Thursday, 19 July 2018

मोशी स्पाईन रस्ता येथील जागा न्यायालयासाठी मंजूर

पिंपरी : न्यायालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वरिष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय सुरू करावे. त्याचबरोबर कौटुंबिक, औद्योगिक न्यायालये सुरू व्हावीत. यासाठी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने मोशी स्पाईन रस्ता येथील १७ एकर जागा न्यायालयासाठी मंजूर केली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच या ठिकाणी न्यायसंकुल उभारणीचे काम सुरू होणार आहे. हे न्यायसंकुल साकारण्यास काही अवधी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळील इमारत भाडेतत्त्वावर घेऊन मोरवाडीतील न्यायसंकुल स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

भाडेकरूची माहिती न देणे महागात

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घर मालकावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाडेतत्त्वावर खोली किंवा घर घेऊन राहणाऱ्यांकडून शहरात विघातक घटना घडवून आणल्याचे प्रकार यापूर्वी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत. त्यामुळे भाडेकरूंची नोंद करा असे सांगून देखील त्याची पूर्तता न करणाऱ्या घर मालकांवर आता पुणे शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

अन् महापालिका मुख्यालयातील लिफ्टमध्ये महापौर अडकले!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयातील व्हिआयपी लिफ्ट आज सकाळी अचानकपणे बंद पडली. यात महापौर नितीन काळजे त्यांच्यासह दोन नगरसेविका देखील काही काळ लिफ्टमध्ये अडकले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला असून खुद्द महापौरांनाच याचा अनुभव आला.

QRTs deployed on Pune Metro corridors

PUNE: To ensure safety of commuters and pedestrians on Metro .. 

चिखली मंडईत अनधिकृत शेड

चिखली मोरेवस्ती परिसरातील भाजीमंडईत काही विक्रेत्यांनी घुसखोरी करून अनधिकृत शेड उभारले असल्याची तक्रार येथील भाजी विक्रेत्यांनी केली आहे. मंडईत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाजी विक्रेत्यांच्या प्रश्‍नांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिखलीतील भाजीमंडईचा प्रश्‍न सुटण्याऐवजी चिघळत आहे. चिखली मोरेवस्तीमधील भाजी मंडईत 130 गाळे आहेत. मात्र गाळेवाटपात पक्षपात करण्यात आला असून, लोक प्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन अद्याप पाळलेले नाही. त्यामुळे भाजी विक्रेते नाराज आहेत. ही मंडई दोन भागात विभागली गेली असून जुन्या आणि नवीन भाजी विक्रेत्यांमध्ये एकमत नसल्याने भाजी मंडई वार्‍यावर असल्याची सद्यस्थिती आहे. मंडईच्या समस्या मांडण्यासाठी कुणीही अध्यक्ष नाही. अध्यक्ष कोण असे विचारल्यास ‘आम्ही सर्वच अध्यक्ष आहोत’ असे उद्दाम उत्तर ऐकायला मिळाले. 

महाराष्ट्रातील दुध आंदोलनाचा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला

पिंपरी (Pclive7.com):- संसदेच्या पहिल्याच दिवशी शुन्य काळाच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्रतील दुध आंदोलनाचा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारने दुध दरवाढी बाबत लक्ष घालण्याची मागणी केली.

वाहतूक काेंडीत कासारवाडी

पिंपरी - रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांची गर्दी, मेट्रोच्या कामासाठी करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर पडलेले खड्‌डे, अशा विविध कारणांमुळे कासारवाडीतील सेवारस्ता सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील समस्यांमध्ये सातत्याने भर पडताना दिसत आहे. 

लोकशाहिरांना पिंपरी महापालिकेचे अभिवादन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

खड्ड्याचे राजकारण करु नये!

पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यावर पडलेले खड्‌डे पाऊस थांबल्यानंतर तातडीने बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील एकाही रस्त्यावर खड्‌डे दिसू नये अशा सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासन खड्‌डे बुजवण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु, विरोधकांनी खड्ड्याचे राजकारण करुन प्रसिद्धी मिळविण्याचे काम करु नये, असे प्रत्युत्तर सभागृह नेते एकनाथ पवार प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिले आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली करा – आमदार गौतम चाबुकस्वार

चौफेर न्यूज –  पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा उडवून टाकलेल्या पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे पिंपरीचे आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांनी आज समक्ष भेटून केली.

गवळीनगर येथील क्रीडा संकुल कामाचे भूमिपूजन

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ५ मधील आरक्षण क्र. ४०७, गवळीनगर येथे विकसित करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले.

शिक्षण मंडळात गैरव्यवहार; स्थायी सभागृहाबाहेर शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांचे ठिय्या आंदोलन


गुरुवारी ‘फ’ क्षेत्रीय कार्यपरिसरात पाणी पुरवठा बंद

आकुर्डी येथे नव्याने अंथरण्यात आलेल्या 600 मिली मीटर जलवाहिनीचे कनेक्शन येत्या गुरुवारी (दि.19) देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘फ’ क्षेत्रीय परिसरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, असे पाणी पुरवठा विभागाने पत्रक काढले आहे.

नाशिकफाटा ते चाकण मेट्रो प्रकल्पाचा अहवाल वेगात करा

पिंपरी : पुणे महामेट्रोने स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी आणि नाशिकफाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रोचा डीपीआर बनविण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, ते अतिशय संथगतीने सुरु आहे. नाशिकफाटा ते चाकण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी नाशिकफाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रोचा ‘डीपीआर’ नव्याने समाविष्ट करावा. त्याच्यावर वेगात कारवाई करावी, अशी मागणी भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.