महिलेची छेड काढणार्या ज्योतिषास धुतले: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
भविष्य जाणून घेण्यासाठी गेलेल्या महिलांचा हात तासन् तास हातात धरून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणार्या भोंदूबाबाचा निगडी परिसरातील महिलांनी भांडाफोड केला. त्याला आणि त्याच्या साथीदारांना या रणरागिणींनी अक्षरश: धुतले व पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास यमुनानगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. श्यामलाल हरिवंश पांडे (४0), संतोष दीनबंधू पांडे (३३), राजकुमार मुनीलाल पांडे (४३) आणि महावीर परमात्मा पांडे (२८, चौघेही रा. यमुनानगर, मूळ गाव, भावी, जि. गोपालगंज, बिहार) अशी त्या चौघांची नावे आहेत.
एका विवाहित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यमुनानगरमध्ये एका बंगल्यात आरोपी भाडेकरू म्हणून राहतात. भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली होती. त्याच्याकडून कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांवर तोडगा सांगितला जात असल्याने दररोज नागरिकांची रिघ लागली होती. विशेष म्हणजे बंगल्याचा पुढील दरवाजा बंद ठेवून प्रत्येक समस्याग्रस्ताला मागील दरवाजाने आत प्रवेश दिला जात होता. समस्याग्रस्त महिला या बंगल्यात आली की, श्यामलाल तासन्तास तिचा हात हातात धरून संवाद साधायचा. काही महिलांनी भोंदूबाबाचे हे प्रताप नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या कानावर घातले. त्यांनी एका महिलेला पाठवून याबाबत खातरजमा केली. त्यांनी महिलांनी एकत्रित जमून या बंगल्यावर धडक मारली. भोंदूबाबा व त्याच्या सहकार्यांना काळे फासत चोप दिला. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील यांनी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 13 March 2013
‘एचए’ औषधे खरेदीस संमती
‘एचए’ औषधे खरेदीस संमती: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
आर्थिक संकटात सापडलेल्या एचए कंपनीला सहकार्याचा हात म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांसाठी सलाईन, सिफोग्रुप आणि अँन्टिबायोटिक्स अशी विविध सात प्रकारांतील औषधे खरेदी करण्यास महापालिकेने संमती दिली आहे. एचएच्या अधिकार्यांबरोबर झालेल्या बैठकीत आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिका एचएची औषधे घेण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. एचएची औषधे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करावीत, असा प्रस्ताव सद्गुरू कदम यांनी स्थायी समिती सभेत मांडला होता. त्याची दखल घेतल्यानंतर मंगळवारी एचए अधिकार्यांबरोबर आयुक्त व नगरसेवकांची बैठक झाली.
महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार थेट पद्धतीने सलाईन १, सिफोग्रुपची ४ आणि अँन्टिबायोटिक्स २ अशी सात औषधे महापालिका खरेदी करणार आहे. नॅशनल प्राईस प्रेफरन्स अथॉरिटी या संस्थेने निश्चित केलेल्या सरकारी औषधांच्या दरानुसार महापालिकेला औषधे दिली जाणार आहेत. थेट कंपनीकडून खरेदी केली जाणार असल्याने बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत ती महापालिकेला मिळणार आहेत, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. वर्की यांनी नमूद केले. आर्थिक संकटात सापडलेली कंपनी वाचविण्याच्या दृष्टीने महापालिकेने उचलले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे सद्गुरू कदम यांनी व्यक्त केले.

City bus fares hiked by half a rupee per km
City bus fares hiked by half a rupee per km: Regional Transport Authority approves hike; Parivahan Mahamandal Limited (PMPML) gets Rs48 crore relief.
Aundh-Ravet bus rapid transit system (BRTS): Land acquisition hurdle cleared
Aundh-Ravet bus rapid transit system (BRTS): Land acquisition hurdle cleared: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) standing committee approves Rs4.5 crore to acquire land from Bharat Electronic Ltd.
PCMC to demarcate land reserved in development plan
PCMC to demarcate land reserved in development plan - Times of India:
PCMC to demarcate land reserved in development plan Times of India RELATED. PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) will be demarcating all the land reserved in the development plan. The corporation has not developed many of these plots because it has not been able to acquire them. Shirish Poreddy ... |
Unused equipment under PCMC scannner
Unused equipment under PCMC scannner - Times of India:
Unused equipment under PCMC scannner Times of India PUNE: Pimpri-Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi has stressed the need for better co-ordination between the stores, finance and the civic departments to ensure that equipment purchased did not lie idle. "The unnecessary equipment ... |
स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी संशयित महिला आणि अर्भकाचा 'डीएनए' होणार
स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी संशयित महिला आणि अर्भकाचा 'डीएनए' होणार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Subscribe to:
Posts (Atom)