Monday, 10 April 2017

आयुक्तांच्या बदलीची पालिका वर्तुळात चर्चा

पिंपरी - महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. 
महापालिकेत गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे नाव घेतले जाते. धडाडीने निर्णय घेऊन त्यांनी प्रशासनाला एक वेगळीच शिस्त लावली होती. "पीएमपी'चा कारभार सध्या शिस्तप्रिय तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी पीएमपीची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेत सध्या सत्तेत असलेल्या भाजपने पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हा आपला "अजेंडा' चालविला आहे. त्यासाठी परदेशी, मुंढे यांच्यासारखा धडाडीने निर्णय घेऊन महापालिकेला आर्थिक शिस्त लावणारा अधिकारी आयुक्त म्हणून भाजपला हवा आहे. सध्याचे आयुक्त दिनेश वाघमारे हे स्वतः बदलीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी बदली होऊन येणारा अधिकारी हा धडाकेबाज निर्णय घेणारा असावा, अशी अपेक्षा राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. 
माझे कुटुंबीय मुंबईला असल्याने मी बदलीची मागणी केली आहे. तथापि, अद्याप राज्य सरकारकडून मला त्याबाबत अधिकृत निर्णय कळविलेला नाही. 
- दिनेश वाघमारे, आयुक्त 

आॅनलाइन वीज बिल भरण्यास प्रतिसाद

पिंपरी : महावितरणच्या वीजबिलांची रक्कम आॅनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीजग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात पिंपरी व भोसरी विभागात १८ लाख ९८ हजार वीजग्राहकांनी महावितरणच्या ...

स्वप्नातील घर वास्तवात उतरण्यास मदत

पिंपरी - मला फ्लॅट हवाय, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कासमवेत इतर सरकारी खर्चासह त्याची किंमत काय, तुमच्याकडे कोणत्या ‘ॲमिनिटीज्‌’ आहेत, यांसारख्या प्रश्‍नांमधून अनेक कुटुंबांनी ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनामध्ये ‘स्वप्नातील घर’ वास्तवात उतरविण्याच्या दिशेने पाऊल उचलले. या दोनदिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नोटाबंदीचा फटका बांधकाम विभागास

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. नोटाबंदीचा फटका बांधकाम व्यवसायास झाल्याने परिणामी बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. मात्र, बांधकाम परवाना घेण्याच्या संख्येत वाढ झाली ...

थेरगावात टोळक्‍याकडून दुकानाची तोडफोड

पिंपरी, (प्रतिनिधी) – दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवारीने टोळक्‍यांनी दुकानाची तोडफोड केली. थेरगाव येथील ऑनलाईन लॉटरी सेंटर येथे शुक्रवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.