Friday, 23 February 2018

Green advisers for Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad: The civic body’s budget document, presented by municipal commissioner Shravan Hardikar last week, has suggested appointment of environmental consultants for undertaking biodiversity studies and preparing local biodiversity strategy action plan in Pimpri Chinchwad city.

CoEP to screen quality of water released by 13 STPs

PIMPRI CHINCHWAD: The College of Engineering Pune (CoEP) will undertake a third party inspection of the water quality at 13 sewage treatment plants operated by the Pimpri Chinchwad Municipal Corporation as per the Maharashtra Pollution Control Board norms.

Skywalks to connect PMC, Deccan Metro rail stations

Pune: Skywalks will connect the Metro stations coming up along the Mutha river with main thoroughfares, giving commuters a better access to the eco-friendly transport facility in the city.

हवा हवाई !

पुणे - देशांतर्गत विमान वाहतुकीत पुणे शहराने मोठी मजल मारली असून, देशात १७ मार्गांपैकी दिल्ली-पुणे-दिल्ली मार्ग सहाव्या क्रमांकावर पोचला आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्या तिपटीहून अधिक वाढली आहे. विविध क्षेत्रांत पुण्याचा वाढत असलेला लौकिक आणि येथील पायाभूत सुधारणांमध्ये होत असलेली वाढ, यामुळे पुण्यातून प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे  निरीक्षण आहे.

"पीएमपी'चे प्रवासी उन्हात

पिंपरी - शहरात पीएमपीएमएलचे सुमारे एक हजार 240 बसथांबे आहेत. मात्र, पीएमपीएमएल आणि महापालिका यांनी केवळ 636 थांब्यांवरच शेड उभारले आहेत. तब्बल 604 थांब्यांवर शेड नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात बसची वाट पाहत थांबावे लागते. तसेच, थांब्यांवर बसण्यासाठी अपुरी जागा आहे. काही ठिकाणी रिक्षाचालकच बसथांब्यांशेजारी थांबलेले असतात. पर्यायाने, प्रवाशांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागते. 

पिंपरी महापालिकेमार्फत शहरातील अंध, अपंग, मुकबधीर विद्यार्थी व नागरिकांना मोफत पास

चौफेर न्यूज   पिंपरी चिंचवड शहरातील अंध, अपंग, मुकबधीर विद्यार्थी व नागरीकांना पी.एम.पी.एम.एलची मोफत बस पास सेवा महापालिकेमार्फत देण्यात येत असून सुमारे २६३० पासधारकांसाठी येणा-या सुमारे ३ कोटी ८८ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २१७ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेला “अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार

पिंपरी – मुंबईच्या मार्केनॉमी संस्थेच्या वतीने एनर्शिया फाऊंडेशन, फॅल्कन मीडिया यांच्या सहकार्याने पाणी पुरवठा, पर्यावरण, वीज व पायाभूत सुविधाबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेला “अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

Put brakes on overlooking, overtaking & overcrowding

PUNE: Pune has so many qualities of an ideal city that people from near and far come and settle here. Of late, one aspect that is increasingly discouraging one and all are the nightmarish traffic conditions.

Opposition seeks resignation of civic office-bearers

PIMPRI CHINCHWAD: Opposition Nationalist Congress Party (NCP) has demanded the resignation of BJP MLAs and office-bearers of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for failing to honour promises made during assembly and municipal elections.

पालिका उभारणार साडेनऊ हजार घरे

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिकेतर्फे शहरात एकूण १० गृहप्रकल्पात ९ हजार ४५८ परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ९३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत आणि आकुर्डी येथील गृहप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. तसेच, संबंधित प्रकल्पांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीची मंजुरी मिळाली आहे. 

पालिकेच्या ठेकेदारांची पीएफ विभागाकडून चौकशी

पिंपरी - महापालिकेच्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्‍कम भरली आहे की नाही, याची चौकशी सुरू केली असून, त्यासंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहे. 

लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही बसविणार

भोसरी- अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही लवकरच लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेत वाढ होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीस लाखांची तरतूद केली. निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आता मेटल डिटेक्‍टरही बसविण्याची मागणी होत आहे.

