Friday, 17 January 2014

स्थायीने वाढविले शिक्षण मंडळाचे बजेट

आयुक्तांनी कात्री लावलेल्या तरतुदी पुन्हा वाढविल्या 
शालोपयोगी साहित्य खरेदीसाठी जीवाचा आटापीटा करणा-या शिक्षण मंडळाने आज स्थायी समितीसमोर अक्षरश: 'लोटांगण' घातले. त्यामुळे आयुक्तांचा अर्थसंकल्प भिरकावत खरेदीवर भर देणारा शिक्षण मंडळाचा सन 2014 15 चा 108

पिंपरीत नगररचना विभागात अधिकारांचे विकेंद्रीकरण

वाढत्या तक्रारी, नागरिकांची तुंबलेली कामे आणि वादग्रस्त म्हणता येईल, अशी कार्यपध्दती पाहून पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांचे पंख कापले असून...

रिंग रस्ता रेंगाळणार



दीडपटीने खर्च वाढणार? पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा यांना जोडणाऱ्या रिंग रोडच्या प्रकल्पासाठी सुमारे 10 हजार 408 कोटी रुपये खर्च येईल, असे "एमएसआरडीसी'ने 2007 मध्ये गृहीत धरले होते. रस्त्याच्या 38 किलोमीटर परिसरात "टाऊन शिप'ला ...

Ghaziabad gang also involved in six burglaries at Ravet

The three-member gang from Ghaziabad involved in 150 house break-ins across the state is also behind a series of burglaries reported at Ravet in December last year.

संग्रामनगर झोपडीवासियांचे पुनर्वसन करण्याची मागणी

निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना 500 चौरस फुट जागा द्यावी. अथवा आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यानंतरच झोपड्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.

श्रीरंग बारणे यांच्या 'शब्दवेध'चे प्रकाशन

शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख आणि महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्या 'शब्दवेध' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना नेते लीलाधर डाके यांच्या हस्ते होणार आहे.

उद्योगनगरीत 746 केंद्रावर होणार पोलिओ लसीकरण मोहिम

पिंपरी-चिंचवड शहर पोलिओमुक्त करण्यासाठी पिंपरी महापालिका सज्ज झाली असून 19 जानेवारी आणि 23 फेब्रुवारी या दोन दिवसात करण्यात येणा-या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी औद्योगिकनगरीत 746 केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

विम्याचे हप्ते न भरणार्‍या कष्टकरी नेत्यासह दोघांवर गुन्हा

पिंपरी : कष्टकरी महिलांचे विम्याचे हप्ते कंपनीत न भरता तीन लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे व त्यांची पत्नी आशा कांबळे (दोघेही रा. भक्ती कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तर त्यांचा भाऊ प्रल्हाद कांबळे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी छबिता रामचंद्र गलपलू (वय ४0, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा कांबळे यांनी २00९ ला सत्यशोधक युवक मंडळ या नावाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शिवाजीनगर शाखेमार्फत जीवन मधूर या पॉलिसीची एजन्सी घेतली. 

‘मराठी बाणा’तून लोकसंस्कृतीचे दर्शन

पिंपरी : महिलांचे व्यासपीठ ‘लोकमत सखी मंच’ची नवीन वर्षाची सदस्य नोंदणी मंगळवारी सुरू झाली. सखींच्या उंदड प्रतिसादात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सखींसाठी ‘मराठी बाणा’ हा लोकसंस्कृतीवरील कार्यक्रम सादर झाला. ‘मराठी बाणा’तून मराठी लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. या वेळी लकी ड्रॉ काढला. सांगवीतील उर्मिला करंजकर या एक लाखाच्या सोने बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.

शाळा परिसरातील गुटखा विकणाऱ्या तिघांना अटक

सकाळ बातमीचा परिणाम पुणे- पिंपरी आणि सांगवी परिसरातील शाळा- महाविद्यालयांचा परिसर आणि बाजारपेठेतील पानटपऱ्यांवर पोलिसांनी छापे मारून गुटखा विक्री करणाऱ्या तिघांना गुरुवारी अटक केली.