण येथे आठव्या “रनेथॉन ऑफ होप 2018′ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हेमंत कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.27) पत्रकार परिषदेत दिली.
संशोधन क्षेत्रात तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा विक्रम पीसीसीओईआरच्या नावे – डॉ. हरिष तिवारी
रावेतच्या पीसीसीओईआर मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
चौफेर न्यूज – पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाची पहिली बॅच नुकतीच पास झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचा वार्षिक निकाल पहिल्या पाचमध्ये राहिल. तसेच शैक्षणिक, संशोधन, प्लेसमेंट या तीन विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. संशोधन क्षेत्रात मागील तीन वर्षांत 80 पेटंट आणि 150 कॉपीराईट नोंदणीचा राष्ट्रीय विक्रम नुकताच पीसीसीओईआरच्या नावे नोंदविण्यात आला आहे. यामध्ये पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक वृंद व कर्मचा-यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.
पिंपरीच्या बालेकिल्ल्यासाठी भाजपची व्यूहरचना
प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.
पुरंदर विमानतळासाठी लागणार १४ हजार कोटी
पुणे - ‘‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे विमानतळ पीपीपी (खासगी व सार्वजनिक भागीदारी पद्धतीने) मॉडेल नुसार उभारण्यात येणार असून, विमानतळाचा ‘सर्वंकष प्रकल्प आराखडा’ (डीपीआर) डार्स या कंपनीकडून सादर झाल्यानंतर त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
“बजाज’ कामगारांचे आंदोलनास्त्र
सोमवारपासून बेमुदत उपोषण : वेतनवाढ कराराची मागणी
पिंपरी – वेतनवाढ करार मार्गी लावावा तसेच बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी बजाज कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विश्व कल्याण कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारपासून (दि. 29) आकुर्डी येथे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आहेत.
दापोडीतील जलसंपदा उपविभागावरील गंडांतर टळले
पिंपरी – दापोडी येथील जलसंपदा विभागातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची 72 एकर जागेचे संरक्षण व उपाययोजना या बाबी लक्षात घेऊन स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवण्याचा निर्णय राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
हॉकर्स जागावाटप “लकी ड्रॉ’ उधळला!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता दबावापोटी मनमानी पद्धतीने हॉकर्स जागा वाटप होत होते. याचा गुरुवारी (दि.25) निषेध करत “ब’ क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांना जाब विचारत ते उधळून लावण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)