Tuesday, 11 December 2018

स्मार्ट सिटी’साठी 207 कोटींचा निधी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला “स्मार्ट सिटी’ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून 207 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापूर्वी देखील 84 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, खर्च करण्यासाठी महापालिका प्रशासन कमी पडत आहे. हा निधी खर्च करावा, अशा सूचना देखील केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

डिजीटल घड्याळ खरेदीवरुन “टिकटिक’

पिंपरी- शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने 7 कोटी खर्चून सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी 4 हजार 544 “स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव उद्या (दि.11) होणाऱ्या स्थायी सभेच्या मान्यतेकरिता ठेवला आहे. प्रशासनाकडून मांडलेल्या या विषयामुळे सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधक देखील हैराण झाले आहेत. आता या विषयाबाबत सत्ताधारी भाजप पदाधिकारी नेमकी काय भुमिका घेतात, याकडे स्वकीयांबरोबरच विरोधकांचे देखील लक्ष लागले आहे.

अजित पवारांचे शहरातील दौरे वाढले

पिंपरी –लोकसभा निवडणूक जवळ येत चालली असताना, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शहराबरोबरच मावळ लोकसभा मतदार संघात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 11) आयोजित केलेल्या संविधान सन्मान सोहळा व संविधान प्रबोधन मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी व आकुर्डी न्यायालयात शेकडो खटले निकाली

पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. 8 डिसेंबर) पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले.

फेरीवालाबाबत राज्यभरातील महापालिका स्थितिनिर्देशांक तयार करणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र हॉककर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघा तर्फे एकदिवशिय फेरीवाला कायदा प्रशिक्षण शिबिराचे  आयोजन   खारघर नवी मुंबई येथे  करण्यात आले.यावेळी कायदा अमलबजावणीसाठी रस्त्यावरची लढाईसह सर्व पर्यायी मर्गांचा अवलंब करण्याचा  ठराव करत राज्यातील सर्व महानगरपालिकात फेरीवाला कायद्याबाबतचि परिस्थितिचा निर्देशांक तयार करण्याचा निश्चय करण्यात आला .

कुदळवाडी परिसरात पथदिवे चकाचक

एमपीसी न्यूज –  कुदळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विद्युत पोलवरील दिवे बंद व नादुरुस्त झाले होते. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्तीबाबत पाठपुरावा चालू होता. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.  

राज्य नाट्यच्या निकालावर रंगकर्मींची नाराजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड विभागात पार पडलेली 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यंदा चांगलीच चर्चेत राहिली. स्पर्धेचे स्थळ म्हणून निवडलेल्या आणि नुकत्याच नुतनीकरण झालेल्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे स्पर्धा चर्चेत होती. त्यातच स्पर्धेच्या अनपेक्षित निकालानंतर प्रेक्षक आणि रंगकर्मींच्या रोषामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. 

तातडीच्या कामासाठी शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पिंपरी चिंचवड : रावेत येथील सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग स्टेशनमधील तातडीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

PCMC invites bids for garden toys

Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has invited bids for 28 toys, multi-activity play systems, double curve slides, spiral slide.

Civic panel puts off free bus ride plan

Pimpri Chinchwad: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has deferred its decision on a proposal to offer free bus rides.

हिंजवडीत दररोज सव्वालाख वाहने

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील ठराविक रस्त्यांवर रहदारी वाढत असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात नगर रस्त्याने सर्वाधिक रहदारी असून, त्या खालोखाल हिंजवडी परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. नगर रस्त्याने दररोज एक लाख 38 हजार, तर हिंजवडीत एक लाख 13 हजार वाहनांची ये-जा सुरू असते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे. 

सुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट

पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून उन्नती प्रकल्प

पिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने "अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे. इयत्तेनुसार शिक्षकांना निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार शाळांचा सर्वे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे. येत्या जानेवारीपासून "उन्नती प्रकल्प' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी दिली. 

“वायसीएम’च्या डॉक्‍टरांची खासगी “प्रॅक्‍टीस’

पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील अनेक डॉक्‍टर बाहेर स्वतःचे दवाखाने व रुग्णालये चालवत आहेत. वायसीएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात दाखल होतात. वायसीएम रुग्णालयात अनेक गैरप्रकार सुरू असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने केली आहे.

अनधिकृत होर्डिंग काढण्यात कुचराई

पिंपरी – आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 325 अनधिकृत जाहिरात होर्डिंग आढळली. लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाईच्या मागणीने सन् 2017-18 ला सर्वेक्षण सुरू केले. रस्त्यावर ठळकपणे अनधिकृत होर्डिंग असूनही आतापर्यंत केवळ काही अनधिकृत होर्डिंगचाच शोध लागला आहे. होर्डिंग मालक व एजन्सीला पाठीशी घालण्याने जाणीवपूर्वक संथ गतीने सर्व्हेक्षण सुरू आहे.

रामदास तांबेंना पुन्हा एकदा डावलले

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकामांना पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यावरून अडचणीत सापडलेले पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना अतिरिक्त पदभार देताना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी याच विभागातील प्रवीण लडकत यांच्या नावाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पसंती दर्शविली आहे.

पिंपरी महापालिकेत समावेशासाठी आळंदीकरांचा रेटा

पिंपरी- शहरात नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या आळंदी नगरपरिषदेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, अशी आग्रही मागणी नागरिक करू लागले आहेत. किमान शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते तरी मिळतील, एवढी माफक अपेक्षा आहे. अनेक नागरिक आता उघडपणे ही मागणी करू लागले असून, याकरिता लवकरच नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.

निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंतचा मेट्रोचा डीपीआर अखेर ‘स्थायी’समोर

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील उर्वरित निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत विस्तृत प्रकल्प आराखडा अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. तो अहवाल मंगळवारी (दि.११) स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

चऱ्होरीमधील बोगस बांधकाम परवानगी प्रकरणी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

चौफेर न्यूज – च-होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी मिळविली होती. यामुळे महापालिकेची फसवणूक केली म्हणून बांधकाम व्यावसायिकासह महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिका-यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

काळेवाडीत ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेची निवड चाचणी

चौफेर न्यूज –  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जालना तालिम संघ व श्री अर्जुन खोतकर यांच्या संयुक्त विद्यमाने 62 वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. 19 ते दि. 23 डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्हा जालना येथे होणार आहे. तसेच नागपूर जिल्हा तालिम संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या वतीने 41 वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.