Wednesday, 29 April 2020

#FBLive आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद | भाग 2

#FBLive आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद | भाग 1


शहरातील कारखानदारी कामगारांचे काय होणार ? कोरोना आख्यान भाग 3 – अविनाश चिलेकर


गणेशोत्सव, नवरात्र, दसऱा घरगुती होणार ? कोरोना आख्यान भाग २ – अविनाश चिलेकर


कोरोना आख्यान भाग १ – अविनाश चिलेकर

  • कोरोनाचे दुखणे आणखी दोन-चार महिने, नंतर काय…
  • सण, समारंभ, लग्न सोहळा तूतार्स विसरा…

PCMC chief starts talk show on living with coronavirus


Coronavirus in Pimpri Chinchwad: Full list of containment zones in PCMC


Covid-19 positive cases cross 100 mark in PCMC


Coronavirus : कोरोनासमवेत जगायला शिकायला हवे - श्रावण हर्डीकर

पिंपरी - कोरोना पूर्णपणे जाणार नाही. तसेच आपल्याकडे सध्या त्याविरुद्ध कोणतीही लस नाही. आपण त्याच्या प्रसाराचा वेग कमी करू शकतो. त्यामुळे कोरोनासमवेत जगायला शिकायला हवे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.  

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

पिंपरी - 'आठ बाय आठ फुटाचे घर. त्यात माणसं सात ते आठ. ना घराला आंगण ना पडवी. बाहेर कोरोनाचा संसर्ग तर घरात असह्य उकाडा. शारिरीक अंतराचे काटेकोर पालन करण्यात अडचणी भेडसावत आहेत. ही बिकट परिस्थिती आहे पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीवासियांची 

सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाने शंभरी ओलांडली

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या 106 झाली आहे. मंगळवारी सकाळी 10 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. यात निगडी-रुपीनगर येथील  नऊ जणांचा समावेश आहे. तर एक महिला खडकीतील आहे 

पिंपरीकरांसाठी महत्वाची बातमी; आता 'हा' भाग केला 'सील'

पिंपरी  : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीगाव, काळेवाडी फाटा सोळा नंबर बस स्टाॅप परिसर मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. या परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.b

पिंपरीमध्ये आज 28 Apr कोरोना रिपोर्टबाबत काय घडले वाचा...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील एका 53 वर्षीय पुरुषासह खडकीतील महिलेचे रिपोर्ट मंगळवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आले आहेत. तर, 14 दिवस उपचार घेतल्यानंतर केलेल्या तपासणीत कोरोनामुक्त झालेल्या खराळवाडीतील दोघांना घरी सोडण्यात आले. 

कुदळवाडीतील अतिक्रमणांवर कारवाई करणार – श्रावण हर्डीकर

पिंपरी – कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामांमुळे या परिसरात आगीच्या मोठ्या घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

पिंपरी (प्रतिनिधी) : काळेवाडी मशिदीसमोर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना एक दिसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गरीब मुस्लिम बांधवांना पोलिसांकडून खजूर आणि फळांचे वाटप

पिंपरी (प्रतिनिधी) – रमजान महिन्यातील रोजा सोडण्यासाठी (इफ्तारी) मुस्लिम बांधवांना खजूर आणि फळांची आवश्‍यकता असते. यामुळे वाकड पोलिसांकडून गरीब मुस्लिम बांधवांना फळांचे वाटाप करीत अनोख्या पद्धतीने सौहार्दाचे दर्शन घडवलय. 

Sangvi cops celebrate boy’s birthday as father stuck in US


Video: रात्रीच्या "सौंदर्यात नटलेलं पिंपरी-चिंचवड"

पिंपरी - रात्रीच्या सौंदर्यात नटलेलं आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौकातील हा व्हिडिओ. (व्हिडिओ- संतोष हांडे) ... 

निर्जंतुकीकरणासाठीचे द्रावण योग्य प्रमाणात असणे आवश्यक

एनसीएल-आयसीटीच्या अभ्यासातील निष्कर्ष

Video: निवारा केंद्रात परप्रांतीय बहुभाषिकाची जमली गट्टी...

पिंपरी - महापालिकेच्या निवारा केंद्रात मध्य प्रदेश,  उत्तराखन्ड, कर्नाटक, आसाम,  झारखंड अशा बहुभाषिक नागरिकांचा दररोज गप्पांचा फड रंगत आहे. आतापर्यंत उघड्यावर अथवा झोपडीत आयुष्य काढले. इथे गाद्या आणि पंख्याखाली आराम करतोय, तरीही घराची आठवण येतेय, असे म्हणत या निवारा केंद्रातील परप्रांतीय नागरीकांनी आपल्या भावनांना  मोकळी वाट करून दिली. एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या 88 नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. 

