Wednesday, 31 May 2017

Ensure safai karamcharis get protective gear, says PCMC commissioner Shravan Hardikar

पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा पिंपरी-चिंचवडचा निकाल ९२.२६ टक्के एवढा लागला. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांचा निकाल ८९.५९ ...

लष्करही सरसावले जलसंधारणासाठी

पिंपळे गुरव परिसरातील शेकडो एकर जमिनीवर उपक्रम
पिंपरी - आतापर्यंत केवळ इमारती, बंगले या ठिकाणीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रम राबविला जात असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, आता भारतीय लष्करानेच या उपक्रमाला सहकार्याचा हात देत आपल्या मोकळ्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. रक्षक सोसायटी परिसराच्या लष्कर विभागाने त्यामध्ये पुढाकार घेतला असून, पिंपळे गुरव-सौदागरलगतच्या शेकडो एकर जमिनीवर हा उपक्रम राबविण्यास परवानगी दिली आहे. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : बोपखेलचा तिढा सुटणार कधी?

पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्याशी संबंधित असे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत, त्यावर अधूनमधून चर्चा होते, पत्रव्यवहार होतात. निवेदने दिली जातात, बैठका लावल्या जातात आणि पाहणी दौरेही होतात. दीर्घकाळापासून हे सारे ...

निसर्गप्रेमींनी उधळला वृक्षतोडीचा डाव

देहूरोड-निगडी रस्ता रुंदीकरण; हरित लवादाकडील प्रकरणात अद्याप निर्णय नाही 
निगडी - देहूरोड-निगडी रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष न्यायालयाचा आदेश डावलून तोडण्याचा ठेकेदार कंपनीचा डाव पिंपरी-चिंचवडमधील निसर्गप्रेमींनी मंगळवारी (ता. ३०) उधळून लावला.

हरित लावादामधील दाव्याचे उल्लंघन

  • देहूरोड रस्त्यावरील झाडांची कत्तल : कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्‍त
देहूरोड,  (प्रतिनिधी) – देहूरोड ते निगडी रस्त्यावर रुंदीकरणातील झाडाच्या संबंधित हरीत लवादामध्ये दावा प्रलंबित आहे. मात्र, तो झुगारून रस्ते विकास महामंडळाकडून झाडाची कत्तल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्‍त केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.