पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे विनापरवाना थेट प्रेक्षपण केले जात असल्याबद्दल भाजपचे नगरसेवक बाबू नायर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून भाजपच्या नगरसेवकांमध्येच वाद निर्माण झाल्याने महापौर राहुल जाधव यांनी प्रथम थेट प्रेक्षपण बंद करण्याची सूचना केली. त्यानंतर लगेच आपला निर्णय फिरवत त्यांनी थेट प्रेक्षपणास हरकत नसल्याचे सांगत मंजुरी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 22 October 2018
आयुक्तांच्या मंजुरीनंतर निगडीपर्यंत मेट्रोचा निर्णय
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंत मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहेत. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. डीपीआरचे सादरीकरणानंतर आयुक्तांच्या अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पिंपरी रेल्वे स्टेशनचे पालटतेय रूप
पिंपरी - सातत्याने वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे शहरातील पिंपरी रेल्वे स्टेशनचा चेहरा बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले
पिंपरी – बांधकाम व्यावसायिकांनी सदनिधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फेत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार असल्याच्या नोटीस महापालिकेने भोसरी मतदार संघातील विकसकांना दिल्या आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
6 महिन्यांत 12 लाखांचा दंड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील सहा महिन्यात 12 लाख रुपयांचा दंड प्लास्टीक बंदीतून केला आहे. त्याद्वारे महापालिकेने 9 हजार 907 किलो प्लास्टीक गोळा केले आहे.
अभय योजने अंतर्गत 15 ऑक्टोबरपूर्वी 21.37 कोटीचा झाला भरणा
चार हजार मिळकतधारकांनी घेतला सवलीताचा लाभ
4 हजार मिळकत धारकांना पाच कोटींची सवलत
4 हजार मिळकत धारकांना पाच कोटींची सवलत
Inadequate water supply brings NCP, BJP together
Pimpri Chinchwad: Corporators from the Nationalist Congress ..
Chikhali : चिखलीत पसरले कच-याचे साम्राज्य
एमपीसी न्यूज – सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र सोनवणे वस्ती ते चिखली परिसरात पहावयास मिळत आहे. कचरा अक्षरश: रस्त्यावरुन वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोनवणे वस्ती ते चिखली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहे. गेल्या
पिंपळे सौदागरमधील मिनी मॅरेथॉनमध्ये ७०० स्पर्धकांचा सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन, निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन व कंम्प्लिट फिटनेस आणि स्पोर्ट्स कंपनी यांच्या सयुंक्त विद्यमाने आज “मिनी मॅरेथॉन २०१८” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धेला परिसरातील ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
'Unsafe' Metro work at night puts highway commuters' lives at risk
Commuters taking the Pune-Mumbai highway at night have to dr ..
'एआरटी' सेंटरमध्ये वैधता संपलेली औषधे
पिंपरी (पुणे) - वैधता संपलेल्या औषधांची व वापरलेल्या सुयांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना, वायसीएम रुग्णालयातील अँटी रिट्रोव्हायरस थेरपी सेंटरमध्ये (एआरटी) 2010 पासून वैधता संपलेली औषधे व वापरलेल्या सुया आढळून आल्या आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.
पालिकेची सर्वसाधारण सभा 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्याभरापासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावरून विरोधकांसह सत्ताधार्यांनी तब्बल 6 तास सभागृहात चर्चा केली. पालिका प्रशासनाने त्यावर एका शब्दाचाही खुलासा केला नाही. अखेर सभा 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास दोषी अधिकार्यांचे निलंबनाचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले.
Chinchwad : देश विदेशातील 40 जातीचे श्वान पाहण्यासाठी श्वान प्रेमींची पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी
एमपीसी न्यूज – श्वान घरात असलं की, संरक्षणाची हमी वाटते. त्याला माणसं देखील ओळखता येतात. मालकाची सेवाही तो चोख बजावतो. श्वानांचे आणि मालकांचे विशेष नाते असते, श्वास विशेष प्रशिक्षित असतात. हे सर्व काही पहायला मिळाले चिंचवडमध्ये आयोजित डॉग शोमध्ये. श्वानप्रेमी मोठ्या हिरीरीने डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. देशभरातून आलेल्या श्वानप्रेमींनी डॉग चॅम्पिअनशिपसाठी कसरत केली. श्वानांची
सूर हरविलेले कारभारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता हस्तगत करून आता दोन वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही भाजप पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे चव्हाट्यावर येत आहेत. अनेक स्वकीयच आंदोलकांच्या भुमिकेत पहायला मिळत आहेत. विरोधकांना मात्र यामुळे आयतेच कोलीत मिळत आहे. त्यामुळे दीड वर्षे उलटूनही भाजपचा कारभार अडखळत सुरु आहे. महापालिकेतील सत्ताधारी कारभाऱ्यांचा सूर हरविल्याने मूठभर विरोधक त्यांना डोईजड होवू लागले आहेत.
तरुणाईचा फिटनेस फंडा
पिंपरी - बदलती जीवनशैली आणि त्यामुळे जडणारे आजार लक्षात घेता सध्या तरुणाईचा कल व्यायामाकडे वाढला आहे. वाढता स्थूलपणा सध्या तरुणांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘डाएट’, जिम किंवा व्यायामशाळेचा आधार घेताना ते दिसत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदभार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टया, रजा व प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेत, या अधिकाऱ्यांच्या रजा काळातील अतिरिक्त पदभारांचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचे नियोजन केले आहे.
मिरची झाली “तिखट’, भेंडी गडगडली
पिंपरी- नवरात्रीनंतर मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. फळभाज्यांमध्ये कांदा, घेवड्याची आवक वाढून भावदेखील वधारले. मिरचीची आवक स्थिर राहून भाव मात्र वधारले. याशिवाय बटाट्याची आवक 192 क्विंटलने घटली आहे. याशिवाय कोथिंबीरीची आवक घटूनही भाव मात्र चढेच आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 894 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 20 हजार 630 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 131 क्विंटलने घटली आहेत; तर पालेभाज्यांची आवक किरकोळ 220 गडड्यांनी वाढली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)