आम्हीही वॉरियर्स म्हणत जुनी सांगवीत ढोलताशा पथकाकडून रक्तदान

जुनी सांगवी - गणपती गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल ताशा वर टिपरी फिरवणारे हात जेव्हा आम्हीही वॉरियर्स म्हणत कोविड १९ च्या काळात लॉकडाऊनमुळे कुठे रक्ताची उणीव भासू नये यासाठी जुनी सांगवी येथील सुवर्णयुग ढोलताशा पथक व सुवर्णयुग मित्र परिवाराच्या वतीने प्रशासनाचे नियम पाळत एकशे सहा जणांनी रक्तदान केले. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनास व गरजूंना रक्तांचा तुटवडा पडू नये यासाठी एरव्ही ढोलताशावर पडणारे हात रक्तदानासाठी सरसावले. याबाबत मंडळाचे सागर खोपडे म्हणाले,या काळात मोठ्या शस्त्रक्रिया व ईतर कारणांसाठी रूग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत ढोलताशा पथकातील सदस्य व नागरीकांनी सामाजिक अंतर व योग्य ती दक्षता घेवून रक्तदान केले. 

वारंवार ट्रिप....पिंपळे सौदागरवासिय त्रस्त

पिंपरी - लॉकडाउन अन्‌ त्यात वारंवार वीजेचं ट्रिप होणं यामुळे पिंपळे सौदागरवासिय चांगलेच त्रस्त झाले आहेत. चक्क महावितरणाच्या हेल्पलाइन क्रमांकावर विजेची तक्रार केली असता रिंग वाजून कॉल आपोआप कट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महावितरण प्रशासनाची हेल्पलाइन नंबरला प्रतिसाद न देण्याची ही जुनीच शक्कल लॉकडाउनमध्ये नव्याने पुन्हा वापरत असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

मस्तच! आता सर्व शाळांना मिळणार ई-लर्निंग प्लॅटफॉर्म', तेही फ्री

पुणे : लॉकडाऊनमुळे तुमचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क तूटतोय का!, शिकविण्यासाठी काही अॅपचा वापर होतोयं; पण त्यालाही काही मर्यादा आहेत? म्हणून तुम्ही 'ई-लर्निंग' व्यासपीठाच्या शोधात असाल!! तर जरा इकडे लक्ष द्या. आता सर्व शाळांसाठी विनामूल्य लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकणार आहे.

पिंपरी : रेशन धान्य दुकान शासनाचे अन्‌...

पिंपरी : "कोरोना'मुळे अनेक लोकप्रतिनिधींना दान, धर्म अन्‌ समाजकार्याची उबळ आली आहे. त्यांना धान्याचे वाटप करायचे आहे, मात्र ते फुकटात घेतलेले, रेशनिंग दुकानांतून येणारे. शहरातील काही लोकप्रतिनिधी चक्क रेशन दुकानात बसून धान्य वितरित करीत आहेत. सरकारचे हे धान्य जणू आम्हीच वाटत आहोत, असा त्यांचा भाव पाहून हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या बिनपैशाच्या समाजकार्यामुळे दुकानदार मात्र त्रस्त झाले आहेत.

...अन् ती आग विझवायला आले 30 जवान; पिंपरीत तीन दुकानांचे नुकसान

पिंपरी : पिंपरीतील शगुन चौकात तीन दुकानांना आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास घडली

पिंपरी : 'या' बहाद्दराने पोलिस वाहनांसाठी काय केले ते एकदा पाहाच...

मोशी : कोरोनाच्या या लढाईमध्ये सध्या पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये त्यांना शासनाने पुरविलेल्या सर्वच पोलिस वाहनांचा कोरोनाग्रस्त भागासह सर्वत्र सतत वापर करावा लागत आहे. मात्र वेळेअभावी ही वाहने निर्जंतुकीकरण करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन भोसरीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सत्यम वाॅशिंग सेंटरचे संचालक अरुण कापसे यांनी आपले वाॅशिंग सेंटर पोलिस वाहने निर्जंतुकीकरण करुन देण्यासाठी मोफत खुले केले आहे.

उन्हाळी क्रीडा शिबिरे, स्पर्धांवरही अनिश्चिततेचे सावट

पिंपरी - दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा प्रशिक्षण यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे, यंदाचा उन्हाळी हंगामालाच पूर्णपणे 'टाळेबंदी' लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सर्दी, खोकला ताप, अंगदुखीच्या औषध विक्रीची द्यावी लागणार माहिती

  • मेडीकलमध्ये लागले फलक 
  • डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री न करण्याचे आदेश

पिंपरी महापालिका कर्मचारी “तिच्या’साठी ठरले देवदूत

नऊ महिण्यांच्या गरोदर महिलेला मिळाली वेळेवर मदत
विद्युत विभागाच्या पथदिवे निगराणी पथकाची समयसूचकता

केशरी कार्डधारकांना धान्य वाटपाला सुरुवात

दोन दिवसांत 13 हजार 270 कार्डधारकांनी घेतले धान्य