पाणी टंचाईने त्रस्त महिलांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी-  पवना धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील लालटोपीनगर, मोरवाडी गावठाण, म्हाडा, अमृतेश्‍वर कॉलनी यासह शहराच्या विविध भागात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात सध्यस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक 10 मधील सुमारे शंभर महिलांनी झोपडपट्टी मजूर असोसिएशनच्या माध्यमातून आज (गुरुवारी) महापालिकेवर मोर्चो काढला. याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देवून मोरवाडी, लालटोपीनगर, म्हाडा आणि परिसरात पाण्यासह मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात कविता खराडे, नसिमा सैय्यद, ललिता जोशी, लक्ष्मी जोशी, मेहबुबा शेख यांच्यासह झोपडपट्टी मजुर असोसिएशनच्या पदाधिकारी, महिला वर्ग सहभागी झाला होता.

विद्यार्थ्यांसमोर उलगडले वाद्य विश्‍व!

निगडी – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे दोन दिवसीय संगीत संमेलन सुरु आहे. या संमेलनाच्या सहाव्या सत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या संगीत वाद्यांचे धडे दिले. यानिमित्त जलतरंग, तबला, सतार, सनई, सुंद्री, व्हायोलिन यांसारख्या अनेक वाद्यांच्या गमती-जमती अन्‌ विश्‍व विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

पाणीपट्टीचे चौपट दर करण्यापेक्षा ३८ % पाणी गळती रोखा – खासदार श्रीरंग बारणे

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेने पाणी दर चौपट वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी भा. ज.पा च्या पाठींब्यावर ठेवला आहे या पाणी पट्टी वाढीस सर्वच विरोधी पक्षानी विरोध केला आहे. आज खासदार श्रीरंग बारणे यांनी या पाणीदर वाढीस विरोध करून सत्ताधारी भा.ज.पा चा मनमानी कारभार थांबवण्याचा सल्ला दिला.

पर्यावरण संतुलनासाठी उद्यानांची निर्मीती – नितीन काळजे

चौफेर न्यूज   शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने उद्यानांची निर्मिती केली आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या जागृती साठी आयोजित प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

बालवाडीतील सात हजार मुलांना स्वच्छता कीट

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून महिला व बालकल्याण योजनेतंर्गत शहरातील 206 बालवाडीतील तब्बल 7 हजार 200 मुलांना स्वच्छता कीटचे वाटप करण्यात आले.

बिअरच्या बाटलीत फुलं; पालिकेनं भरवलं अजब प्रदर्शन

महापौरांनी केलं समर्थन

नगरसेवक तुषार कामठे यांना जीवे मारण्याची धमकी; सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत पोस्टरविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

तीस रुपयांत चहा-नाश्त्याला प्रतिसाद

एसटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केवळ तीस रुपयांमध्ये चहा व नाश्ता या उपक्रमास अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जुलै 2016 मध्ये या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांत एक लाखाहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची आकडेवारी एसटीच्या वतीने देण्यात आली. एसटीच्या अधिकृत थांब्यांवर तीस रुपयांमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली, मेदू वडा यापैकी एक पदार्थ आणि चहा मिळत असून, महामंडळाची नाश्ता लूट थांबवणारी प्रवासी योजना असे तिचे नाव आहे. 

एसटी बसेस ग्रेड सेपरेटर बाहेरील थांब्यावर थांबवा

चौफेर न्यूज – मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या एस टी बसेस ग्रेड सेपरेटर थांबतात. ग्रेड सेपरेटरमध्ये इतर वाहने भरधाव वेगाने जात असतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. तथापि, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस ग्रेड सेपरेटरऐवजी सर्व्हिस रस्त्याने पुण्याकडे जाव्यात. व ग्रेड सेपरेटर एसटी न थांबवता बाहेरच्या एसटी थांब्यावर थांबविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावर विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे यांनी केली आहे.

बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा होणार नाही; बोर्डाची माहिती

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची माहिती दिली. कालपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, अवघ्या चार मिनिटांतच ‘व्हॉटसअ‍ॅप’वर व्हायरल झाल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उघडकीस आला. त्यानंतर इंग्रजीचा पेपर पुन्हा होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल. या प्रकाराच्या मागे जे आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. वेळ पडल्यास सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात येईल. मुलांनी आणि पालकांनी घाबरून न जाता व्यवस्थित परीक्षा द्यावी. हा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही